हा विषय मोदी-भाजपच्या आधीपासूनचा आहे. आणि, दुःख होईल, बोचरं वाटेल पण - +
नाही.
रॉ मटेरियल, स्पेअर पार्टस तयार करणाऱ्या किती कंपनी उभ्या राहिल्या? तुम्ही आम्ही आपण होऊन सुरू केलेल्या नव्हे - +
हे सगळं बोलण्यास सुरू करण्याचा अवकाश की लगेच "इथले अधिकारी वाईट आहेत" हे म्हटलं जातं. मग? +
सत्तेत नव्हते तेव्हा सगळ्या गोष्टींसाठी काँग्रेस जबाबदार होती, सत्तेत आल्यावर अधिकारी अन जनता जबाबदार असते. हे सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्याने म्हटलं तर सोडून देऊ, इथले समर्थक हे असले तर्क दामटतात याचं आश्चर्य वाटतं.+
कशाच्या आधारावर घडणारे? इन्फ्रास्ट्रक्चर आहे का? लॉजीस्टिक्स, सप्लाय चेन आहे का? आर अँड डी आहे का? बेसिक केमिकल्स तयार होतात का? चिप्स तयार होतात का? प्रोग्रामिंग होतं का? +
अर्थात, सर्वांवर होकारार्थी उत्तरं देण्याइतकी उदाहरणं आहेतच आपल्याकडे. आणि त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. मुद्दा हाच आहे - +
त्याहून मोठा क्रूर विनोद आहे स्टार्ट अप जगाचा. यावर बोलावं तेवढं कमी आहे. +
अजून खूप काही आहे लिहिण्यासारखं. पण नकारघंटा वाजवून काहीही होणार नाही, म्हणून रडत नाही. +
तूर्तास इतकंच, की - +
तुम्ही स्वदेशी आहात की चायनीज हे मार्केटमध्ये कुणीही बघत नाही.
कॉस्ट-प्राईस-प्रॉफिटच्या गणितात जो धंदा सरस, तो टिकणार. बाकीची भाषणं कामाची नसतात. +
: ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com