-
-
आज १ मे, म्हणजे आपल्या संयुक्त महाराष्ट्राचा विजय दिन, महाराष्ट्राचा स्थापना दिन आणि त्याच बरोबरीने कामगार दिन सुद्धा आहे. महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या आपल्याला सर्वांना शुभेच्छा!
आम्ही घरी किती बसणार? काय करायचं? अर्थचक्र रुतलं, आर्थिक फटका बसणार, बेकारी वाढणार, नोकऱ्या जाणार. हे थोडस खरं आहे. पण प्रत्येक राष्ट्राची आणि राज्याची महत्त्वाची आणि खरी संपत्ती ही त्या राज्याची आणि राष्ट्राची जनता असते. तिला प्राथमिकता द्यायला पाहिजे.
जो ज्या नजरेने बघतो, तसा महाराष्ट्र त्याला दिसतो. कोणी प्रेमाने वागला तर महाराष्ट्र त्याच्यावर प्रेम करतो, जर दगाबाजी झाली तर दगाबाजाचं काय करायचं हे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलं आहे.