, 12 tweets, 3 min read
My Authors
Read all threads
महाराष्ट्रात सरकार बनवण्यासाठी काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी या पक्षांनी एकत्र बसून सरकार बनवण्याची तयारी केली होती. शिवसेनेचे ५६, राष्ट्रवादीचे ५४ व काँग्रेसचे ४४ अशी १५४ आमदारांची संख्या अधिक पाठिंबा दिलेले अपक्ष सभासद मिळून ही संख्या १६९-७० च्या आसपास जाते.
मला सकाळी साडेसहा-पावणेसातला एका सहकाऱ्याने टेलिफोन करून कळवले की आम्हाला इथे राजभवनला आणले गेले आहे. एवढ्या सकाळी मा. राज्यपाल बाकीचे सगळे कार्यकर्म सोडून तयार होते, महाराष्ट्राच्या राजभवनाची कार्यक्षमता फारच वाढली याचा मला आनंद झाला.
महिती घेतल्यावर कळले की अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे काही सदस्य त्याठिकाणी गेले आहेत. नंतर टेलिव्हिजनवर पाहिलं की देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
अजित पवारांचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या धोरणाच्या पूर्णपणे विरोधात असून शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र आहे. पक्षाचा विधिमंडळ सभासद किंवा कुठलाही प्रामाणिक कार्यकर्ता भाजपसोबत सरकार स्थापण्याच्या प्रक्रियेत सहभागी राहणार नाही याचा मला विश्वास वाटतो.
देशात पक्षांतरबंदी कायदा आहे. या कायद्याच्या तरतुदी बाहेर पडणाऱ्या सदस्यांना लागू होतात. त्यांचं सदस्यत्व जाण्याचा धोका आहे. महाराष्ट्रात जनमत भाजपविरोधी आहे. सर्वसामान्य माणूस त्यांच्या भूमिकेला पाठिंबा देणार नाही.
या सदस्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि पुन्हा निवडणुका घेतल्या तर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या वतीने त्या व्यक्तीचा पराभव करण्याची काळजी या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून घेतली जाईल याचा मला विश्वास आहे.
आमच्या माहितीप्रमाणे १० ते ११ सदस्य त्या शपथविधीमध्ये सामील झाले होते. ते सदस्य कोण त्यासंदर्भात फोटो व टेलिव्हिजन पाहिल्यानंतर लक्षात आलेलं आहे आणि हा प्रकार घडल्यानंतर त्यातील काही सदस्यांनी आमच्याशी संपर्क साधायला सुरुवात केली आहे.
डॉ. शिंगणे जे बुलडाणा जिल्ह्यातून निर्वाचित आमदार आहेत. राजभवनावरून त्यांची सुटका झाल्यानंतर ते माझ्या घरी आले. या पत्रकार परिषदेत डॉ. शिंगणेंसह संदीप क्षीरसागर, सुनील भुसारा या आमदारांनी त्यांना कशाप्रकारे अंधारात ठेवून अजाणतेपणे राजभवनावर नेलं गेलं हे विशद केले.
राष्ट्रवादीच्या निर्वाचित ५४ सदस्यांच्या साक्षांकित याद्यांपैकी दोन याद्या विधिमंडळ नेता म्हणून अजित पवार यांनी आपल्या ताब्यात घेतल्या व अंदाज आहे की कदाचित त्या राज्यपालांना सादर केल्या असाव्यात. त्याआधारे राज्यपालांनी आकडा पूर्ण झाला असं समजून शपथ दिली असावी.
त्या सह्या पक्षाच्या अंतर्गत कार्यक्रमासाठी घेतलेल्या होत्या. सरकार बनवण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी नव्हत्या. या ५४ जणांचा पाठिंबा त्यांना आहे असं भासवल्याची शंका आहे आणि तसं असेल तर तीसुद्धा माननीय राज्यपालांची फसवणूक झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्थितीचा आढावा घेतल्यानंतर मला पूर्णपणाने विश्वास आहे की उद्या मा. राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्याच्या दृष्टीने जो दिवस सांगितलेला आहे त्यादिवशी त्यांना सदनामध्ये बहुमत स्पष्ट करता येणार नाही. त्यासाठी आवश्यक ती फिगर त्यांच्याकडे नाही.
स्पष्टता आल्यानंतर सरकार बनवण्याच्या दृष्टीने तिन्ही पक्षांकडून खबरदारी घेतली जाईल. या सरकारचं नेतृत्व शिवसेनेकडे राहावं या निष्कर्षाशी आम्ही सहमती केली आहे आणि त्यादष्टीने तिन्ही पक्षांसह महाआघाडीतले सर्वजण एकत्र आहोत आणि एकत्र राहणार.
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Enjoying this thread?

Keep Current with Sharad Pawar

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just three indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!