Nishant Tale Profile picture
News editor at https://t.co/kgfwuJ7jId मराठी, Writer, Blogger, Reader Poet, Thinker, sports analyst, journalism student
Jul 10, 2020 5 tweets 2 min read
विकास दुबे च्या एन्काऊंटर वर उत्तर प्रदेश पोलिसांना हे १५ प्रश्न विचारले गेले पाहिजेत. 👇

१) उत्तर प्रदेश पोलिसांनी विकास दुबे ची ट्रान्झिट रिमांड का नाही घेतली?

२) उज्जैन मध्ये विकास दुबे ने आत्मसमर्पण केलं होत, तर तो कानपूर मध्ये येऊन पळ काढण्याचा प्रयत्न का करेल? ३) विकास दुबे च्या हातात हातकड्या घातल्या होत्या का? जर हो तर मग त्याने पोलिसांची पिस्तुल कशी काय हिसकावून घेतली?

४) एसटीएफ च्या अधिकाऱ्यांनी आपली शस्त्रे सुरक्षित का नाही बाळगली?

५) मीडिया वाल्यांना रोखल्या नंतर दुबे ज्या गाडीत बसला होता ती गाडी कशी काय बदलली?
Jun 10, 2020 25 tweets 3 min read
आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असते तर ? वाचा पूर्ण थ्रेड 👇😂 1) महाराष्ट्रात कोरोना रोगाची परिस्थिती आटोक्यात असून आपल्याला गुजरातला मदत करणे जास्त गरजेचे आहे. असे सांगून महाराष्ट्रातून अत्यावश्यक गोष्टींची (टेस्टिंग किट, PPE किट, मास्क, ग्लोव्हज) मदत गुजरातला तातडीने पाठवली गेली असती
Jun 3, 2020 10 tweets 2 min read
आपल्या पोटात आपलं बाळ आहे, आपल्याला उपाशी राहून चालणार नाही असा विचार करत ती अन्नाच्या शोधात निघाली. भटकता भटकता जंगलाच्या बाहेर आली. बाहेर तिला एक मानवी वस्ती दिसली. 👇 त्या वस्तीच्या ठिकाणी आपल्याला हमखास काहीतरी खायला भेटेल या आशेने ती गावात आली.

गावातील लोकांनी तिला फिरताना बघितले. ते तिच्या जवळ गेले. तिच्यापुढे अननस धरले. ही माणसं किती दयाळू असतात असा विचार करुन तिनेही अननस सोंडेत घेतले. 👇
May 9, 2020 7 tweets 2 min read
केरळ मॉडेल हे यशस्वी का ठरलं? तेथील प्रशासनाने असे काय केले की जे बाकी राज्यातील प्रशासनास जमले नाही? केरळ राज्याने त्यांचा बहुतांश अभ्यास हा लॉक डाऊन च्या आगोदर च केला होता. पाहुयात केरळचे लॉक डाऊन करण्या आगोदर कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली. 👇(१/७) केरळ राज्याच्या आरोग्यमंत्री के.के. शैलजा (माजी विज्ञान शिक्षक) सांगतात की केरळ ने त्याच वेळी सगळ्या गोष्टींचा विचार करायला सुरवात केली जेंव्हा चीन मधील वुहान शहराच्या बातम्या जगभरात पसरल्या होत्या. 👇(२/७)