My Authors
Read all threads
📌📌📌

आजचा 'महाराष्ट्र टाइम्स'मधील अग्रलेख!

दोन विषाणूंच्या तावडीत

देशात आज सर्वांत जास्त करोनारुग्ण महाराष्ट्रात आहेत आणि महाराष्ट्राचा हा आकडा मुंबईमुळे वाढला आहे. मृतांच्या संख्येची तुलना होऊ शकत नसली, तरी अमेरिकेत न्यूयॉर्कची जी अवस्था झाली आहे, तशी अवस्था (१/१८)
मुंबईची होते की काय, अशी भयशंका यावी, अशी आज स्थिती आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असली, तरी गेले कित्येक आठवडे मुंबईतील करोना व्यवस्थापन पूर्णपणे दिशाहीन आणि ढासळलेले आहे. वांद्रे येथे अचानक जमलेला मोठा जमाव किंवा आजही मुंबईत रेशन पुरविण्यात येत असलेले अपयश, ही त्याची(२/१८)
नमुन्यादाखल दोन उदाहरणे देता येतील. धारावीची परिस्थिती तर दिवसेंदिवस अधिकच बिघडत चालली आहे. अशा वेळी नोकरशाहीत समन्वय असायला हवा. सगळ्यांनी एकदिलाने काम करायला हवे. प्रत्यक्षात मुख्य सचिव अजेय मेहता आणि मुंबई महापालिकेचे नुकतेच उचलबांगडी झालेले आयुक्त प्रवीण परदेशी यांच्यात(३/१८)
चकमकी होत असल्याच्या बातम्या गेले अनेक दिवस सतत येत होत्या. यांच्यात कोण बरोबर आणि कोण चूक, याचा निवाडा करण्यात काही अर्थ नाही; पण सरकारला नेतृत्व देणाऱ्यांची मांड नोकरशाहीवर नाही, हे यातून स्पष्ट होतेच. इतके मोठे संकट आले असताना ही बुद्धिमान आणि कर्तबगार समजली (४/१८)
जाणारी माणसे व्यक्तिगत अहंकारापायी कामाची माती करतात, ही अत्यंत संतापजनक बाब होती. बदली झाल्यावर अशा परिस्थितीत रजेवर जाणे, हा तर गुन्हाच आहे. आता मुदतवाढ मिळालेल्या अजेय मेहता यांचे विश्वासू अधिकारी इक्बालसिंह चहल मुंबईचे कोतवाल झाले आहेत. त्यांनी येताच काही ठिकाणी (५/१८)
भेटी दिल्या आणि सायन हॉस्पिटलच्या डीनची बदली केली. याच हॉस्पिटलमध्ये करोनारुग्ण आणि मृतदेह जवळ जवळ ठेवण्यात आले होते. अशा बदल्या करून आणि अधिकाऱ्यांना रजेवर पाठवून प्रशासनात काही काळ थोडी घबराट निर्माण करता येते. मात्र, त्यातून टिकाऊ तोडगे निघत नाहीत. मुंबई आज अशा (६/१८)
तोडग्यांच्या प्रतीक्षेत आहे. महाराष्ट्राला अस्सल मुंबईकर असलेला मुख्यमंत्री मिळाल्यामुळे मुंबईच्या प्रश्नांकडे जास्त जाणीवपूर्वक पाहिले जाईल, अशी अपेक्षा होती. दुर्दैवाने, करोनाच्या संकटामुळे ही वेळ लगेचच येऊन ठेपली; पण आज मुंबईतील प्रशासन, आरोग्य यंत्रणा, उद्याच्या संभाव्य(७/१८)
संकटांची तयारी करण्यासाठीची पावले, हे सारे पाहिले, तर नैराश्य यावे, अशी स्थिती आहे. आज मुंबईत अनेक आयएएस आणि ज्येष्ठ आयपीएस अधिकारी केवळ पोस्टिंगची वाट पाहत बसून आहेत. अशा संकटात एका दिवसात त्यांना सगळ्या कामात सामावून घेण्याची गरज होती. मुंबईत देशातील दिल्लीनंतरची (८/१८)
सगळ्यांत जास्त केंद्रीय कार्यालये आहेत. याशिवाय, नौदल, तटरक्षक दल, कस्टम्स, निमलष्करी दले हे सारे आहेत. त्यांची मदत घेऊन गेल्याच महिन्यात पोलिस; तसेच इतर प्रशासनाच्या कामात सुसूत्रता आणता आली असती. मुंबईत आजही हजारो कुटुंबांना पुरेसे रेशन मिळत नाही. स्थानिक नगरसेवक, (९/१८)
आमदार, अधिकारी आणि वाटप यंत्रणा यांच्यात कोणताही समन्वय नाही. आज मुंबईतून जे हजारो स्थलांतरित हजारो मैल चालण्याची मानसिक तयारी करून बाहेर पडत आहेत, तेही मुंबईच्या प्रशासनाचे आणि नोकरशाहीचे अपयश आहे.

या स्थलांतरितांना त्यांच्या राहण्याच्या ठिकाणीच दिलासा मिळायला (१०/१८)
हवा होता. आज मुंबईच्या सात झोन्सची जबाबदारी सात आयएएस अधिकाऱ्यांकडे देण्यात आल्याचे सांगण्यात येते. हे अधिकारी नेमके काय काम करीत आहेत? त्यांना आपापल्या विभागांतील परराज्यांतील मजुरांची काळजी का घेता आलेली नाही? आज मुंबईत परदेशांतून आणल्या जाणाऱ्या भारतीयांसाठी तीन (११/१८)
हजारांपेक्षा अधिक हॉटेल रूम्स बुक करण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यांच्यासाठी ही व्यवस्था करायला हवी. त्यात दुमत होण्यासारखे काही नाही. मात्र, जे आपल्याच राज्यातून निर्वासित होऊन चालले आहेत, त्यांच्यासाठी मुंबईचे प्रशासन आणि नोकरशहा काय करीत आहेत? लॉकडाउन सुरू झाल्यानंतर(१२/१८)
आता जणू दोन-चार विभाग आणि खाती सोडली, तर इतर कुणाला काही कामच नाही, अशा प्रकारचे वातावरण तयार करण्यात आले. महाराष्ट्रात जवळपास साडेतीनशे आयएएस अधिकारी असताना त्यांच्यातील १५० अधिकाऱ्यांचा कोव्हिड संकटातील कामाशी काही संबंधच नाही, अशी स्थिती आहे. खालच्या प्रशासकीय (१३/१८)
अधिकारी व कर्मचाऱ्यांचे तर काही विचारायलाच नको. या साऱ्यांच्या जबाबदाऱ्या आणि कामांचे फेरवाटप तातडीने होण्याची गरज होती. मुंबई आज हाताबाहेर जाताना दिसते आहे, त्याचे एक महत्त्वाचे कारण राज्य सरकार साऱ्या ताकदीनिशी, सगळ्यांना सोबत घेऊन आणि कल्पकतेने सामाजिक संस्थांना कामात (१४/१८)
सामावून घेऊन वाटचाल करीत नाही, हे आहे. मुंबईत स्वत:हून अन्नछत्र चालविणाऱ्यांना ते चालवू नका, असे सांगणे, काही संस्था-संघटनांना कामातून दूर ठेवणे, लोकप्रतिनिधींच्या चांगल्या सूचना न ऐकणे आणि वरिष्ठ; तसेच कनिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये बिलकुल समन्वय व संवाद नसणे यामुळे आपत्ती (१५/१८)
व्यवस्थापन कसे असू नये, याचा वस्तुपाठ मुंबईत घालून दिला जात आहे.

केवळ पडद्यावर आश्वासक व गोड बोलून चालत नाही; तसेच बॉलिवूडच्या पीआर कंपन्या नेमून प्रतिमासंवर्धन करूनही भागत नाही. अशा आव्हानांना मैदानात उतरून आणि झारीतल्या शुक्राचार्यांचा कठोरपणे (१६/१८)
बंदोबस्त करून भिडावे लागते. मुंबईत आज तसे काहीच होताना दिसत नाही. चांगली माणसे केवळ आपापल्या परीने झुंजत आहेत; पण त्यातून 'सिनर्जी' तयार करण्याचे भान कुणालाही नाही. मुंबईच्या नशिबी कायमच कमअस्सल, ढिसाळ आणि निव्वळ मतलबी कारभारी व अधिकारी यावेत, हे दुर्दैव करोनासंकटाइतकेच (१७/१८)
भयानक आहे. हा विषाणू उद्या आटोक्यात येईल; पण 'करो-ना' या मुंबईतल्या विषाणूचे काय?
---------------
हेच तर सांगायचे आहे. एकाला विरोध म्हणून पात्र नसलेल्या दुसऱ्याला 'हिरो' बनवण्यात अर्थ तो काय? (१८/१८)
हा अग्रलेख असून मटाच्या संपादकीय मंडळाने लिहीलेला आहे. कृपया सर्वांनी याची नोंद घ्यावी. त्यातील गांभिर्य जाणून तसेच विचार पटत असल्याने तो थ्रेड रूपाने शेअर करत आहे. 🙏
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Enjoying this thread?

Keep Current with प्रथमेश सुभाष राणे.

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!