कसा चालवू आयुष्याचा गाडा..
जिवंतपणी वाट्याला नर्क आला..
आता स्वर्गाचा मोह कशाला..
सुखाचा पाऊस कधी नाही आला..
पण दुःखांचा पूर आला..
कसा चालवू आयुष्याचा गाडा...
उपवास धरून आईला अशक्तपणा आला..
देवाने अजून नाही डोक्यावर हात फिरवला...
ध्येय आहेत पण मार्ग नाही...
साला नशिबाचा खेळ सारा...
कसा चालवू आयुष्याचा गाडा....
फेकून द्यावं जबाबदारीचं ओझं..
आणि राखरांगोळी करावी स्वप्नांची..
नकार द्यावा तिला आणि करावा तिच्या स्वप्नांचा चुराडा...
कसा चालवू आयुष्याचा गाडा...
मने दुखवावी आप्तेष्टांची...
शेवटी जगावं जीवन एकांतात..
पण हा स्वार्थीपणा कशाला..
तुझ्या जीवावर जगणाऱ्या त्या दोन जीवांचं मन मरायचंय कशाला..
म्हणून उठलो चाललो परत ध्येयाकडे जरी नाही दिसत किनारा...
तुम्हीच सांगा कसा चालवू आयुष्याचा गाडा....
---अजिंक्य