My Authors
Read all threads
थ्रेड.....

सैनिक हो तुमच्यासाठी!🙏

देशासाठी लढणारे सैनिक म्हणजे सगळ्यात आदरयुक्त काम! कष्टकरी, शेतकरी, मध्यमवर्गातून जास्त करुन सैनिक म्हणून तरुण भरती होतात. देशभक्ती आणि आर्थिक स्थैर्य यामुळे आजही तरुणांची सैन्यदलात जाण्यासाठी अक्षरशः रीघ लागते. इथेही गळेकापू स्पर्धा असते.
+👇
शंभरेक जागांची भरती असली तरी काही हजार तरुण जमा होतात. त्यामुळे या क्षेत्राला मनुष्यबळाची कधीच कमतरता भासत नाही. त्यात आपल्या देशाची लोकसंख्या प्रचंड आणि बेरोजगारी तुडुंब म्हणून भारतीय लष्कराकडे मनुष्यबळ सतत रितं होत असतं.
+👇
पाकिस्तान, चीन या आपल्या दुखर्‍या नसी! (त्यात आता नेपाळचीही भर पडलीय.) त्यामुळे इथे सैनिक धारातिर्थी पडतच असतात. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे.....म्हणता-म्हणता अकस्मात कितीतरी सैनिक नाहीशे होतात. एक दिवस सगळे भोकाड पसरतात आणि दुसर्‍या दिवशी सगळं पहिल्यासारखं होतं.
+👇
राज्यकर्त्यांना जिथे सैनिकांचा विसर पडतो, तिथे इतरांचं काय घेऊन बसलात. यातही परत, CRPF, BSF, ITBP या व अशा पॅरामिलिटरी फोर्सेसच्या सैनिकांना तुटपुंज्या पगारात नोकरी करावी लागते. हे कित्येक लोकांना माहितीही नसतं. इथे सगळे जवान म्हणजे भारतीय लष्कराचे सैनिक, असा भाबडा समज असतो.
+👇
भारतीय लष्करातील सैनिक शहीद झाला तर त्यांच्या घरच्यांना सरकारी मदत, भत्ते, फायदे सगळं काही मिळतं. यातही कित्येक शहिद नातेवाईकांची वरिष्ठांकडून पिळवणूक होते. परंतु निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांच्या काही सेवाभावी संस्था आहेत. त्यांच्याकडे अशी प्रकरणं आल्यास ती तडीस लावली जातात.
+👇
खरं मरण तर पॅरामिलिटरी फोर्सेसवाल्यांचं असतं. त्यांना सरकारी मदत जाहीर झाली तर मिळते अन्यथा ठणठण गोपाळ! अलिकडे सैनिकांच्या मृत्यू भोवती संशयाचं धुकं घोंघावताना दिसतं. कुठल्या तरी अपघातात वा चकमकीत सैनिक मारले जातात. त्याचा रितसर आकडा समजत नाही की घातपातामागील कारण कळत नाही.
+👇
काही लोक सरकारच्या नावाने बोंबलतात. काही लोक शहिदांसाठी गळा काढतात. देशातील सर्वोच्च नेता मात्र ढिम्म! तरुणांचा भरणा असलेला आपला देश! त्यामुळे सैनिकांची कमी अजिबात जाणवत नाही. ज्यांची मुलं मरतात. त्या मंडळींचा आणखी एक वेगळाच ट्रॅक चालू असतो.
+👇
"भारतमातेसाठी अख्खं खानदान कुर्बान!", "एक मुलगा गेला तर काय माझा दुसरा मुलगा घ्या.", असले फिल्मी डायलॉग शहीदांचे नातेवाईक कॅमेऱ्यासमोर मारतात खरे, परंतु नंतरची त्या कुटुंबाची भीषण अवस्था, त्यांची त्यांनाच ठाऊक असते. मग त्यांची दखल घ्या किंवा नका घेऊ; कोणाला काय फरक पडतो?
+👇
लोकांना रडायला, मिडीयाला बातम्या चालवायला, राज्यकर्त्यांना खोटे अश्रू ढाळायला खांद्यांची बिल्कूल कमी नसते. मग या गोष्टींना चंदेरी पडद्यावर असं काही सुशोभित करुन मांडलं जातं, की मल्टिप्लेक्सच्या थंडगार काळोखात, पाॅपकाॅर्न खाता-खाता लोकांचे बाहू फुर्रतात, ऊर अभिमानाने भरुन येतो
+👇
अशा या कचाकड्याच्या दुनियेतून बाहेर आल्यावर लोक उदोउदो कोणाचा करतात, तर सरकारचा! लोकांना एक प्रोपागंडा फिल्म दाखवून असं काही फसवलं जातं की ज्याचं नाव ते! पडद्यावर दाखविल्या गेलेल्या glamorous सैनिकी जीवनाला लोक सहज फशी पडतात, हे आणखी क्लेशदायक असतं.
+👇
एखादा तेजबहाद्दूर, सैनिकांच्या खाण्यापिण्याची आबाळ दाखवू पाहतो, तर त्याचं कोर्टमार्शल करुन त्याचं आयुष्य बर्बाद केलं जातं. आता तर लष्करी गणवेष, बूट, गाॅगल इ.साठी मिळणारा भत्ताही बंद करण्यात आलाय म्हणे. म्हणजे आधीच तुटपुंजं वेतन आणि त्यात हा नवा भुर्दंड!
+👇
या सगळ्या गोष्टी एअरकंडीशनमध्ये बसून कोकचे घुटके घेणाऱ्यांना नाही कळत. त्यांना फक्त सर्वोच्च नेत्यांची भक्तीगीतं गायची कळतात. अशा परिस्थितीत सगळेच प्रश्न निरुत्तरीत राहतात आणि ते तसेच ठेवण्यातच तर खरं राजकीय कौशल्य असतं. मग काय "जुने जाऊ द्या मरणालागुनी"!
+👇
सैनिक हो.....हेच तुमचं प्रारब्ध! हाच तुमचा सन्मान! तिरंग्यात गुंडाळून येणारा अपमान! पण त्याची परतफेड नाहीच. सैनिकांच्या कुटुंबियांच्या दुःखाची झालर विटली की कोण तुम्ही? कसलं तुमच्या हौतात्म्यचं कौतुक! नुसता भावनांचा बाजार आणि त्यावर जगणाऱ्या बाजारबसव्यांचा सुकाळ!😢
🙏🙏🙏
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Keep Current with 💝 DURGA 💝

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!