दोघांनाही त्यात प्रचंड रस होता आणि त्याच पदामध्ये, दुसऱ्या कोणत्याही पदामध्ये नाही. तडजोड कोणालाच मान्य नव्हती..
एकाला घरचे लग्नासाठी मुलगी बघत होते. दुसऱ्याचे म्हणणे होते,"एक तर पहिला एकुलता एक आणि कमवता. घरची पूर्ण जबाबदारी त्याच्यावर. ही जास्तीची जबाबदारी त्याला पेलवणार नाही."
एकंदरीत असे हे जटील प्रकरण होते.
त्याचबरोबर दोघे "त्याच" पदाबद्दल तेवढेच आग्रही.. मार्ग काही सापडत नव्हता.
त्यावर मिळालेले उत्तर वाचणाऱ्याच्या अंगावर काटा निर्माण केल्याशिवाय राहणार नाही...
"त्या शाखेच्या मुख्यशिक्षकाचा ८-१० दिवसांपूर्वी कम्युनिस्टांनी खून केला होता आणि ह्यापुढे 'जो कोणी त्या शाखेचा मुख्यशिक्षक होईल त्याचेसुद्धा असेच हाल केले जातील', अशी पत्रके वाटली होती.
आज केरळात संघाचे संघटन जबरदस्त झाले आहे. अश्या कित्येक ज्ञात अज्ञात स्वयंसेवकांच्या बलिदानाने संघ शक्तिशाली होतोय...
देशकार्यासाठी मरण पत्करायला आतुर झालेली उच्चशिक्षित आणि उच्च संस्कारांनी प्रेरित अशी लोकं नक्की कोणत्या मातीची असतात?
पराकोटीच्या त्यागातच स्तिमित करून टाकणाऱ्या उत्कर्षाची बीजे असतात.
साभार - चेतन दीक्षित