वारकरी आणि दर्गा...♥️🇮🇳
पैठण हे संत एकनाथ महाराजांचे गाव आहे. औरंगाबाद जिल्ह्यात वसलेले व एकेकाळी सातवाहन साम्राज्याची राजधानी असलेले प्रतिष्ठान उर्फ पैठण गावातील संत एकनाथ महाराजांच्या समाधीच्या दर्शनाला अनेक लोक येतात.
संत एकनाथ महाराजांची समाधी असलेल्या ह्या गावात आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण आहे जिथे हिंदू मुस्लिम समाजातील एकोपा आणि सलोखा बघायला मिळतो.
पैठणमधील हजरत इद्रिस हुसैनी सय्यद सादात दर्गा हा वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण वारीसाठी जाणाऱ्या किंवा
नाथषष्ठीसाठी आलेल्या दिंड्या ह्या दर्ग्यामध्ये थांबतात.
त्यांच्या निवासाची व्यवस्था ह्या दर्ग्यातच केली जाते आणि ह्या दर्ग्याची व्यवस्था सांभाळणारे मुस्लिम बांधव दिंडीत व वारीसाठी आलेल्या वारकऱ्यांची अतिशय प्रेमाने व उत्साहाने सेवा करतात, त्यांचा यथायोग्य पाहुणचार करतात.
तसेच वारकरी सुद्धा ह्या दर्ग्यात आल्यावर, तिथल्या मुक्कामात ह्या दर्ग्याची मनोभावे पूजा करतात, उपासना करतात.मुस्लिम बांधवांकडून दिंड्यांना शिधा दिला जातो आणि इथल्या वस्तीत दिंडीतील भाविकांना भोजन दिले जाते. ह्या दर्ग्यात नमाज सुद्धा होतो आणि भजन सुद्धा होते.
ज्यावेळी मुस्लिम बांधवांच्या नमाजाची वेळ होते तेव्हा वारकरी आपले भजन थांबवतात आणि नमाज पूर्ण झाला की वारकरी पुन्हा भजन सुरु करतात.
हा दर्गा म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे. जे लोक इथे येऊन एकनाथ महाराजांचे दर्शन घेतात ते दर्ग्याचेही दर्शन घेतात
आणि जे लोक दर्ग्यात येतात ते लोक एकनाथ महाराजांचे दर्शन घेतल्याशिवाय जात नाहीत अशी इथली परंपरा आहे.
असे म्हणतात की नवनाथांपैकी एक असलेले कानिफनाथ महाराज येथे २४ वर्ष वास्तव्याला होते आणि त्यांनी त्या काळात येथे नदीतून पाणी आणून रांजण भरण्याची सेवा केली.
इथले मुस्लिम लोक जसे त्यांच्या धर्मगुरूंना मानतात तसेच एकनाथ महाराज व कानिफनाथ महाराजांनाही मानतात. अनेक वर्षांपासून ही परंपरा चालत आलेली आहे आणि अजूनही ती इथल्या लोकांनी कायम ठेवली आहे.त्यांच्या धर्मगुरूंनी व एकनाथ महाराजांनी इथल्या लोकांना सलोख्याने राहण्याची,
एकमेकांवर प्रेम करण्याची शिकवण दिली.
सगळ्यांना सोबत घेऊन एकत्र चालण्याची शिकवण दिली ती अजूनही इथले लोक उत्साहाने पाळताना दिसतात.
पैठणमधील ही “सलोख्याची वारी” बघून खरंच इथल्या लोकांनी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेले “भूतां परस्परे जडो मैत्र जीवांचे” आत्मसात केले आहे म्हणूनच हे लोक एकमेकांचा, एकमेकांच्या श्रद्धांचा व धर्माचा आदर करून वागताना बघून मनाला आत्मिक समाधान मिळते.
संत कबीर याना जर समजायचं म्हटलं तर तेवढं सोपं नाही.अजूनही लोक त्यांच्यावर संशोधन करत आहेत.संत कबिरांचा उपदेश जो समजला तो जीवनात सफल झाला असे म्हणतात...
त्यातीलच एक दोहा....♥️
ह्या संसारी दुनियेत येऊन काय करावे..?
याचे उत्तर संत कबीरांच्या दोह्यातून आपल्याला नक्की भेटेल..👇🏻👇🏻
लूट सके तो लूट ले,राम नाम की लूट ।
पाछे फिर पछ्ताएगा,प्राण जाहि जब छूट ॥
अर्थ: जगात सर्वत्र लूट लुटली गेली आहे, परंतु जर लूट करायची असेल तर धैर्य निर्माण करा, आपले सामर्थ्य वापरून पहा आणि आपण खरोखर लूट करू शकता की नाही ते पहा. #kabirdaas
परमात्माचे, देवाचे ते अमर्याद नाव नेहमी जपत रह.
वेळ आहे जेव्हा आपण आपली परीक्षा घेऊ शकता, जर तुम्ही परमात्माचे नाव वेळेवर न घेतल्यास मृत्यूबद्दल खेद करून काही मिळणार नाही.
हजरत नानावली एक सुफी-संत 🙌♥️
साईबाबा यांचा महिमा सर्वाना माहितीच आहे ,साईबाबांचे अनेक भक्त होते त्यात 2-3जण बाबांच्या अगदी निकट होते.त्यातीलच एक नानावली.
नानावली म्हटलं की शब्दातच 'वली' हा शब्द येतो
वली म्हणजे संत ,पाहिजे तसा जगणारा माणूस हे पुरुष काय करतील याचा नेम नसतो..
नानावली हे वयाच्या 67-68 दरम्यान शिर्डीत आले असावेत,त्यांची अवस्था निर्मुक्त होती,त्यांचं वागणं ही विचित्र होत,बाबांच्या कडे येणाऱ्या लोकांना लायनीत उभा करण्याचे काम ते करत असत.
गावात मुलांबरोबर ते हनुमानाची वेशभूषा घेऊन गावभर फिरत असत.विटीदांडू-गोट्या ते लहान मुलांबरोबर खेळत.
अनेकदा ते बाबांच्या जागी बसून बाबांचा आवेश घेऊन भक्तांबरोबर बोलायचे.बाबांचा अभिनय ते करत.पुन्हा जागेवर नमस्कार करून जागेवर बसायचे. नानवलिंचे हट्ट बाबा नेहमी पुरवत
सर्वजण नांनावलीणा वेडा समजत ,पण बाबा त्यांना कधीही वेडा म्हणत नसत.
बाबा म्हणायचे-'नाना कोण आहेत ते लोकाना माहीत नाही.
संत तुकाराम महाराज~
संतांचे धन्य दिवस !
आजी दर्शन संतांचें ।
नांदे तया घरी दैवत पंढरीचें ॥
धन्य पुण्यरूप कैसा जाला सौसारू ।
देव आणि भक्त दुजा नाहीं विचारू ॥
धन्य पूर्वपुण्य वाढवलें निरूतें ।
संतांचे दर्शन झाले भाग्ये बहुते ॥
तुका म्हणे , धन्य !
आम्हां जोडिली जोडी ।
संतांचे चरण आतां जीवेंन सोडी ।
मराठी भाषांतर-या अभंगातून तुकोबांनी संतांचा महिमा असा वर्णिला आहे की , संत समाजाचे गुरू आहेत . ते समाजाला सुविचार सांगून योग्य मार्गदर्शन करतात . ते त्यावर सुसंस्कार करतात ,
त्यामुळे समाजातील अपप्रवृत्ती नाहीशा होतात आणि समाजमनाला सत्प्रवृत्तींकडे वळवण्याची प्रेरणा मिळते . समाजाचा उद्धार होतो . खरे तर देश संतांच्याच घरी राहतो ; त्यामुळे संत नि देव वेगवेगळे आहेत ,
ISIS चा जन्म...🏴🏳️
जगाच्या रक्तरंजित इतिहासात isis सारख्या दहशतवादी संघटना कशी उदयास आली हा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न..
मलापण हाच प्रश्न उदभवत होता म्हणून म्हटलं थोडं ह्याबद्दल जाणून घ्यावे तर #YouTube वर आजतक चॅनल वर VARDAAT : How ISIS was Born..?👇👇👇👇
इराक व इराण मध्ये झालेल्या युद्धामुळे इराक ला मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले होते.इराक ची आर्थिक स्थिती डबघाईला आली होती.त्यानंतर युद्ध संपल्यावर अमेरिका सेनाने इराक सोडून परतले होते.2011 साली इराक मध्ये छोट्या मोठ्या संगठना मध्ये ताकदीची स्पर्धा सुरू झाली..
त्यातीलच एका मोठ्या गटाचा प्रमुख होता अबू बकर अल बगदादी(अलकायदा चा चीफ) ,त्याने 2006 पासूनच आपले पाय इराक मध्ये रोवण्याचे काम चालू केले होते पण पैसेअभावी त्याला ते जमलं नाही..2011 साली इराक पूर्णपणे बरबाद झाली होते.इराक चे इन्फ्रास्ट्रक्चर पूर्णपणे बरबाद झाले होते,
मोहरम...
सुरुवातीला काय लिहू तेच समजलं नाही,पण थोडा प्रयत्न करूया म्हटलं.... #करबला हे युद्ध का घडले कश्यासाठी घडले अजूनही ह्यापासून लोक वंचित आहेत...
मोहंमद पैगंबर यांचे पूर्ण कुटुंब ह्या युद्धात यजीद नामी गद्दार ने शहीद केले..हे युद्ध स्पष्ट करण्या इतपत माझी योग्यता नाही....
म्हणून मी ज्या करबला युद्धात वेदनादायक घटना घडल्या त्या स्पष्ट करण्यासाठी मराठी काव्यप्रकार रिवायत याची मदत घ्यायची ठरवली...
रिवायत म्हणजे शोकगीत जे करबला युद्धात घडले त्याची घटना सांगितली जाते...
ह्यासाठी मराठी रिवायत मी आपल्या समोर मांडणार आहे...👍
सुरुवातीला हूर पैलवान बद्दल..
हूर हा यजीद सैन्याचा एक सेनापती होता त्याला यजीदाने इमाम हुसेन अ. स.याना मारण्यासाठी सैन्य घेऊन लावून दिले होते पण इमाम हुसेन यांचे रूप बघून हूर पैलवान इमाम हुसेन यांच्या सैन्यात दाखल झाले पुढील रिवायत त्यांच्या बद्दलच आहे...
Great Example of Hindu Muslim Brotherhood
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
"Farida Tann Sukka Pinjar Thia Kaliya Kundey Kaag Aje So Rabb Na Bauhdiyo Dekh Bande ke Bhaag."
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Urs/Death Anniversary of the Greatest Punjabi Sufi Saint, developer of Punjabi written method/script Shahmukhi, the Sufi who has the most contribution in the Sikh Holy Scripture Sri Guru Granth Sahib Ji,
the legend after whom ex Punjab CM Pratap Singh Kairon founded the great industrial city of Faridabad in South Haryana and after whom Faridkot and many other cities in N India are named. The legend who want North Indian royal tribes like Tiwanas,