#करोनानंतरचे_विश्व ::
नोवेंबर 19 पासुन खूप गोष्टी बघतोय. करोनाने चीन मध्ये जो उत्पात माजवलाय, त्यांच्या खायच्या सवयी, पोलादी पडदा, सत्य दडपणे, विषाणू निर्मिती/चोरी, जगभरच्या लोकावर/अर्थव्यवस्थेवर त्याचा झालेला परिणाम.
अनेक निगडीत गोष्टी आत्ता सुद्धा घडत आहेत.
माझ्या मते या नंतरचे जग कसे असेल ::
1. WFH - जर 95% जनता घरी बसुन सुद्धा एखादा व्यवसाय तरला आणि फायद्यात राहिला तर त्या व्यवसायात नोकर कपात होणार.
2. WFH - ऑफिसमध्ये एकत्र काम करण्याची पद्धत नामशेष होइल येत्या काळात.
3. WFH - मोठे कमर्शियल पार्कस बनवणे हळुहळु कमी होणार.
4. WFH - डिजिटल कन्नेक्टीविटी/ब्रॉडबँड/होलोग्राफ/ड्रोन/ह्यूमनलेस इत्यादी क्षेत्रातील IT कंपन्या नविन स्टीव जॉब्ज/मार्क ज़ुकर्बर्ग जगाला दाखवतील. यात गुंतवणूक करणारे अब्जोपती होतील.
5. WFH - घरामधील एक कोपरा कोर्पोरेट लूक घेईल. आर्किटेक्ट त्या प्रमाणे बदल सुचवतील.
6. सॅनितायझर, मास्क, विषाणू संसर्ग निरोधक कपडे, लस, संशोधन एत्यादी कंपन्याचा धंदा खुपच वाढेल. यातील गुंतवणूक फायद्याची ठरेल. भारतीय उद्योग याचा फायदा उचलतील.
7. चीन, आपली विश्वासार्हता गेल्यामुळे, माल खपवू शकणार नाही.
8. सिनेमा/नाटक/कॉन्सर्ट थिएटर मध्ये बघणे कमी होऊन नंतर बंद पडेल. हे परफॉरमेंस लाइव ब्रॉडकास्ट होतील. ज्याची किंमत जास्ती असेल रिकॉर्डड परफॉरमेंसपेक्षा.
9. होम स्कूलिंग जास्ती प्रचलीत होइल.
10. रिवर्स मायग्रेशन (शहर ते गाव) सुरु होणार. नोकरी निमीत्त स्थलांतर बंद होइल.
11. सुरक्षित महिना पगाराची हमी राहणार नसल्याने लोकांचे हाल होतील. लोक शेतीकडे वळतील.
12. मॉल/EMI/सोशल मीडियावर "अत्यंत सुखी" दिसण्यासाठी धडपडणारी लोक आता स्वताच्या आत बघू लागतील.
13. मिनीमलिस्तीक लाइफ (अल्पसंतुष्ट) हा नविन मंत्र असेल.
14. स्वच्छ आग्रही आणि त्या उलट असे जगात तट पडतील. उलट गट स्वताच्या हाताने आणि दुराभिमानाने नष्ट होइल.
15. पैसा हा समान विचारधारणा असलेल्या गटातच फिरेल. या गटातील लोकांची उन्नती होइल.
16. तेल हा मोठा आर्थिक घटक रहाणार नाही.
17. या पुढे बायो युध्दे लढली जातील.
18. वैद्यकिय/DNA संशोधन कंपन्याना युध्द साहित्य बनवणार्या कंपन्यासारखे महत्व येइल.
19. काही क्षेत्रे नामशेष होतील जसे हवाई कंपन्या/टूरीझम/क्रूझ वगरे.
* 2008 च्या मंदीनंतर अनेक जण नोकरी घालवून बसले आणि परत जम बसवू शकले नाहीत.
* 2008 च्या मंदी नंतर अव्वाच्या सव्वा पगारवाढ कधी ही झाल्या नाहीत. ही मंदी सगळ्या कोर्पोरेटस नोकरदार मंडळीच्या अपेक्षा कमी करण्यासाठी वापरली.
* 2008 च्या अगोदरची अनेक कामे/तंत्र/नोकर्या आज नाहीत.
* 2008 च्या अगोदरचे धनाढ्य अभावानेच धन टिकवू शकले. काही राष्ट्रांची स्थिती पण तशीच आहे.
*2008 नंतर आलेले काही उद्योग/उद्योजक हे त्या पुर्वीच्या स्थापित उद्योजकापेक्षा खूप पुढे निघुन गेले.
*2008 च्या अगोदर अस्तित्वात नसलेल्या अनेक गोष्टी आज आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत
2020 मधील करोना हा एक फक्त इन्फ्लेक्शन पॉईंट आहे.
या अगोदर सुद्धा अशी वळणे आलेली आणि यापुढे पण नक्कीच येतील.
फक्त अस्तित्व टिकवायचे की टिकवून सफल व्हायचे हे वैयक्तिक रित्या ठरेल. (whether to survive OR thrive !)
शुभम् भवतु !! 卐🚩