My Authors
Read all threads
#जय शिवराय , जय हिंदवी स्वराज्य ⛳⛳
#शिवराज्याभिषेक_दिन च्या सर्वांना मनापासून खूप शुभेच्छा..
"छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज व त्यांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य हे धर्मनिरपेक्ष किंवा सेक्युलरवादी होते असे दाखवण्याचा अट्टाहास नक्की कशासाठी?
थ्रेड पूर्ण वाचा 👇👇 १/
खरेतर आज की शिवराज्याभषेक चे नक्की महत्व काय आहे?या विषयावर मत व्यक्त करणार होतो पण ट्विटर वर चालू असणारा छत्रपती शिवरायांच्या विषयी वाद वाचून मी विषय बदलला.
देव किंवा भगवान नक्कीच आहे काय?देव म्हणजे तरी काय?.असे प्रश्न वयाच्या ११ किंवा १२ व्या वर्षी माझ्यासमोर निर्माण झाले.२/
तेंव्हा अजून भगवत गीता वाचली नव्हती.पण तरीही मी माझी देव आहे का नाही हे ठरवण्याची एक व्याख्या बनवली होती ती पुढीलप्रमाणे"जर छत्रपती शिवाजी महाराज होते ही गोष्ट खरी आहे तर मग देव आहे ही पण गोष्ट तेव्हढीच सत्य आहे व मला देव असण्यावर पूर्णपणे विश्वास आहे"ही माझी त्यावेळची ..३/
व्याख्या होती आणि या वर मी आताही ठाम आहे,जरी भगवत गीता खूप वेळा वाचली आहे तरीही.मी देव आहे की नाही हे ठरवण्याची व्याख्या अशी बनवली याला कारण आहे छत्रपती नी आयुष्यभर केलेलं कार्य व त्यांचे व्यक्तिमत्त्व मला देव कसा असेल याचे उत्तर देऊन जातो.शिवरायांनी निर्माण केलेलं राज्य हे..४/
फक्त दिखावा करण्यासाठी निर्माण केलेले राज्य नव्हते ते हिंदवी स्वराज्य होते.बाकीच्या कोणत्याही साम्राज्य मध्ये आणि राजेंच्या हिंदवी स्वराज्य मध्ये खूप मोठा फरक आहे.राजेंचे होते ते स्वराज्य होते म्हणजेच स्वतःचे राज्य.या राज्यात राहणाऱ्या रयतेला वाटत होते की हे माझे स्वराज्य आहे.५/
या माझ्या स्वराज्यासाठी प्राण गेले तरी चालेल पण याचे रक्षण आम्ही करणार कारण रयतेला माहिती होते राजे जे काही करत आहेत ते आमच्यासाठी च करत आहेत स्वतः साठी कष्ट करत नाहीत.मी एक छत्रपतींनी केलेल्या कार्याचे उदाहरण देतो आहे त्याचा उल्लेख कुणीही करत नाही हे गुलामगिरी व गुलामांचा..६/
व्यापार शी संबंधात आहे.शिवाजी महाराज हे जगातील पहिले राजे होते गुलामांचा व्यापार बंद करणारे,पण आपल्या सर्वांना शिकवले जाते की अब्राहम लिंकन ने गुलामगिरी बंद केली.अमेरिकेत गुलामगिरी प्रथेविरुद्ध १जानेवारी १८६३ ला ऑर्डर काढली होती पण राजेंनी ऑर्डर २६ ऑगस्ट १६७७...७/
"हे माझे राज्य आहे आणि मी राजा असेपर्यंत इथे गुलामांचा व्यापार होणार नाही" ही आज्ञा राजेंनी १६७७ मध्ये जेंव्हा कर्नाटक वर स्वारी केली होती त्यावेळी दिली होती व सांगितली होते की मुस्लिमांच्या राज्यात गुलामांचा व्यापार चालत असेल पण माझ्या राज्यात हे चालणार नाही आणि जर हा नियम..८/
कुणी मोडला तर माझे सैनिक तुमच्यावर कारवाई करतील.या घटनेचा उल्लेख डच ईस्ट इंडिया कंपनी रेकॉर्ड१६७७ मध्ये आहे.बरं हे झालं गुलाम गिरी च्या बाबतीत आपण अजून एक राजेंच्या स्वराज्य स्थापन करण्याच्या सुरवातीच्या काळातील एक छोटेसे उदाहरण समजून घेऊ मग त्यावरून राजेंची विचारसरणी नक्की ..९/
कशी असावी याचे उत्तर मिळू शकते.आता सर्वांनाच माहिती आहे हिंदवी स्वराज्य च्या लढाईचे प्रतीक हे हजारो वर्षांपासून सनातन हिंदू धर्माचा प्रतीक असणारा पवित्र असा भगवा ध्वज आहे.हिंदवी स्वराज्य वर सुरवातीला आलेल्या संकटा पैकी एक मोठं संकट म्हणजे च फत्तेखान ची स्वारी १६४८....१०/
त्याची छावणी बेलसर (पुरंदर तालुका)येथे होती.त्यावेळी राजे पुरंदर वरच होते तेंव्हा तिथे ठरले की गनिमी कावा वापरून त्या खानाला धडा शिकवायचा.मग फौजेची तयारी झाली व राजेंचा निरोप घेऊन सैनिकांच्या काही तुकड्या निघाल्या त्यात एक भगव्या झेंड्याची तुकडी पण होती,त्यात एका सैनिकाच्या..११/
हातात झेंडा दिलेला होता.त्यानंतर मराठे खानाच्या छावणीवर तुटून पडले.त्यात घनघोर युद्ध सुरू झाले काही वेळानंतर ठरल्या प्रमाणे आपले सैनिक माघारी फिरले पण झेंड्याची तुकडी माघारी फिरलीच नाही ते तसेच लढत राहिले काही वेळाने खानाच्या फौजे ने त्यांना घेरले व अशी स्थिती निर्माण झाली की.१२/
ते सैनिक पण मरणार आणि झेंड्याचा पण अपमान होणार पण इतक्यात बाजी जेधे- देशमुख म्हणजेच कान्होजी जेधे यांचे पराक्रमी पुत्र तिथे माघारी आले व त्या गर्दीत घुसून झेंडा वाचवला व झेंडा घेऊन माघारी आले त्याचबरोबर बाकीचे सैनिक पण पुरंदर वर परतले.हे सर्व जेव्हा राजेंना समजले तेंव्हा ..१३/
राजेंनी बाजी जेधे चा सन्मान केला कारण त्यांनी भगव्या झेंड्याचा सन्मान राखला व भगव्याचा अपमान होऊ दिला नाही.मग आता तुम्हीच सांगा ही लढाई भगव्याची होती,धर्माच्या सन्मानाची होती म्हणूनच हिंदवी स्वराज्य ची स्थापना केली होती.छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदु लोकांवर अन्याय करणाऱ्या..१४/
अत्याचार करणाऱ्या तसेच त्यांचे जबरदस्ती ने धर्मपरिवर्तन करणाऱ्या ख्रिश्चन पोर्तुगीज व मिशनरी लोकांना राजेंनी कसा धडा शिकवला हे समजून घेतले पाहिजे.इसवी सन १६६७ मध्ये हिंदुंवर अतोनात अन्याय करणाऱ्या पोर्तुगिजांना धडा शिकवण्यासाठी राजेंनी गोव्यावर आक्रमण केले आणि तेथील हिंदुंवर.१५/
अन्याय करणाऱ्या चार मिशनरी म्हणजेच पादरींना पकडले व त्यांना सांगितले की हिंदू वर चालू असणारा अन्याय थांबवा व तुम्ही चौघे पण हिंदु बना पण त्यांनी नकार दिला होता तेंव्हा राजेंनी त्या चौघांचे पण मुंडके उडवले होते आणि गोव्यात प्रचंड नासधूस केली होती. हा पोर्तुगिज राज्यकर्त्यांना १६/
दिलेला एक इशारा होता की जर हिंदुंवर अत्याचार कराल तर तुमची अशी अवस्था केली जाईल.पुढे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी पण याच पद्धतीने मिशनरी ना करवती ने कापून पाठवून दिले होते.इसवी सन १६६८ मध्ये शिवाजी महाराजांनी गोव्याच्या किनाऱ्यावर असणारे श्री सप्तकोटिश्र्वर शंकर चे...१७/
मंदिर पुन्हा बांधायला सुरुवात केले होते.हे मंदिर ख्रिश्चन तसेच मुस्लिम आक्रमकांनी नष्ट केले होते.हे मंदिर पंचगंगा नदीच्या तीरावर नारावे या गावात आहे.हे मंदिर गोव्यातील प्राचीन कदंब राजांचे कुलदैवत होते.तिथे राजेंनी कोरलेला शिलालेख पण आहे.मग विचार करा राजे हिंदू धर्म विरोधी..१८/
लोकांनी नष्ट केलेले हिंदूंचे मंदिर पुन्हा एकदा बांधून कोणता संदेश देत आहेत?.कोणता आदर्श आपल्या समोर ठेवत आहेत?.तो आदर्श आहे आपण आपल्या महान अश्या सनातन हिंदू धर्माचे रक्षण करायचे आहे.या साठी अजून एक उदाहरण आहे ते दक्षिण स्वारी चे.राज्याभिषेक सोहळा झाल्यानंतर राजेंनी दक्षिण ..१९/
स्वारीची सुरुवात केली.१६७७ मध्ये जिंजी किल्ला जिंकला त्यानंतर महाराज तिरुवन्नमल इस येथे गेले तेथील समोत्तिरपेरूमल देवाच्या दोन मंदिरांच्या मशिदी करण्यात आल्या होत्या.महाराजांनी त्या मशिदी चे परत भव्य मंदिरात रूपांतर केले व शिवलिंग स्थापन केले होते.१६७२ ते १६८१ या काळात भारतात.२०/
राहिलेल्या जॉन फ्रायर ने त्याच्या पुस्तकात लिहिले आहे की शिवाजी महाराज कल्याण व भिवंडी भागातल्या मशिदी पाडूनच टाकणार होते पण तसे न करता त्यांचा वापर धान्य ठेवायची गोदाम साठी होतो आहे.तसेच हाच उल्लेख कवींद्र परमानंद यांनी लिहिलेल्या शिवभारत मध्ये पण आहे.मग या सर्व घटनांचा..२१/
अभ्यास केल्यानंतर तुम्हाला राजे कोणत्या दृष्टीने सेक्युलर वादी वाटतात.दुसऱ्याचा धर्माचा सन्मान करणे ही गोष्ट वेगळी आहे आणि जर दुसरे आपल्या धर्माचा सन्मान करत नसतील व आमाचा महान धर्म संपवू पाहतात त्यांना त्यांच्याच पद्धतीने उत्तर देणे ही गोष्ट वेगळी आहे.राजेंनी दुसऱ्या धर्माचा.२२/
सन्मान जरूर केला आहे पण म्हणून त्यांच्यावर एकतर्फी प्रेम केलेलं नाही.जर दुसऱ्या धर्माचे लोक आमच्या धर्मावर हल्ला करणार असतील तर आम्ही पण आमच्या महान धर्माचे रक्षण करण्यास समर्थ आहोत हे महाराजांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिले आहे आणि आम्ही पण हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आयुष्य.२३/
जगतो आहे.देश, धर्म, संस्कृती यासाठीच लढायचे अंक यासाठीच जगायचे 💪💪⛳⛳.राजेंचे नक्की ध्येय काय होते यासाठी एक शेवटचे उदाहरण देतो आहे.फ्रेंच प्रवासी बार्थेलेमी कॅरे हा दोन वेळा शिवाजी महाराजांच्या काळात भारतात येऊन गेला होता व महाराष्ट्र मध्ये पण येऊन गेला होता.त्याने त्याच्या२४/
प्रवास वर्णन चे प्रकाशन १६९९ मध्ये पॅरिस येथे केले होते व त्याने राजेंना महान राजे असे लिहिले होते.तसेच पूर्वेकडील प्रवासात पाहिलेला सर्वात महान व्यक्ती असे वर्णन केले आहे.तसेच पुढे लिहितो की शिवाजी महाराज यांचे सरदार तसेच सैनिकांना तुमच्या राजाचं नक्की स्वप्नं काय आहे?..२५/
असे विचारले की सांगतात की आमच्या छत्रपतींचे स्वप्नं आहे की आमचे हिंदवी स्वराज्य दिल्लीपासून, बंगालच्या उप महासागर पर्यंत पसरलेले असावे ,यावरून आपण समजू शकतो की राजेंचा उद्देश नक्की काय होता.व या सर्व गोष्टी वरून आपल्या सर्व मावळ्यांना ध्येय निश्चित करायचे आहे. जय शिवराय ..
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Keep Current with रणधीर देशमुख

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!