मी परमेश्वर आहे आणि माझ्या पायावर डोस्की आपटली कि मी तुम्हाला मोक्ष देतो असला काहीही भंपकपणा न करणारा हा धर्म संस्थापक वेगळाच.
ज्या धर्मातून असमानता, विषमता, शोषण या सगळ्यांतून बुद्धाने बाहेर पडूनही त्या धर्माचा , माणसांचा द्वेष
2)
आपल्याला आपल डोक वापरायला सांगतो म्हणून आपल्याला बुद्ध जवळचा वाटतो आणि त्याला समजून घ्यायला त्याच्या प्रतिमेची भव्यता आडवी येत नाही ना तीच दडपण येत.बुद्ध कायमच अस हाताला धरून चालवणाऱ्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत सगळीकडं भेटतो.
3)
ज्यांना बुद्धाच तत्वज्ञान आणि आपल्या बुद्धीचा वापर अडचणीचा वाटला त्यांनी त्याला थेट विष्णूचा अवतार बनवून टाकला.
तरीही ह्या सगळ्यांना पुरून उरला तो बुद्ध.
4)
म्हणूनच आज सगळ्यात जास्त बोधकथा सांगितल्या जातात त्या बुद्धाच्या ज्यात माणसांच्या जगण्याच तत्वज्ञान असतय.
बुद्ध जवळचा वाटतो तो ह्यासाठी.
5)
आनंद शितोळे....