How to get URL link on X (Twitter) App
इथल्या सर्व तरूणांची शक्ती मागे उभी राहिली आणि त्यांच्या कष्टातून स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे हे स्मारक उभे करून एक इतिहास घडला. देशाच्या राजकारणात आणि देशाच्या इतिहासात अनेक माणसे होऊन गेली.
पण साडेतीनशे वर्षांनंतरही ज्या राजाचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात, लोकांच्या अंतःकरणात आजही आहे, असे एकच राजे आहेत ज्यांचे नाव छत्रपती शिवाजी महाराज.. राजे होते पण त्यांची खरी ओळख होती ती म्हणजे रयतेचा राजा, सामान्य माणसांचा राजा.. आणि त्यांचे आज स्मरण करण्याचा दिवस आहे.
एक काळ असा होता की आपले सगळे बाजार हे मुंबई शहरात होते. ते स्थलांतरित करण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्यावेळी विरोधही झाला. व्यावहारिक नुकसान होईल अशी चिंता व्यापाऱ्यांना होती. परंतु आम्ही लोकांची सातत्याने समजूत काढली आणि कृषी बाजार समितीचे कामकाज या प्रांगणात आणले.
जीवनाच्या विविध क्षेत्रात प्रतिकूल परिस्थिती असतानाही ज्या महिलांनी आपले कर्तृत्व दाखवले, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी केला आणि त्या रस्त्याने जाऊ पाहणाऱ्या इतर भगिनींना प्रोत्साहित करण्याचे काम या माध्यमातून केल्याबद्द्ल @ChakankarSpeaks व त्यांच्या सहकाऱ्यांचे मी अभिनंदन करतो.

साथियों, पुरे विश्व में कोरोना की समस्या होने के कारण आज जैसे हम इकठ्ठा हुए ऐसी स्थिति दो सालों में नही थी। भारत सरकारने कुछ गाइडलाइन्स दी थी।
महाविकास आघाडीने अडीच वर्षे उत्तम कारभार केला. अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. कोरोनासारखे राष्ट्रीय संकट असताना आरोग्य खात्याने अतिशय चांगले काम केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी ठरला नाही असे कोणी म्हणत असेल तर ते राजकीय अज्ञान आहे.
In his long and distinguished career in public life, Shri Sinha has served the nation in various capacities and he is eminently qualified to uphold the secular and democratic character of the Indian Republic and its constitutional values.
व्यापारी समाज हा कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर देशाच्या विविध प्रांतांतून कित्येक पिढ्या आधी पुणे भागामध्ये येऊन स्थिरावला. महाराष्ट्र भूमी हीच आपली भूमी मानून उद्योग व्यवसायांमध्ये लौकिक कमावला. त्यामुळे पुण्यातील अर्थकारणाला चालना मिळाली.
जिल्हाध्यक्षांकडून समजले की, दवेच नाही तर महाराष्ट्रातील अन्य ठिकाणाहूनही अनेक लोक भेट घेण्यासाठी इच्छुक आहे. यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांतून नऊ ते दहा संघटनांचे साधारण ४० लोक आले होते. ज्यामध्ये अनेक मुद्दे मांडण्यात आले.
विद्यार्थीदशेच्या काळानंतर अनेक वर्षानंतर मला या वास्तूत यायची संधी मिळाली. मुंबईतील काही वास्तू जगप्रसिद्ध आहेत. त्या जगप्रसिद्ध वास्तूंमध्ये मुंबई विद्यापीठाची ही वास्तू अत्यंत महत्त्वाची आहे. इथल्या वास्तूमध्ये हा आगळावेगळा कार्यक्रम आज इथे घेतला जात आहे.
ही आपल्या राज्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. या नवीन नेत्रालयामार्फतही गरजूंना दृष्टिदान करण्याचे काम डॉ. लहाने अखंडपणे करत राहतील, असा माझा ठाम विश्वास आहे.
स्व. वसंतदादा पाटील यांच्या विचारांमधून हे दालन उभे राहिले. महाराष्ट्र हे शैक्षणिक संस्थेचे प्रमुख द्वार असलेले राज्य आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये शिक्षणाचा विस्तार झाला, मात्र याची प्रामुख्याने जबाबदारी त्या त्या राज्यातील राज्य सरकारने उचलली आहे.
काकासाहेब वाघ यांनी निरपेक्ष वृत्तीने सहकार क्षेत्राची सेवा केली. उत्तर महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात त्यांचे नाव आग्रहाने नाव घ्यावे लागेल. आ. दिलीप बनकर हा कारखाना वैभवास आणून काकासाहेबांचे नाव सार्थ ठरवतील हा विश्वास आहे.
आदिवासी समाज जो पिढ्यानपिढ्या या देशाचा मूळ मालक आहे, त्याची आजची अवस्था बिकट झाली आहे. त्यात परिवर्तनासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला याचा आनंद आहे. यावेळी बिरसा मुंडा यांच्या स्मृतींचे जतन करण्यासोबतच राघोजींच्या क्रांतिपर्वाचा, बागडीच्या माचीचा सन्मान करण्यात आला.