मराठी डबींगला विरोध करण्याची माझ्या दृष्टीने ही कारणे आहेत.
१) मराठी डबींग मध्ये मराठी मुलांना जरी रोजगार मिळणार असला तरी तो
चित्रपटाचा नफा हा हिंदी दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेत्यांचाच असेल. मराठी डबींग कलकारांना करोडोंमध्ये तर रक्कम मिळणार नाही हे निश्चित आहे. १/२
डबींगसाठी चित्रपटाच्या बजेटच्या ०.१% ते ०.५% इतकाच खर्च अपेक्षित असतो. माझ्या माहितीप्रमाणे डबींग कलकारांना ५०००० ते पाच लाख या दरम्यानच मानधन असतं. हिंदी चित्रपटांचा शंभर- दोनशे करोडोंमध्ये फायदा करुन देऊन आपले कलाकार हजार आणि लाखांमध्ये कमावतील हा कुठला व्यवहार? २/२
२) मराठी डबींग मार्फत हिंदी सिनेसृष्टीचा महाराष्ट्रात शिरकाव करण्याचा प्रयत्न मराठी कलाविश्वाच्या अंगाशी येणार. आधीच मराठी चित्रपटांना स्क्रिन मिळत नाहीत त्यात असं झालंच तर हिंदी कम मराठी चित्रपटांच्या सुळसुळाटामुळे मराठी चित्रपटांना आर्थिक दणका निश्र्चित बसेल. १/२
आणि दुसरी गोष्ट म्हणजे थिएटर मालक त्यांचा मराठीचा कोटा मराठी डबींग असलेले चित्रपट दाखवून पूर्ण करतील. सरकार यात लक्ष घालणार नाही हे तर जगजाहीर आहे मग परत हा मुद्दा मनसेकडंच येणार. पण ते याचा विरोध करतील का यात शंका आहे, कारण त्यांचा मराठी डबींगला आधीच विरोध होता. २/२
३) मराठी डबींग चित्रपट प्रदर्शित झाले तर हिंदीच्या मोठ्या बजेट सिनेमांमुळे मराठीत मेगाबजेट चित्रपट कधीच येणार नाहीत. कुठला निर्माता तसं धाडसंच करणार नाही.

४) हिंदीत कामं करणारे मराठी कलाकार आपल्याला चालत नाहीत मग मराठी डबींग कलकार कसे चालतील?
५) हिंदी चित्रपटांचा आधीच दर्जा घसरलाय आणि हे मी नाही समिक्षक सांगताहेत. आताच वेळ आहे बिगर हिंदी चित्रपटांना स्वतःची बाजारपेठ वाढवायला. हिंदी चित्रपटांना मराठी डबींग करु देऊन आपण त्यांना नवी बाजारपेठ खुली करुन देतोय.
६) तमिळ किंवा तेलगूमध्ये हिंदी चित्रपट प्रदर्शित होऊनही त्यांचे चित्रपट चालतात कारण त्यांची सिनेसृष्टी आधीच मोठी आहे. तिथले लोकं आशयाचे नाही कलाकारांचे भोक्ते आहेत. ते त्यांचे चित्रपट पाहतातच भरे ते कसेही असू. १/२
आणि अजून एक गोष्ट देशात सर्वाधिक सिनेमागृह जर कुठल्या राज्यात असतील तर ते तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक आहे- अनुक्रमे ७४५, ५७२, ३६८. आपल्या लोकांपेक्षा त्यांना सिनेमा बघण्याची आवड जास्त आहे हे यावरुनच स्पष्ट होते. आणि साहजिकच जर आवड जास्त तर चित्रपट चालणारच. २/२
७) आणि मराठी कलाकारांचा मला अजिबात पुळका नाही पण मराठी सिनेसृष्टी मोठी व्हावी एवढंच मला वाटतं आणि आपल्या सगळ्यांचीही तीच इच्छा आहे यात संदेह नाही. म्हणून मराठी डबींग सृष्टीपेक्षा मराठी कलासृष्टी मोठी व्हावी.
आणि राहिला मनसेचा विरोध,तर मनसेच्या विरोधामुळे मी विरोध करतोय असं अजिबात नाही. आणि मनसेने विरोध करतानाही मराठी चित्रपटांचं हित असंच कारण दिलंय,त्यामुळे मराठीविरोधी भूमिका त्यांनी घेतलेली नाही.
म्हणून भाषेच्या नावाखाली भावनिक न बनता व्यावहारिकदृष्ट्या मराठीच्या हिताचा विचार करुया.
Missing some Tweet in this thread?
You can try to force a refresh.

Like this thread? Get email updates or save it to PDF!

Subscribe to ऋषिकेश शिंदे
Profile picture

Get real-time email alerts when new unrolls are available from this author!

This content may be removed anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just three indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!