मा. @narendramodi आपणास दुसऱ्यांदा सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण झाले. याबद्दल आपले अभिनंदन. पण यासाठी स्वतःच स्वतःचे कौतुक करून घेण्यात कोण हशील आहे? करोनाने गरिबांचे जिने मुश्कील केलेले असताना लोकप्रियतेचा मोह आपण आवरता घ्यायला नको होता का? १/७
आपण देशातील 'इनोव्हेटि आयडिया'चे प्रणेते आहात. म्हणून यावेळी 'मन की बात' न घेता आपण थेट पत्र लिहिलं असावं. पण खरं सांगू त्या १६२० शब्दांच्या पत्रात मला वाचनीय मजकुरच सापडेना. २/७
आज देशाचा जीडीपी मागील ११ वर्षाच्या नीचांकी आहे याची आपल्याला कल्पना नसणार. ३/७
असो, आपल्या निमित्ताने देशाला एक उत्तम (अभि)नेता मिळाला हेही नसे थोडके. आपल्या गर्वाने हरण लवकर होवो हीच त्या प्रभू श्रीरामांच्या चरणी प्रार्थना. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. ७/७
आपलाच शुभचिंतक
भारताचा सुज्ञ नागरिक