मी लोणावळ्याला चाललोय सांगितल्यावर म्हणले, लोणावळ्यापर्यंत दिली तरी चालेल, म्हटलं बसा,
कामशेत ला पोहचलो असेल तर दोन जण चालत चालले होते, त्यांना आमदार साहेबांनी ओळखले, आम्ही गाडी थांबवली,
"आज पायीच?"
"हो, कोणी लिफ्टच देईना आणि पैसे पण नाहीत खिशात, अधिवेशन महत्वाचं
आम्ही पुढं गेल्यावर आमदार साहेबांनी कानात सांगितले, हे पण दोघे आमदारच आहेत, आम्हाला वाईट वाटलं,
पुढं लोणावळ्यात चार आमदार भेटले, त्यांच्याकडे पुणे लोणावळा लोकल पुरते पैसे होते, त्यामुळं ते तिथपर्यंत लोकलने आले होते,
माझ्या बरोबर आलेले आमदार साहेब पण मला धन्यवाद देऊन त्यांच्यामध्ये सामील झाले,
त्यांच्या बोलण्यातून एक गोष्ट समजली की जवळपास सर्वच आमदारांची अशीच अवस्था आहे,
मला सुरवातीला उर भरून आला, पण नंतर वाईट वाटलं, आपल्या महाराष्ट्रातील जनता ही स्वतःची गाडी नसलेले आमदार का बरं निवडून देत असेल हा पण प्रश्न पडला,
गेलाबाजार महागड्या अल्टो, मारुती 800, वॅगन आर, क्विड अशा गाड्या न घेता आल्या तरी निदान कमीतकमी फॉरचूनर सारख्या स्वस्तातल्या गाड्या घेऊन सर्व आमदार विकासाचा वेग बुलेट ट्रेन प्रमाणे वाढवतील