अवघ्या ३० वर्षाच्या कालावधीत 'स्वराज्य' उभं राहीलं.. राजांचा राज्याभिषेक झाला, राजं छत्रपती झालं..
'मर्हाटा पातशहा येवढा छत्रपती जाहला, ही गोष्ट काही सामान्य जाहली नाही'
कुठलीही हृदयद्रावक, काळजाला भेगा पाडणारी घटना घडली की उत्स्फूर्त प्रतिक्रिया येणारच. बलात्काराच्या घटनेत देखील राजकारण होताना पहिले की देव न करो, राजकारणात बलात्कार होवो हेच शब्द ओठांवर येतात. उत्तरप्रदेशात बलात्काराची...
घटना घडलीय. आपल्याइथे काय चाललंय? तर विरोधी आणि सत्ताधारी अशा दोन्ही पक्षातील 'भडव्या' कार्यकर्त्यांकडून केवळ राजकारण सुरु आहे. सत्तेतील (शिवसेना, राष्ट्रवादी) कार्यकर्ते, त्या योगी आदित्यनाथांनी आपल्या राज्यात काय करावं, कस राज्य सुरक्षित राहावं याचे...
धडे देतायत. तर विरोधातील (भाजप) कार्यकर्ते, राज्यात घटनांचा दाखला देतायत. चूक काहीच नाहीये. त्यांचं ते कामच आहे. मात्र राग वेगळ्या गोष्टीचा आहे. किमान, किमान बलात्कारसारख्या संवेदनशील विषयासाठी एकत्र येऊन लढण्याऐवजी तुमच्या राज्यात किती आमच्या राज्यात किती असले...
गुरुवारी हे ट्विट केल्यानंतर कमेंट्समध्ये काहीतरी इंटरेस्टिंग वाटतंय अशा आशयाची छान चर्चा होईल अशी अपेक्षा होती. राजकारण, ट्विटरवर आपल्या पक्षातील सर्वात मोठा कार्यकर्ता बनण्याची स्पर्धा आणि वैयक्तिक उणीधुणी यामध्ये हे ट्विट काहीतरी.. (१/९)
वेगळी चर्चा घडवेल (अर्थात) अशी अपेक्षा होती. हास्यास्पद आहे अशी अपेक्षा ठेवणं असं अनेकांना वाटेलही.. माझा ट्विटरमित्र डीएमला विचारतो.. तुला अजूनही वाटतं, आता या प्लॅटफॉर्मवर चर्चा होईल? मी म्हणतो प्रयत्न करू.. असो, काही हरकत नाही.. आपण लिहत राहू..
तर अलीकडेच.. (२/९)
माझ्या भावोजींनी ऑनलाइन डिलिव्हरीचा विशेषतः भाजीविक्रीचा व्यवसाय सुरु केला आहे. स्वतः ग्रामीण भागातून येत असल्याने ऑनफिल्ड मेहनतीची काम करणं तितकं अवघड जात नाहीये. पण कोणीही परिपूर्ण नसतो. जग रोज बदलत. त्यानुसार नवा दिवस उजाडला की आपल्याला 'बदलवणारे' अनेक अनुभव येत राहतात. (३/९)
या थ्रेडला कुठल्याही पक्षाची, विचारसरणीची मर्यादा नाही. मराठी व्यक्तीने मराठीजनांसाठी लिहिलेला 'राग'! फार काही ग्रेट लिहिलेलं नाही. तुमच्या आमच्या आजूबाजूला घडणारं दुर्लक्षित वास्तव आहे. पुढील काही वर्षात या थ्रेडमधील.. (१/२७)
मुद्द्यांमुळे 'किमान' बदल घडावेत अशी अपेक्षा ठेऊन हा थ्रेड लिहितोय. त्यामुळे थ्रेड स्वतःपुरती मर्यादित ठेवावा की इतरांपर्यंत पोहोचवावा हे ज्याचे त्याने ठरवावे.
सुरुवातीला काही मुद्दे सांगतो.. (२/२७)
१. अलीकडेच एका उच्चपदस्थ लोकांच्या सोसायटीमध्ये जाणे झाले. अगदी प्रवेशद्वारापासून संकुलातील बगीच्यापर्यंत जिथे पाहाल तिथे डोळे दिपून जातील अशी स्वच्छता, त्यामुळे आपोआप आलेलं 'स्टॅण्डर्ड' असं काहीसं हे चित्र होतं. या संकुलात मराठी कुटुंबांची संख्या अवघे ५-१० टक्के! मात्र.. (३/२७)
'अति तिथे माती' हे सूत्र लक्षात राहूदे गं बाई.. हे ट्विट मात्र जाणूनबुजून केलेले आहे. याला समर्थन देणं म्हणजे बौद्धिक दिवाळखोरीच!
अर्थात हे राजकारण आहे. सामान्यांनी शांत राहायचं. खेळ बघायचे. अस्मितेला ठेच 'ते' पोहचवतील. माथी आपली भडकतील. डोकी आपली फुटतील. त्यापेक्षा..
कंगना विरुद्ध शिवसेना या वादाकडे दुर्लक्षाय नमः करावे असे वाटते.
त्यात, पालिकेने आताच कारवाईचं काम काढून बोट ठेवायला मुद्दा दिलाय. दोन्हीकडून इगोचा खेळ सुरूय.. याच विषयासंबंधित वादातून भांडुपला हाणामारी झालीय. ज्यांच्यासाठी 'राजकारण' हे करियर नाही अशांनी या विषयांत वेळ वाया...
न घालवणंच उत्तम!
यात सरकार म्हणून मित्रपक्ष कुठेच नाही हे सेना नेतृत्त्वाने लक्षात घ्यावं.
'अधोगती कोणाची सुरू आहे..' हा प्रश्न! तुम्ही तीन पक्ष.. कोणीच पुढे येईना. मग कॉग्रेस, राष्ट्रवादी एक पाऊल मागे. आपोआप शिवसेना सर्वांच्या पुढे.. आठवला का कुठला सिनेमा?
वेळ गेलेली नाही..
शंतनूसोबत बोलणं झाल्यावर, थ्रेड लिहेन असं म्हटलं खरं.. मात्र दोन दिवस कामाच्या गडबडीत राहून गेलं. त्याबद्दल क्षमस्व! आणि हो ज्यांनी विविध विषय गेस केले त्याही विषयावर लिहायचा प्रयत्न करेन. तर सहज म्हणून आमचा कॉल झाला. साहजिकच नोकरी हा विषय होताच.. मात्र सूर थोडा वेगळा होता.
शंतनू मुलखाचा अतिविचारी आणि भावुक.. आपण शेअर करत असलेल्या नोकरीच्या संधीमुळे मुलांना नोकरी लागल्यानंतर जसा त्याला आनंद होतो. तसाच त्या संधीचा कोणी उपयोग करून न घेत नसल्यास त्याला त्याहून अधिक वाईट वाटतं.
मागील २-३ दिवसांपासून कंगना आणि राऊत यांच्यासंबंधित ट्विटर युद्धात आपले 'काही' मराठी मंडळी ज्या तडफेने घरात बसून आपला डेटा फुकत होते. त्याचा त्रास होऊन आपण इतकी मेहनत घेऊनही इथलं वातावरण का बदलत नाही हा विचार त्याच्या मनात घोळत होता.
सवय लावून घ्या. आता अशा 'अस्मिता' जाग्या होतच राहतील..
कंगनाबाई व्हायरल होणे नवीन नाही. यंदाचे व्हायरल 'ट्रोल'च्या माध्यमातले आहे. निमित्त असंय की, तिला 'मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते आहे.' हा म्हणजे.. आम्हाला तितकंच सांगण्यात आलं.. त्याआधी राऊत साहेबांच्या..
धमकीबद्दल वर्तवलेली भीतीचे शब्द आम्ही विसरून गेलो. आम्हाला फक्त आमच्या मुंबईला बोलल्याचं लागलंय. एकदम खोलवर.. यापुढे कंगना बोलणार त्यावरून आमच्या मुंबई पोलिसांच्या कर्तृत्वाची रेंज ठरवली जाणार. बरोबर ना? असो.. थ्रेड लिहितो म्हटल्यावर अनेकांनी लाइक, रिप्लाय देणंच टाळलं.
उद्या कोणावर बरसणार हे माहिती नाही. उगाच आता समर्थन देऊन तोंडावर न पडलेलं बरं.. अर्थात या सर्वांचा आदर! मुळात थ्रेड कंगना किंवा राऊत यांच्यापैकी कोणाच्याही वक्तव्याचा समाचार घेण्यासाठी नाहीचे.. म्हटलं, आपल्या 'अस्मिता' कशा कामचलाऊ आहेत त्यावर लिहू...आणि कंगनापेक्षा मुंबई मोठी आहे