#युवराज्ञी येसूबाई आईसाहेब!
एकोणतीस वर्षे!
एकोणतीस वर्षे ज्या माऊलीने स्वतःला मोगलांच्या कैदेत ठेऊन शिवछत्रपतींचे स्वराज्य अबाधित ठेवले त्या युवराज्ञी येसूबाईंबद्दल इतिहासाला अधिक माहिती नाही हे दुर्दैव कोणाचे?
आपले की इतिहासाचे?
पती जिवंत असतानासुद्धा या पतिव्रतेला काही दिवस विधवेचे सोंग आणावे लागले!
होय, आग्र्याहून सुटल्यावर शिवछत्रपतींनी बाळराजेंना दडवून ठेऊन अफवा पसरवली की बाळराजांचा काळ आला!
मनाची केवढी प्रगल्भता!
त्यानंतर कपटाने आणि फितुरांच्या मदतीने औरंग्याने संभाजीराजांना पकडल्यानंतरही धीरोदात्तपणे परिस्थितीला सामोरे जाणारी, पतीला हाल हाल करून ठार मारल्यावरही स्वराज्याचा गाडा
शिवाजी महाराज नसल्यामुळे आता आपल्याला सहजपणे स्वराज्य ताब्यात घेता येईल हा त्याचा मनसुबा होता. पण संभाजी महाराजांनी तो मनसुबा आपल्या पराक्रमाने उधळला.
महाराज्ञी येसूबाई आईसाहेबांच्या कर्तुत्वाला आणि त्यागाला इथूनच सुरवात झाली.
पुढील ट्विट मध्ये #महाराज्ञी_येसुबाईंनी घेतलेल्या २ महत्वाच्या निर्णयाबद्दल सांगीन
थोडक्यात इतकेच!