"मराठी शाळा की इंग्रजी शाळा?" वादात हरवलेलं "शिक्षण" केंद्रित व्हिजन
+
आता मराठी शाळेत जाणारं पोर म्हणजे "पालकांना इंग्रजी शाळा अजिबात परवडू शकत नाही म्हणूनच!" - असं चित्र आहे. आमच्याकडे घरकाम करायला येणाऱ्या ताई - ज्यांचा नवरा रिक्षा चालवतो - आपल्या दोन्ही मुलांना +
त्यावरून ह्या परिवर्तनाची व्याप्ती लक्षात येते.
हे उगाच घडलेलं, वरवर निर्माण झालेल्या "गैरसमजांपोटी" झालेलं परिवर्तन नाही.
आपण शाळेत जातो - कारण आपल्याला जगाबद्दल खूप काही शिकायचं, जाणून घ्यायचं असतं +
मग हे असं शिकलेले पोरं "भारतीय" नसतात, "मातृभाषेतून" शिकलेले नसल्याने +
आणि - माईंड यू - हे कमी पडणं फक्त "इंग्रजी भाषेतील शिक्षण" ह्या अनुषंगाने अजिबातच नाही. बदलत्या काळानुसार पालकांच्या शाळेकडून असणाऱ्या अपेक्षा झपाट्याने बदलत गेल्या. +
माझ्या लहानपणी मला जसे शिक्षक होते, तसे शिक्षक आज मराठी शाळांमध्ये खरंच दिसत नाही. आणि हे आपल्या डीएड-बीएड ची व्यवस्था बघता अगदीच साहजिक आहे. +
इंग्रजी अस्खलित असणं ही गरज आहेच - पण ती अनेक गरजांपैकी एक आहे. मराठी शाळांनी ह्या गरजा भागवल्या तर पालक मराठी शाळा कधीही प्राधान्यानेच निवडतील! +
ह्या सगळ्या माझ्या अपेक्षा असतात. +
त्यामुळे आज जेव्हा मराठी शाळा की इंग्रजी - ही चर्चा होते तेव्हा "माध्यम" वर असलेला फोकस अगदीच चुकीचा असतो. फोकस - +
मीसुद्धा मराठी माध्यमांत शिकलो. पण मला इंग्लिशचे शिक्षक अत्युत्कृष्ट लाभले. (माझ्या आईने जालन्यात इंग्लिश मॅथ्स चा पाया पक्का केलेल्या कितीतरी बॅचेस घडवल्यात.) ८ वी ला सेमी इंग्लिश घेतलं. १२ वी नंतर चेतन भगत वाचायला घेतला. +
पण -
माझ्या एमबीएतील सवंगड्यांइतकं ग्लोबल व्हिजन माझं नव्हतं - हे कटू सत्य कसं नाकारू? +
माझी स्पर्धा "फटाकडी इंग्रजी बोलणाऱ्या" मुलांशी नसते. "चतुरस्त्र ज्ञान असणाऱ्या" मुलांशी असते. +
व्योमला मी मराठी माध्यमांत घातला तो "अस्मिता" वगैरे म्हणून अजिबात नाही. व्यावहारिक गरजेपोटी. +
व्योमने इंग्रजाळलेलं मराठी बोलू नये, त्याला मराठी, भारतीय संस्कार असलेलं शिक्षण मिळावं ही मनापासूनची कळकळ आहेच. पण तरीही - मराठी शाळेची निवड केली, निवड करू शकलो - कारण मला चांगली शाळा मिळाली! +
ते एकदा साध्य झालं की पालक मराठी शाळांवर तुटून पडतील - आपोआप.
आपण होऊन.
: ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com