ल्युकिड पार्टीमधील काही अतिमहत्वकांक्षी नेत्यांना हे विलीनीकरण जितक्या लवकर होईल तितक्या लवकर व्हावे असे वाटते कारण जर अमेरिकेत येणाऱ्या निवडणुकीत सत्ताधारी पक्ष बदलला तर हे होणेसंबंधी नेत्यानाहूना पुनर्विचार करणे भाग पडेल.
आता या परिस्थितीत बेनी गांट्झ आणि नेत्यानाहूची निर्णयक परिस्थिती कशी असेल ते पाहू.
हा नेता इस्राईलच्या राजकारणातील स्वतःची पाचवी टर्म उपभोगत आहे. निवडणुकीत वेस्ट बँक आणि जॉर्डन व्हॅलीचे partial annexation करण्याचे आश्वासन आता तो पूर्ण करणार आहे. पण मिनिस्ट्रीचे वाटप करताना आपल्या हीश्याला कमी आल्याची भावना त्याच्या पार्टीतही आहे..
याबाबतीत मोसाद, शिन बेट(internal security agency) अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केलीय.
शिवाय पॅलेस्टिनी राष्ट्रपती महमुद अब्बास इस्राईलशी झालेला security coordination मोडण्याची शक्यता आहे.
जॉर्डन, UAE, अरब लीग, EU, Canadaने या annexation ला विरोध केलाय.
मिडल ईस्टमध्ये एक क्रायसिस संपतो तर दुसरा सुरू होतो.
#IRमराठी