My Authors
Read all threads
प्रवास वर्णन

२०१७-२०१८ चा नागालँड दौरा, एक अनुभव!

पहिल्या वर्षी तेनिंगला गेले नाही ह्याच शल्य फार मोठ होत कारण आल्यावर जो तो विचारे, "तेनिंगला नाही गेलीस?" मग ह्या वर्षी जायचच अस ठरवलं होत. त्या प्रमाणे दीमापूर वरून तेनिंगला जायला आम्ही सज्ज झालो होतो. आम्ही म्हणजे मी स्वतः +
आमचे संभाग प्रमुख श्री अभिनय बोरकर, ईशान्य वार्ताचे संपादक श्री रानडे,डोंबिवली छात्रावास प्रमुख यांच्या सौ.स्नेहलता कुलकर्णी आणि आमची लाडकी लेक पिपीना व तिचा भाऊ मैरवी.कुठे जात नसले तरीही ह्या मुलांना गाडी लागतेच!म्हणजे गाडीत बसल की व्याक व्याक होतच. काहींना तर रेल्वे ही लागते, +
फक्त त्यात व्याकत नाही कुणी इतकच. तेनिंगला आम्ही नागालँड स्टेट ट्रान्सपोर्ट (NST) ने प्रवास करायचा ठरवला होता. खूप कौतुक ऐकल होत तिच. हिरवळीतल्या राज्याची ही राणी पण हिरव्या रंगाची आहे. साधारण ४२ सीटची सोय असलेली बस दीमापूरला आम्ही डेपो मधुन पकडणार होतो.+
छात्रावासाचा ड्रायव्हर लुंग्ची आणि नियाम्बोई आम्हाला सोडायला आले होते.सकाळी सहा वाजता बस सुटणार होती.डेपोत आल्यावर ह्या दोघ अनुभवी मुलांनी बस शोधून काढली.सहा वाजत आले तरी ड्रायव्हर काही दिसत नव्हता. आम्हाला खट्याळ हसत दोघांनी प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.+
आमची आरक्षणं मधल्या सीटवर आलेली बघून हायस वाटलं होतं कारण तिकडच्या रस्त्यांची अवस्था डोंगर की पाणी ह्या खेळासारखी असते. पोरीला गाडी लागणार म्हणून तिला खिडकी जवळ बसवल. तिच्या बरोबर गप्पा मारायला मिळाव्या म्हणून मधे मी आणि माझ्या शेजारी काकु बसल्या होत्या. +
मागच्या सीटवर श्री. बोरकर, रानडे काका आणि मैरवी बसला होता. गाडी डेपोमधून किरकोळ मेंटेनन्सची कामं करून साडे सहा वाजता बाहेर पडली. साधारण १३० किमी अंतरावर असलेले तेनिंग पार कारायला कमीत कमी आठ तास आणि जास्तीत जास्तं कितीही वेळ लागू शकतो ह्याची कल्पना आम्हा सर्वांना होती.+
जालुकीला गाडी भात खायला थांबते. सर्वांच यथेच्छ पोट भरेपर्यंत शांतपणे जेवण करायची मुभा ह्या प्रवासात असते. आम्ही जसजसे पेरेन जवळ आलो तसा पाउस आणि गार वारा सुरू झाला होता. एप्रिल मे दरम्यान तुम्हाला तीनही ऋतूंचा आनंद तिथे घेता येतो. पेरेनला गाडी साडेबाराच्या दरम्यान आली. +
आपण स्वर्गात असल्याच सुख अनुभवायला मिळत होत. सगळीकडे दाट धुकं. पांढरे शुभ्र ढग खाली उतरलेले आणि आपण ढगात. इथपर्यंत प्रवास एस्सेल वल्ड को जाऊंगा मैं असा छान झाला होता. हिरव्या कंच जंगलातून आणि उंच घाटातून जायची मजाच वेगळी. +
पुढचा प्रवास फार तर वीस एक कि मी चा बाकी होता पण आता प्रचंड पावसाला सुरुवात झाली होती. रस्ते नसल्याने सगळीकडे चिखल झाला होता. ह्या भागात रोज गाडी चालवून आपला उदरनिर्वाह करणाऱ्यांना खरच अवॉर्ड दिल पाहिजे अस माझ ठाम मत आहे. पेरेन मधे तिथले लोकल आवळा बोरं घेऊन आम्ही निघालो.+
एव्हाना गाडी संपूर्ण भरली होती. लोकं उभ्याने प्रवास करत होते. एक दिवस आड ह्या रस्त्यावर धावणारी ही एकच बस आहे,बाकी सुमो सारख्या गाड्या रोज असतात.

प्रचंड पाउस असल्याने खिडकी उघडणे शक्य नव्हते. खूप ठिकाणी गाडी गळत असल्याने लोकं ते शांतपणे टाळत प्रवास करत होते.जालुकीला एक जण चढला+
जो आमच्या शेजारच्या सीटवर बसला होता.इतक्या थंडीत मोदु न घेता कोण बाहेर पडेल!काचा बंद असल्याने गाडीत घमघमाट सुटला होता.समोर उभी असणारी एक व्यक्ती आम्हाला निरखून बघायचा प्रयत्न करत होती.आम्ही बघितले की ति घोंगडीत डोक घालत आणि नंतर हळुच डोक वर काढुन बघत असे. +
मी एक क्युट स्माईल दिल पण परत बघितलच नाही.पुढे गाडी मुंगीच्या पावलाने न्यु तेसनला आली. तिथे प्रत्येक दुकानाच्या समोर शंभर लिटरचे ड्रम दिसत होते. मला वाटलं इकडे पाण्याची कमतरता असेल. जवळ गेल्यावर समजल त्यात मासे होते जीवंत विकायला. धो धो पावसात जाउन बर्याच लोकांनी ते खरेदी केले.+
गाडी आतमधून पूर्ण भिजली होती पण आम्ही निश्चिंत होतो, आमच्या सीटवर पाणी पडत नव्हतं.आमच्या शेजारच्या बाकावर बसलेल्या त्या फुल्ल टाईट वाल्या जवळ बसलेल्या नाजुकशा काकूंनी पण एका प्लास्टिकच्या पिशवीत मासे घेतले आणि आपल्या पायाजवळ ठेवले.बराच वेळ झाला पण चालक आणि वाहक कोणीच दिसेनात.+
खूप वेळ म्हणजे पाऊण एक तास लोकं गप्प बसली, नंतर शोधाशोध सुरू केली तर जरा अजून पुढे आमचे सारथी सिगारेटचा धुर सोडत कॅरम खेळण्यात व्यस्त होते. कुणीही चिडल नाही. शांतपणे गाडी पुढे जायला निघाली. आता पर्यंत पावसाने गाडीत जे कोंदट वातावरण झाल होत त्याने आणि शेजारी बसलेल्याच्या +
अमृततुल्य मोदुच्या वासाने डोक जड झाल होत. अशातच त्या दादाला काही ते पचल नाही आणि त्याने गाडीतच उलटी केली. तरीही लोकं ओह करून गप्प बसले. नाही म्हणायला आमच्या काकूंच्या साडीवर काही थेंब उडाले आणि त्या मात्र जाम भडकल्या. त्यांना भडकलेल बघून मागे बसलेले बोरकर म्हणाले, "प्राजक्ता,+
जरा बघ मासे पोहत असतील खाली" आणि सगळेच जोरजोरात हसु लागले. कसलीही कटकट न करता सारथ्याने गाडी पुढच्या गावात म्हणजे ओल्ड तेसनला थांबवली, आम्हाला खाली उतरवून गाडी स्वछ धुतली. त्या बाईची माशांची पिशवी तिने हाताच्या दोन नाजुक बोकांनी त्या व्याक मधुन उचलून खाली नेली आणि धुऊन परत आणली.+
परत सगळे निघालो आणि पंधरा मिनिटात तेनिंगला पोहोचलो. पाणी गळुन अजिबात न भिजल्याच्या आनंदात आम्ही आमच्या वर ठेवलेल्या बॅग्ज काढल्या ज्या पाण्याने पार भिजून पाणी पाणी झालेल्या होत्या. दोन दिवस एक ही सुका कपडा हाती लागला नाही.. आणि त्या लुंग्चीच्या हसण्याच महत्त्व मला तेव्हा समजल!
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Enjoying this thread?

Keep Current with 🚩प्राओ 🚩

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!