पितृपक्षांच्या निमित्ताने एक थ्रेड! व्हाट्सएप वरून साभार प्राप्त! कुणी पितृपक्षांच्या परंपरेवर काही टोकले तर त्याच्या तोंडावर ही माहिती मारायला पुढे मागे बघू नका😄
श्राद्ध, पितृपक्ष ,पुनर्जन्म .. नेहेमीचे प्रश्न, FAQ आणि उत्तरे !!
खास माहिती आणि विविध विषय असल्याने कृपया पूर्ण लेख वाचावा )
हिंदू धर्मातील विशेष करून ३ सणांबद्दल, समाज माध्यमांवर सर्वाधिक कुचेष्टापूर्ण मजकूर पाहायला मिळतो. वटपौर्णिमा, दिव्यांची अमावस्या ( गटारी म्हणून ) आणि पितृपक्ष !
एकदा पितृपंधरवडा सुरु झाला की या विषयावर ईमेल, व्हॉट्स अप, फेसबुक इत्यादी माध्यमांमधून या विषयावर बरीच टिंगल वाचायला मिळते. पितरांप्रती आदर व्यक्त करण्याच्या प्रथा तर सगळ्याच धर्मांमध्ये आहेत आणि त्या त्या धर्मातील बहुतेक सर्वजण त्या पाळतात. पण याची सर्वाधिक पुरोगामी टिंगल फक्त
हिंदू धर्मातच होते.याबाबत प्रामुख्याने तीन विचारांचे गट असतात. हे सर्व कांही थोतांड असून आज विज्ञान इतकी प्रगती करीत असताना या अंधश्रद्धा कशासाठी, असे विचारणारा एक गट ! आपण यातले काही केले नाही तर पूर्वज आपल्याला भयंकर त्रास देतील आणि आपल्या सध्याच्या त्रासाला हेच कारण असावे
असे मानणारा दुसरा गट. आणि जमेल तसे थोडेतरी काही करावे असे वाटते पण याच्या अंतर्गत केली जाणारी व किचकट वाटणारी कर्मकांडे आणि कडवी विरोधी टीका यामुळे गोंधळलेला तिसरा गट.उत्सुकतेपोटी मी या विषयाचा अभ्यास करीत आहे. सुदैवाने या विषयातील काही चांगल्या जाणकारांची भेट झाली.
स्वतःला अनेक अनुभव आले. त्यावरून अनेक निष्कर्ष काढता आले आणि ते माझ्या FAQ आणि अन्य शंकांना खुपसे अचूक उत्तर देणारे आहेत. मी यापूर्वीही या विषयीथोडे लिहिले आहे पण लोकांना गोंधळात टाकणारे लेख पुन्हा पुन्हा येऊ लागले की त्याच्या खुलाशासाठी मलाही काही मुद्द्यांच्या पुनरावृत्तीसह,
पुन्हा लिहावेसे वाटते.ज्यांना हे सर्व थोतांड आहे -- याची काहीही गरज नाहीये -- विज्ञानाची प्रगती झाली आहे वगैरे, असे कांही वाटते त्यांच्या मताचा मला पूर्ण आदर आहे. सर्वात आधी माझी त्यांना विनंती आहे की मी हे जे काही लिहितो आहे ते, ज्यांना काही करायचेच आहे
पण कर्मकांडे आणि अन्य गोष्टींबद्दलगोंधळ आहे त्यांच्यासाठी आहे. त्यामुळे ज्यांचा यावर विश्वासच नाही त्यांनी कृपा करून याबाबत काही मते मांडू नयेत ही विनंती !
मी माझे विचार थेट मांडत आहे.एकेक मुद्दा वेगळा असला तरी विषय एकच आहे.----
१) मृत्यूनंतरचे जीवन आणि मोक्षाची जी संकल्पना, हिंदू धर्मामध्ये मांडलेली आहे तशी अन्य कुठल्याही संस्कृतीत इतक्या परिपूर्णपणे मांडलेली नाही. यासाठी फक्त हिंदू धर्मामध्येच हजारो वर्षे प्रचलित असलेल्या पुनर्जन्म, कर्म सिद्धांत, पंचमहाभूतांनी बनलेला मनुष्य देह, यासारख्या
गोष्टी मान्य केल्याशिवाय पुढची सर्व वाटचाल ही अगम्यच राहते. पण या गोष्टी एकदा मान्य केल्या तर मग जन्ममृत्यू साखळीतील एकही गोष्ट अगम्य ( unsolved ) रहात नाही. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांच्या उत्क्रांतीवादाच्या शोधाच्या हजारो वर्षे आधी
हिंदूधर्मातील उत्क्रांतीचे तत्वज्ञान हेच सांगते आहे. अगदी ढोबळमानाने एखाद्या एकपेशीय जीवापासून उत्क्रांती होत होत सजीव तयार झाले असा थोडक्यात सिद्धांत !हिंदू धर्मातील तत्वज्ञान काय सांगते ? सप्तपाताळ, मानवलोक आणि सप्तस्वर्ग हे काय आहे ?
लक्ष चौऱ्यांशी जन्मांनंतर मनुष्य जन्म लाभतो, म्हणजे काय ? डार्विनला फक्त देहाचीच उत्क्रांती सांगता आली. हिंदू धर्मात देहाबरोबरच त्याचे पूर्वकर्मफल, पापपुण्य अशा अनेक गोष्टींचा एकत्रित विचार केलेला आहे. विज्ञानाला मनुष्य जन्मापर्यंतच उत्क्रांती सांगता आली आहे.
पण आपल्या धर्माने मात्र पुढे भू:, भुव, महा, जन , तप आणि सत्य लोक / स्तर असे नंतरच्या उत्क्रांतीचे टप्पेही सांगितलेले आहेत . माणसाच्या मृत्यूनंतर त्याचा देह ( कोष ) गळून पडला तरीही प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, ज्ञानमय हे कोष तसेच राहून पुढे प्रगती करतात.
मनुष्यदेहातील पाणी, वायू, अग्नी, आकाश या ऊर्जा (energy ) असल्याने law of conservation of energy नुसार त्या नष्ट न होता अनंतात विलीन होतात म्हणजे एका मोठ्या कोषात ( Universal Reservoir ) खेचल्या जातात. शरीराचे material जळून ते अन्य अनेक materials मध्ये रूपांतरित होते.
२) आपण नेहेमी ऐकतो की "विज्ञानाची इतकी प्रगती झाली आहे की आता माणसाची पावले चंद्रावरसुद्धा उमटली "! पण एक अतिशय महत्वाची गोष्ट आपण विसरतो.माणसाचे चंद्राला पाय जरी लागले तरी त्या चंद्रामुळे पृथ्वीवर येणारी भरती आणि ओहोटी बंद झालेली नाही. त्याचा आपल्यावर होणारा परिणाम बदललेला नाही
३ ) माणसाचा देह हे जरी material असले तरी आत्मा ही नष्ट न होणारी शक्ती आहे. येथे एक महत्वाचा फरक असा की या शक्तीलाही एक किंवा अनेक जन्मांमधून तयार झालेल्या आसक्ती, भावभावना, इच्छा असतात. हिंदू तत्वज्ञानानुसार
जिवंत माणूस हा त्याच्या, देह सोडून गेलेल्या पूर्वजांच्या आत्म्यांच्या साखळीचाच एक भाग असतो. ४ ) अत्यंत महत्वाची गोष्ट - माणसाच्या देहाच्या आकाराच्या प्रमाणात त्याला कमी अधिक अन्न लागते. पृथ्वीवरील भौगोलिक भागाप्रमाणे त्याच्या अन्नाच्या आवडीनिवडी आणि प्रमाण बदलू शकते.
पण देह सोडल्यावर आत्म्याला अन्नाचा केवळ वास पुरेसा असतो. त्यामुळे तेथे quantity ला स्थानच नसते. त्याच्या वासानेच तो तृप्त होतो म्हणूनच आत्म्याला ठेवल्या जाणाऱ्या
जेवणाच्या पानावर वासापुरते थोडेथोडे अन्न वाढले जाते. .
त्याचप्रमाणे त्या आत्म्याला अन्नातील नक्की कुठला रस आवडेल याची कल्पना नसल्याने चवीच्या सर्व रसांचे म्हणजे- कडू, गोड, तिखट,खारट,तुरट आणि आंबट अशा सर्व चवीचे पदार्थ श्राद्धाला केले जातात. उदा - कारल्याची भाजी, आवळ्याची-आमसुलाचे चटणी, लाडू-खीर, वडे, गवार - भोपळ्याची भाजी इ.!
तीव्र मधुमेह असलेल्या माणसाने जिवंतपणी गोड खाणे पूर्ण बंद केले असले तरी अशा व्यक्तीच्या मृत्युनंतर, त्याला ते बंधन पाळायची गरज नसते. त्यामुळे त्याचाही विचार करावा लागत नाही. ५ ) आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या शास्त्रात पितरांच्या ३ पिढ्यांना आवाहन केले जाते.
तथापि त्याबरोबरच कुटुंबातील त्या आधीच्याही मोक्ष / मुक्ती / सद्गती न मिळलेल्यांना, ज्यांच्यावर रीतसर दहनसंस्कार होऊ शकले नाहीत अशांना, गर्भातच मरण पावलेल्यांना, तसेच विविध अवस्थेत मृत पावलेल्यांना अन्न / पिंड दिले जातात. शस्त्राघाताने मृत्यू आलेल्या, घातपाताने मरण आलेल्या,
संन्यास घेतलेल्या इत्यादी पूर्वजांसाठी करायच्या श्राद्धासाठी विशिष्ट दिवस राखून ठेवण्यात आले आहेत.

६ ) एखाद्याने संगीताचे उत्तम प्रशिक्षण घेतले तर तो अधिक चांगले गाऊ शकतो. पण म्हणून बाकीच्यांनी गाऊच नये असा नियम नाही. म्हणूनच श्राद्धासाठी जर जाणकार पुरोहित मिळाला नाही,
जेवणासाठी शात्रोक्तपणे पदार्थ करता आले नाहीत, सगळी कर्मकांडे करणे शक्य झाले नाही, कुठल्याही कारणामुळे परवडत नाही असे असेल तरी अत्यंत श्रद्धेने अर्पण केलेला अन्ननैवेद्य पितरांना नक्कीच पोचतो.
अशा प्रकारे पितरांची आठवण करून त्यांना काही अर्पण करण्याची पद्धत सर्वच धर्मात अस्तित्वात आहे. फक्त हिंदू धर्मातच त्याची सर्वाधिक कुचेष्टा केली जाते.
७ ) कांही जणांना वाटते कशावरून हे सर्व पितरांना पोचते ? एक विचार करा, आपण देवाला, भरभरून देण्याची प्रार्थना करतो आणि
पाच पेढ्यांचा नैवेद्य दाखवतो. तो देवापर्यंत पोचतो की नाही याचा विचार कधी करतो का ? किंबहुना तो पोचतच नाही कारण तो प्रसाद म्हणून आपणच खातो. म्हणूनच आपण त्याला शब्दही नैवेद्य "दाखविणे" असाच योजला आहे.जर आपण ३६४ दिवस पितरांसाठी काहीही करीत नाही.
मग केवळ सर्वपित्रीच्या एक दिवशी सर्व पितरांसाठी मिळून चमचा चमचा वाढलेल्या अन्नाचा इतका विचार कशासाठी करायचा ? समजा पितरांपर्यंत नाही पोचले तरी कावळा आणि इतर पक्षी, कीटक, प्राणी हे तरी ते अन्न
खातीलच ना ?
८ ) हल्ली मृत माणसांच्या नावाने, वृत्तपत्रांमधून वर्षानुवर्षे त्यांचे फोटो, कविता, श्रद्धांजलीचा मजकूर अशा गोष्टी हजारो रुपये खर्चून छापून आणल्या जातात. अगदी कळकळीने भावना व्यक्त केलेल्या दिसतात. व्हॉट्स ऍप, फेसबुक यावरूनही हे मेसेज फिरतात.
कशावरून ते या मृत व्यक्तींना / पितरांना पोचते, असा प्रश्न कुणीही विचारात नाही. त्यापेक्षा या जाहिरातींचे हजारो रुपये, गरिबांना द्या, असे कुणीही का म्हणत नाही ? बहुतेक सगळी वृत्तपत्रे ही फक्त हिंदूंच्याच बाबतीत पुरोगामी आहेत.
पण ती देखील असल्या जाहिराती छापून पैसे कमविण्याचा धंदा करतातच ना ! ९ ) आपल्या धर्मानुसार या आत्म्यांना अन्न अर्पण करणे फार महत्वाचे मानलेले आहे. त्या ऐवजी कांही मंडळी कोरडा शिधा ( तांदूळ, गहू, साखर, डाळ इत्यादी ) अर्पण करतात. एखादा अत्यंत भुकेला माणूस तुमच्या पुढे उभा आहे.
त्याला त्यावेळी तुम्ही जरी १ / १ गोण भरून हे पदार्थ दिलेत तर त्यावेळी त्याची भूक भागेल का ? ते तुमचे पुण्यकर्म ठरेल पण श्राद्ध मात्र नक्कीच ठरणार नाही !
१०) तुमच्या दिवंगत आईवडिलांनी तुम्हाला अगदी स्पष्ट सांगितले असेल / लिहून ठेवले असेल की त्यांचे क्रियाकर्म, श्राद्ध करू नका,
तरीही त्यांच्या मृत्युनंतर या गोष्टी तुम्ही नक्कीच करा. कारण माणसे असे कांही सांगतात तेव्हां त्यांचे विचार हे इथल्या अनुभवानुसार आणि ज्ञानानुसारच असतात. पण निधनानंतर परलोकात गेल्यावर आपण असे सांगून चूक केली आहे,
असे जर त्यांच्या लक्षात आले तर ते तुम्हाला पुन्हा येऊन " माझे श्राद्ध कर रे बाळा " असे सांगूच शकत नाहीत. त्यामुळे हजारो वर्षे आपल्या धर्मात अस्तित्वात असलेले विधी, एक दिवस करायला काय हरकत आहे ?
११) दिवंगत पूर्वजांच्या स्मृतीप्रित्यर्थ एखाद्या संस्थेला देणगी देणे, पाणपोई /
विहीर बांधणे, मंदिराला दान देणे ही सर्व खूप मोठी सत्कार्ये / पुण्यकर्मे आहेत. पण हे श्राद्धाला पर्याय नक्कीच नाहीत.

१२ ) तुमची जन्मपत्रिका अचूक असेल तर त्यातील ग्रहस्थिती ही तुमचे जन्म घेताना असलेले गुण दाखविणारे प्रगतीपुस्तक असते. त्यावरून तुमचे आयुष्य कसे असू शकेल याचे
केवळ अनुमान करता येते. पण तसेच अचूक घडत नाही. ते तुमचे भविष्य नसतेच मुळी ! कारण तुमच्या आयुष्यात चांगल्या कर्तृत्वाने तुम्हाला अनेक गोष्टी पूर्ण बदलता येतात. किंबहुना तेच करण्यासाठी तुम्ही जन्म घेतलेला असतो. आधीच्या इयत्तेतील प्रगतीपुस्तक हे तुमच्या तोपर्यंतचे "कर्मफळ" दाखविते. .
पुढच्या इयत्तेत तुम्ही जोरदार अभ्यास करून सुवर्णपदकही जिंकू शकता. म्हणूनच अत्यंत अशिक्षित, गरीब आणि मागास भागात जन्मलेला माणूसही खूप मेहेनतीच्या जोरावर डॉक्टर, सनदी अधिकारी, वैज्ञानिक झालेला पाहायला मिळतो. रिक्षावाल्याची मुलगी सिए,
भांडीवाल्या बाईचा मुलगा कलेक्टर, हमालाची मुलगी डॉक्टर झालेली आपण पाहतो. कर्माचे फळ सांगणारा कर्मविपाक सिद्धांत हा असा आहे.
१३ ) मेटा सायन्सचे श्री. जॉर्ज मिक यांनी लिहिलेले " आफ्टर वुई डाय व्हॉट देन ?" नावाचे एक पुस्तक आहे.
त्याचा मराठी अनुवाद ( " मृत्यूनंतर होते तरी काय? अनुवाद- पद्मा कुलकर्णी ) पुण्याच्या प्रसाद प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे. त्यात मिक यांनी या विषयावर जगभर केल्या गेलेल्या शेकडो वैज्ञानिक प्रयोगांची माहिती दिली आहे. यात आत्म्याची छायाचित्रेही दिली आहेत.
त्यात हिंदू तत्वज्ञानाचा पुसटसा उल्लेखही केलेला नाही. तरी त्यांचे सर्व निष्कर्ष मात्र , हिंदू धर्मांतील या विषयीची सर्वच्या सर्व अनुमाने खरी आहेत यावर शिक्कामोर्तब करतात. ज्या ख्रिश्चन धर्मात पुनर्जन्मच नाही, तो धर्म मानणारे शास्त्रज्ञ मात्र या विषयावर संशोधन करायला कचरत नाहीत
त्यात हिंदू तत्वज्ञानाचा पुसटसा उल्लेखही केलेला नाही. तरी त्यांचे सर्व निष्कर्ष मात्र , हिंदू धर्मांतील या विषयीची सर्वच्या सर्व अनुमाने खरी आहेत यावर शिक्कामोर्तब करतात. ज्या ख्रिश्चन धर्मात पुनर्जन्मच नाही, तो धर्म मानणारे शास्त्रज्ञ मात्र या विषयावर संशोधन करायला कचरत नाहीत
मात्र या विषयावर आपल्याकडे सुसंगत सिद्धांत असूनही त्यावर संशोधनच होत नाही. आपल्याकडे या सर्व गोष्टी भंपकपणा, अवैज्ञानिक, अंधश्रद्धा म्हणून आधीच फेटाळल्या जातात. ज्याचे पुरावे आपल्याला सापडले नाहीत किंवा शोधता आलेले नाहीत " त्या गोष्टी असूच शकत नाहीत "
असे आपल्याला म्हणता येणार नाही हे सर्वात महत्वाचे आहे.
मकरंद करंदीकर यांच्या लेखणी द्वारा
makarandsk@gmail.com
🙏
Missing some Tweet in this thread?
You can try to force a refresh.

Like this thread? Get email updates or save it to PDF!

Subscribe to नेत्रा डाऊ 🙏🇮🇳
Profile picture

Get real-time email alerts when new unrolls are available from this author!

This content may be removed anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just three indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!