My Authors
Read all threads
आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असते तर ? वाचा पूर्ण थ्रेड 👇😂
1) महाराष्ट्रात कोरोना रोगाची परिस्थिती आटोक्यात असून आपल्याला गुजरातला मदत करणे जास्त गरजेचे आहे. असे सांगून महाराष्ट्रातून अत्यावश्यक गोष्टींची (टेस्टिंग किट, PPE किट, मास्क, ग्लोव्हज) मदत गुजरातला तातडीने पाठवली गेली असती
2) देवेंद्रजी करत असलेल्या कामाच्या लाखो कोटींचे आकडे सांगणाऱ्या जाहिराती प्रत्येक माध्यमांवर सुरू झाल्या असत्या. प्रत्येक जाहिराती मधून रोज नवीन नवीन आकडेवारी सांगत कोरोनाच्या संकटात सुद्धा महाराष्ट्र कसा सुजलाम सुफलाम आहे हे सांगितलं गेलं असतं
3) एखादं नवीन “कोरोना विशेष” सुरेल गाणं अमृता फडणवीस यांनी सरकारी खर्चातून आणि सरकारी अधिकारी, आरोग्य सेवक, डॉक्टर, पोलीस यांना नाचवून सॉरी वापरून बनवून घेतलं असतं. जे वारंवार टीव्हीवर दाखवून महाराष्ट्राचे खचलेले मनोबल वाढवलं गेलं असतं..
4) रोज होणाऱ्या मीटिंग आणि बैठका यांचे फोटो, आकडेवारी आणि माहिती, हजारोंच्या संख्येने सोशल मीडियावर IT सेल कडून फिरवली गेली असती. माध्यमातून त्याच्या जाहिरात रुपी बातम्या केल्या गेल्या असत्या. देवेंद्र फडणवीस म्हणजे कोरोना संकटात धावून आलेला देवदूतच हे प्रत्येकाला नव्याने माहीत.
5) शेतकऱ्यांना सदैव फुकटे किंवा भिकारी म्हणणारे सुशिक्षित भाजप समर्थक कदाचित या काळात महाग झालेल्या भाजीपाला किंवा इतर गोष्टींसाठी जास्त चिडले नसते, उलट फडणवीसांच्या ध्येयधोरणांमूळे शेतकरी आज कसा जास्तीचे पैसे मिळवतोय याचे गणित मांडले गेले असते, त्याच्या सुरस कहाण्या मिळाल्या.
6) सरकारी कर्मचाऱ्यांची पगार कपात म्हणजे देशभक्तीसाठी दिलेलं योगदान आहे हे ठासून सांगितलं गेलं असतं. विरोध करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना भाजप IT सेल कडून देशद्रोही ठरवण्यात आले असते. ज्यांनी ज्यांनी विरोध केला,
त्या प्रत्येकाचा मंत्रालयात आत्महत्या करणारे म्हातारे धर्मा पाटील नाहीतर रक्त पडेपर्यंत मारलेला शेतकरी रामेश्वर भुसारी केला गेला गेला असता
7) ज्या प्रमाने कोल्हापूर-सांगलीच्या पुरात दोन दिवस बुडालेले असाल तरच मदत मिळेल असा फतवा निघाला होता तसाच जोपर्यंत तुमच्या नाकातून किंवा घशातून रक्त बाहेर पडत नाही तोपर्यंत तुम्ही कोरोना सवलतींना पात्र नाही असे GR बहुदा निघालेअसते.
8) राज्यपाल कोशारी यांना एकही मीटिंग किंवा बैठक घेण्याची गरज कदाचित भासली नसती आणि प्रशासनाचा व अधिकाऱ्यांचा वेळही फुकट गेला नसता. ना फडणवीसांना तक्रार करण्यासाठी रोज राजभवनात चकरा माराव्या लागल्या असत्या.
9) 20 लाख कोटींच्या पॅकेज मधील नेमके किती लाख कोटी महाराष्ट्राला मिळाले याचे आकडे कमीतकमी जाहिराती मधून तरी महाराष्ट्राला कळाले असते (खरे किंवा खोटे हा नंतरचा प्रश्न)
10) किरीट सोमय्या, प्रवीण दरेकर किंवा राम कदम यांच्या सारख्या लोकांनी सरकारी हॉस्पिटलमध्ये किंवा ज्या ठिकाणी लोकांना विलगिकरण करून ठेवलं आहे तेथे किती चांगल्या सुविधा दिल्या जातात हे रोज दाखवलं असत, कोरोना संकटात फडणवीस कसे लढत आहेत याचे गोड कौतुक केलं असत.
11) कोरेगाव भीमा प्रमाणेच पालघर मधील साधूंची हत्या ही धार्मिक द्वेषातूनच झाली किंवा कोणत्यातरी मिशनरी धर्मगुरूंच्या अथवा कम्युनिस्ट नेत्यांच्या सांगण्यावरून नक्षलवादी लोकांनी केली म्हणून संपूर्ण प्रकरणाची कदाचित दिशाच बदलली असती.
12) विरोधी पक्ष निवडणुकीत हरला आहे, त्यामुळे या असल्या हरलेल्या लोकांचं काय ऐकायचं ? ह्या रेवडी पाहिलवानांनी घरात बसावे सल्ले देऊ नये. तुमची लायकी जनतेने दाखवून दिली आहे, पवारांचा काळ संपला वगैरे वगैरे विरोधी पक्षाला सुनावण्यात आलं असतं.
13) थाळी बजाव असेल किंवा दिवे लागणीचा कार्यक्रम, सर्व काही सरकारी म्हणून घोषित झाले असते. कोरोना संकटामधून वेळ काढून पोलीस, डॉक्टर, आरोग्य सेवक, सफाई कर्मचाऱ्यांना थाळ्या वाजवणे आणि त्यांच्या त्यांच्या कामाच्या ठिकाणी दिवे लावावेत असे सरकारी आदेश निघाले असते*
14) छुपे भाजप समर्थक असलेल्या प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी आणि इतरही काही घटकांनी नक्कीच जास्तीची मेहनत घेतली असती आणि मदत केली असती. जी मदत हे लोक आज करतांना दिसत नाहीत.
15) परिस्थिती जास्त गंभीर होऊ नये म्हणून पुन्हा एकदा मध्यप्रदेशातील तंत्रिकांना बोलावून मंत्रालयात आणि प्रत्येक सरकारी हॉस्पिटलमध्ये मिर्ची हवन केले असते.
16) फडणवीस सरकार आर्थिक आघाडीवर कसं मजबूत होत आहे, किती योग्य निर्णय घेत आहे याचं सुंदर विश्लेषण विविध उदाहरणांवरून तरूण भारत संपादकीय मधून रोज मांडलं असतं. कदाचित याची एखादी मालिकाच प्रसिद्ध झाली असती.
ज्यात गेल्या 60 वर्षांपासून कोणत्याही मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीला करता आलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं म्हणून पाठ थोपटली गेली असती
17) सर्वात महत्वाचे म्हणजे काही चॅनलला हाताशी धरून थेट ग्राऊंड रिपोर्ट दाखवत प्रत्येक गरिबाला सरकार कडून किती किलो धान्य, साखर, तेल, शॅम्पू, मोबाईल रिचार्ज, साबण, अत्तर, कपडे, गॉगल अमुक तमुक काय काय म्हणून सगळ्या वस्तू कश्या तत्परतेने पोहोच केल्या गेल्या आहेत
याचं लाईव्ह रिपोर्टिंग केलं असतं. लोकांच्या उत्स्फुर्त प्रतिक्रिया घेत देवेंद्र फडणवीस म्हणजे दैवी शक्ती असलेला मुख्यमंत्री जो जनतेच्या मनावर राज्य करतोय हे सप्रमाण दाखवून दिलं असतं
18) सर्वात महत्वाचे म्हणजे फडणवीस सरकार मध्ये, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, गृहमंत्री, प्रशासकीय अधिकारी असं कोणीही दिसलं नसतं. कारण फडणवीस सरकार म्हणजे फक्त फडणवीस आणि फक्त फडणवीसच असतं ना.
19) खूप महत्वाचे म्हणजे मुंबई आणि महाराष्ट्रात वाढलेल्या कोरोना संकटाला अंतिमतः फक्त तबलिगीच जबाबदार आहेत आणि मुस्लिम देशातून येणारेच जबाबदार आहेत हे कदाचित सिद्ध करण्यात आलं असतं.
यांच्यामुळेच परिस्थिती हाताबाहेर गेली हे ठासून सांगण्यात आलं असत, यात आपलं अपयश नाही तर या मुस्लिमांचा दोष आहे हे बऱ्यापैकी पटवून देण्यात आलं असतं.
(विशेष सूचना- फडणवीस सध्या सत्तेत नसल्याने वरील सर्व त्यांच्या मागील पाच वर्षांचा कारभार पाहता लिहिलेला अंदाज आहे)

वरील लेख हा mahitipedia.in या संकेतस्थळा वरील आहे.
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Keep Current with Nishant Tale

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!