आजपर्यंत पनवेल महानगरपालिकेचं स्वत:चं एकही हाॅस्पिटल नाही. एमजीएम- कामोठे, डीवाय पाटील -नेरूळ आणि रायगड जि.प.चं उपकेंद्र इथे पनवेल महानगरपालिकेने बेड्स घेतले आहेत. त्यांच्याकडे स्वत:चा आरोग्यअधिकारी नाही.
12 लाख लोकसंख्या असलेल्या शहरात स्वत:चं महानगरपालिकेचं हाॅस्पिटल नाही, मग ही महानगरपालिका अस्तित्वात आणून त्याचं राजकीय श्रेय घेऊन तत्कालीन भाजप सरकारने काय साध्य केलं?
23 ग्रामपंचायत आणि 29 गावंही पनवेल महानगरपालिकेत समाविष्ट झाली. या गावांचा विरोध होता. त्यांचे 639 कर्मचाऱ्यांच्या पदांनाही अद्याप मान्यता मिळालेली नाही.
याबद्दल मुंबई मिररमध्ये केलली बातमी
mumbaimirror.indiatimes.com/coronavirus/ne…