My Authors
Read all threads
धागा....👇

स्तनपानाविषयी बोलू काही.....

कालपासून खूप जणांनी स्तनपानावर धागे लिहीले. परंतु त्यातल्या बर्‍याच जणांनी स्तनपानासाठी Breastfeeding हा इंग्रजी शब्द वापरला. कारण "स्तनपान" म्हटलं की अश्लील वाटतं आणि त्यासाठी इंग्रजी शब्द वापरला, की कसं sophisticated वाटतं.
+👇
एकंदर सगळे धागे वाचून हे #माझं_मत तयार झालं. "स्तनपान" म्हणजे मातृत्वातील सर्वोच्च भावना! त्या भावनेला पाहण्यातील दृष्टिकोन सामान्यतः सदोषच असतो. त्यातही काही आंबटशौकीन लोक अशा गोष्टींमध्येही मजा घेतात.
+👇
विशेषकरुन, आपल्याकडील साक्षरता ही "अक्षर साक्षरता" असल्याने "स्तनपान" या विषयावरील प्रबोधन ऐकतानाही पुरुषांच्या चेहऱ्यावर मिश्किल भाव/हास्य असतं. त्यामुळे स्तनपानामागील विज्ञान दृष्टिकोन तयार करण्यासाठी सर्वप्रथम टिपिकल पुरुषी मानसिकता बदलावी लागेल.
+👇
भारतीयांवर सिनेमाचा खूप प्रभाव असतो. सिनेमातून कायमच स्त्री कलाकारांच्या स्तनांचा उभार (cleavage) दाखवला जातो. सगळ्यात आधी राज कपूरने ही प्रथा सुरु केली. सुरुवातीच्या "आग", "बरसात" मध्ये त्याने प्रेक्षकांना अशाप्रकारची झलक दाखवून पाहिली.
+👇
राज कपूरने स्त्रीच्या छातीचा उभार पाहण्याची प्रेक्षकांना भुरळ घातली आणि असे प्रसंग चित्रित करताना सेन्सॉरच्या कचाट्यातून निसटायचं तंत्रही इतर सिनेमाकर्मींना शिकवलं. मग काय, सगळ्याच भाषिक चित्रपटसृष्टीतील स्त्री कलाकारांनी Cleavage To Topless असा प्रवास सहज पार केला.
+👇
राज कपूरने तर आपल्या "सत्यम्, शिवम्, सुंदरम्" व "राम तेरी गंगा मैली" मधील नायिकांना याबाबतीत कळसावर नेऊन ठेवलं आणि प्रेक्षकांना आंबटगोड चवीचा फिल दिला. "सत्यम्....."च्यावेळी लोक झीनत अमान व "राम तेरी...."मध्ये मंदाकिनीला बघायला जात.
+👇
"राम तेरी....."त तर मंदाकिनीचा बाळाला स्तनपान करतानाचा एक tight close up होता. तेव्हा थिएटरमध्ये लोक अक्षरशः चेकाळायचे. अशा गोष्टींना प्रेक्षक मिळतो, हे कळताच बुभुक्षित नजरांची तहान भागवायची एक मोठी लाटच सिनेसृष्टीत आली आणि प्रेक्षक उदारतेमुळे ती पोसली गेली.
+👇
आता तर वेबसिरीजमधून नंगा नाच सुरु असतो. त्याला आपले डोळे असे सरावलेले असतात, की अशा गोष्टी casually घेतल्या आणि सोडल्या जातात. प्रियांका चोप्राचा "बाफ्टा अॅवाॅर्ड" मधील पार बेंबीपर्यंत गेलेला Deep low neck evening gown पाहून तिच्या फॅशन सेन्सचं कौतुक होतं.
+👇
अशा या ग्लॅमरस गोष्टींना डोक्यावर घेणारे लोकच, एखादी खरीखुरी आई आपल्या बाळाला स्तनपान करतानाचे फोटो पोस्ट करुन त्यावर तथाकथित प्रश्न उपस्थित करतात. हा दांभिकपणाचा परमोच्च बिंदू असतो. या मंडळींना खरंतर फाट्यावर मारायला हवं, तरच यांच्या cheap publicity ला पायबंद बसेल.
+👇
रुग्णालयात मुलाच्या जन्मानंतर थोड्याच वेळात आईकडे पाजायला दिलं जातं. कारण सुरुवातीचं जे चिकसदृश दूध असतं, ते बाळाची प्रतिकारशक्ती वाढवणारं असतं. गाई-म्हैशीचं हेच चिकदूध आपण वासराच्या तोंडी न लागू देता त्याचा खरवस बनवून खातो. तेव्हा हा विचार नसतो. माणूस किती अप्पलपोटा असतो.
+👇
आईचं दूध बाळासाठी उत्तम प्रतिकारशक्ती आणि उत्कृष्ट बौद्धिक क्षमता घेऊन येतं. सरकारी आस्थापनात सहा महिने इतकी बाळंतपणाची सुट्टी दिली जाते, ती प्रामुख्याने स्तनपानासाठीच असते. १९९० च्या दशकात महानगर टेलिफोन निगमच्या ऑफिसेसमध्ये पाळणाघरं सुरु करण्यात आली होती.
+👇
सहा महिन्यांची बाळंतपणाची सुट्टी संपल्यानंतर मुलांना नियमित स्तनपान करता यावं, हा त्या मागील उद्देश होता. यामुळे स्त्री कर्मचारीवर्गाची कार्यक्षमता वाढीस लागली होती. कारण कामाच्या वेळातही मुलं सतत डोळ्यांसमोर असल्याने त्यांना आपापल्या मुलांची चिंता नसे.
+👇
सदर प्रयोग खूप यशस्वी झाला आणि कौतुकास्पद ठरला. परंतु आपणाकडे असे प्रयोग विरळाच! तरी आता स्तनपानाबाबत समाजात खूपच जागरुकता निर्माण झाली असल्याने आणि पाश्चात्य जगाकडून या गोष्टीची भलामण केली गेल्यामुळेही असेल; आपल्याकडे किमान सहा महिने तरी स्तनपान केलं जातं.
+👇
स्तनपान हे स्त्रीसाठीही वरदान असतं. बाळाला नियमित स्तनपान करणाऱ्या स्त्रियांचं वजन वाढत नाही. शरीराचा डौल कायम राहतो. शिवाय काही अंशी स्तनपान गर्भनिरोधकाचंही काम करतं, असं शरीरशास्त्र सांगतं. स्तनपान न केल्यास त्याच्या गाठी तयार होऊन स्त्रीला शस्त्रक्रियेला सामोरं जावं लागतं.
+👇
थोडक्यात, बाळ आणि आईतील नातं घट्ट करणारा "स्तनपान" हा मजबूत दुवा असतो. स्तनपान करताना मुलं आईला बोचकारतात. त्यांच्या दात येण्याच्या काळात, हिरड्या शिवशिवत असतात म्हणून मुलं आईला चावतातही. हे फक्त त्या माऊलीला माहित असतं आणि तिचं ते सहन करु शकते.
+👇
आपल्याकडे आईच्या दुधावरुन सिनेमात किती ढांसू संवाद असतात. उदा.मायेच्या पूता, आईचं दूध प्यायला असशील तर.......; माँ का दूध पिया हैं क्या? वगैरे, वगैरे, वगैरे. म्हणजेच भारतीय संस्कृतीत मातेच्या दूधाला व स्तनपानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
+👇
कुठलीच विकृत नजर स्तनपानाची उदात्त भावना डागाळू शकत नाही. सगळ्यांचीच नजर शिवाजी महाराजांसारखी परस्त्रीला मातेसमान मानणारी व्हायला हवी म्हणजे समाजातील विकृती दूर होईल. नजरेनजरेतील फरक असतो. काहींची नजर वात्सल्य जागृत करते तर काहींची चळते. आपण चांगलं तेच घेऊ.

समाप्त 🙏

-- दुर्गा
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Keep Current with 💝 DURGA 💝

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!