*कवि वर्डस्वर्थचे घर होणार बौद्ध विहार* William Wordsworth's home saved by Buddhist charity.
इंग्लंडचा शेक्सपियर, जर्मनीचा गटे व शिलर, तसेच रशियाचा पुष्किन या प्रतिभावंत साहित्यिकांमुळे त्या त्या देशातील लोकांचे जीवन पिढ्यान्पिढ्या व्यापून गेले आहे. विल्यम शेक्सपिअर 1)
यांच्याप्रमाणे विल्यम वर्डस्वर्थ या रोमँटिक आणि सौंदर्यवादी कवीचा दबदबा देखील इंग्रजी साहित्यात आहे. पाच भावंडात त्याचा नंबर दुसरा होता. वडील जॉन वर्डस्वर्थ मुलांना कविता शिकवीत, त्यामुळे त्यांच्यात कवितेची आवड निर्माण झाली. सन १७८७ मध्ये केम्ब्रिज येथे शिकत असताना विल्यमने 2)
पहिले सुनीत ( Sonnet ) लिहिले. हळूहळू ते निसर्गकवी म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांची लहान बहीण डोरोथी हिला देखील काव्याची आवड होती व ती देखील कवियत्री झाली. त्यावेळी झालेल्या फ्रान्स व इंग्लंड मधल्या तणावामुळे ते बायको आणि मुलीला सोडून इंग्लंडला परत आले.
3)
त्यांच्या मुलीचे नाव कॅरोलीना होते. मुलगी व बायको याची त्यांना खूप आठवण येत असे. मुलीवर त्यांनी अनेक कविता लिहिल्या. १७९३ मध्ये त्यांचे 'ऍन इविनिंग वॉक' आणि 'डिस्क्रिप्टिव्ह स्केचेस' नावाचे कवितासंग्रह प्रसिद्ध झाले. १७९५ साली त्यांची कॉलरीज यांच्याशी ओळख झाली.
4)
दोघे घनिष्ठ मित्र बनले व त्या दोघांनी मिळून Romantic Movement हा कवितासंग्रह लिहिला. तसेच त्यांची गीतगाथा (Lyrical Ballads)आज उत्कृष्ट कलाकृती मानली जाते. वर्षानुवर्षे एकाच विशिष्ट पद्धतीने रचल्या जाणाऱ्या कवितेला स्वच्छंद आणि मुक्त स्वरूपात रचण्याची किमया वर्डस्वर्थने
5)
केली. हाच 'सुनीत' काव्यप्रकार मराठीत रुजविण्याचे काम रविकिरण मंडळातील अनेक कवींनी केले. त्यामध्ये माधव ज्युलियन, कवी बी, केशवसुत असे दिग्गज कवी होते. केशवसुत ( त्रंब्यक बापूजी ठोमरे ) यांची कविता 'आम्ही कोण' ? हे सुप्रसिद्ध सुनीत काव्य होते. आणि त्याचे
6)
केशवकुमार (आचार्य अत्रे) यांनी केलेले विडंबन हे सुद्धा चौदा ओळींचे सुनीत काव्य होते.
निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या वर्डस्वर्थ यांच्या टुमदार घरापाशी एक तळे होते. त्या तळ्यातील डॅफोडिल्स फुले ते वारंवार बघत. मेघ होऊन आसमंतात व पर्वतावर फिरावे. आकाशातून तळ्यातील सोनेरी
7)
डॅफोडिल्स फुले न्याहळावीत अशी कवी कल्पना त्यांच्या काव्यातून दिसून येते. आणि ती त्यांनी अतीशय वेगळ्या आणि मधुर भाषेत अशी रचली की अजरामर होऊन गेली. त्यांची काव्यसंपदा ज्या निसर्गरम्य ऍलफॉक्सटॉनच्या उद्यान घरात उदयास आली ते घर म्हणजे इंग्लंडच्या साहित्यिक वर्तुळात ऐतिहासिक
8)
ऐवज होते. परंतू वर्डस्वर्थ नंतर कालांतराने त्या घराची बुज राखली गेली नाही. तेथे एक हॉटेल सुरू झाले. एका जगप्रसिद्ध कवीची ही मोठी थट्टा होती. परंतु पुढे तेथील असोसिएशनने ते हॉटेल बंद पाडले. व ती जागा जेव्हा विकण्यास काढली तेंव्हा एका बौद्ध संस्थेने नुकतीच ती १.४ मिलियन
9)
पाउंडला विकत घेतली.
अलौकिक निसर्गरम्य शांतता लाभलेल्या या घराचे रूपांतर आता बौद्ध ध्यान साधना केंद्रात होणार असून वर्डस्वर्थच्या निसर्गरम्य सप्तरंगी कवितेला आता खरा न्याय मिळेल अशी आशा तेथील सर्वजण व्यक्त करत आहेत. ऍलफॅक्सटॉन पार्क ट्रस्ट चॅरीटीचे ट्रस्टी धम्मचारी
10)
लोकबंधू यांनी सांगितले की आता सुंदर व ऐतिहासिक साहित्याचा वारसा लाभलेल्या या वास्तूची आम्ही अधिक चांगल्या प्रकारे काळजी घेऊ आणि उपयोगात आणू. अभिजीत कला उगमाचे स्थळ असलेल्या या वास्तुचे नुतनीकरण ऑगस्ट २०२१ मध्ये पूर्ण होईल.
11)
तेव्हा वर्डस्वर्थची साहित्यिक कलाविश्व वास्तू साधकांच्या ध्यानसाधनेने अधिक उजळून निघेल.
12).
डॉ . अल्बर्ट एलिस .
अमेरिकेतील नामांकित मानसोपचारतज्ञ . यांना मानसशास्त्रज्ञ सुद्धा म्हणता येईल . विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती (rational emotive behaviour thearapy ) हा त्यांचा मनाच्या जगातील सर्वात महत्वाचा शोध . अनेकांना मानसिक स्थैर्य मिळवून देणाऱ्या या पद्धतीचा शोध 1)
खरंतर त्यांनी स्वतःला स्थिरता मिळवून देण्यासाठी लावला होता . या शोधाची सुरुवात त्यांनी लहानपणीच केली होती . भावनेच्या आहारी न जाता , तर्कसंगत बुद्धी वापरून केलेला विचार मनाला स्थिर करतो हा त्यांचा अनुभव त्यांनी जगाला पटवून दिला . त्यासाठी अनेक उदाहरणे आणि दाखले दिले .
2)
आणि आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांच्या कार्याची दखल घेणे सर्व जगाला भाग पडले . त्यांनी मांडलेले काही सिद्धांत सोप्या भाषेत पुढीलप्रमाणे आहेत .
१) माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर त्याच्या प्रतिक्रिया आणि कृती अवलंबून नसतात , तर त्या घटनांकडे तो कोणत्या दृष्टीकोनातून बघतो
3)
नुकतीच नाणेघाटला जाऊन आले होते.त्यासंदर्भात #मर्यादित वाचन केलं होतं.त्यातून हे कळालं की, हा नाणेघाट म्हणजे घाटांचा राजा.हा इसवीसनपूर्व काळात बांधला गेलाय.हे वाचूनच रोमांच उभे राहिले. काय ते कसब? अभियांत्रिकीमधला चमत्कारच.
सातवाहन सम्राज्ञी गौतमीपुत्र 1)
सातकर्णीची पत्नी नागणिका हिचा नाणेघाटातल्या लेणीतला तो प्रख्यात शिलालेख. पहिल्यांदा गेले तेव्हा वेड्यासारखी धावत गेले होते त्या भित्तीकडे. त्या पाषाणातल्या अक्षराईत हरवून गेले होते.मला न समजणाऱ्या ब्राम्ही भाषेतली ती अक्षरं पण विलक्षण प्रेमानं,कदाचित इतिहासाच्या फारसं न 2)
जपता आलेल्या वेडामूळे माझे हात त्या अक्षरांवरनं फिरत होते.नागणिका इथेच असेल का? माझ्या आसपास?माझी ही ओढ बघत असेल का?तिला छान वाटत असेल का आपला शिलालेख असा चिरंजीवी झालेला पाहून? तिचा चुडाभरला अमानवी हात माझ्यासोबतच तीही त्या अक्षरांवरनं फिरवत असेल का? धुक्यासारख्या तरल
3)
इथल्याच (पनवेल स्टॅंडजवळ) एका छोटेखानी हाॅटेलवाल्याने बाबासाहेबांना पाणी नाकारले त्यावेळी अस्वस्थ झालेले, गरीब मजूर असलेले सोनबा येलवे बाबासाहेबांसाठी पाणी आणायला गेले.
पाणी आणले, तोपर्यंत बाबासाहेब पुढील प्रवासाला निघूनही गेले होते. 1)
बाबासाहेब परत याच मार्गाने येतील तेव्हा त्यांना पाणी मिळायला हवे आणि ते मी देईन या इच्छाशक्तीने ते दरदिवशी पाणी घेऊन येत. परंतु बाबासाहेब परत त्या मार्गाने आले नाहीत.
...आणि वाट पाहून अखेर, इथेच सोनबा येलवेंचा मृत्यू झाला.
2)
त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पनवेल महानगरपालिकेने ही पाणपोई बांधली आहे. येणार्या-जाणार्यांना पाणी मिळावे या उदात्त हेतूने.
उशीरा का होईना, बाबासाहेबांच्या प्रेमाखातर त्याग करणारी व्यक्तिमत्त्वं उजेडात येत आहेत.
3)
मनुस्मृती दहन केल्यानंतर तत्कालीन काही ब्राह्मण्यग्रस्त वृत्तपत्रांनी टीकात्मक लेखन केले. त्यावर बाबासाहेबांनी बहिष्कृत भारत पत्रातून त्यांचा समाचार घेतला. वाचा !
- आनंद गायकवाड
आमच्या मित्रांचा दुसरा असा एक आक्षेप आहे की मनुस्मृती ही जुन्या काळी अंमलांत असलेल्या 1)
नियमांची एक जंत्री आहे. त्या जंत्रीतील नियम आज कोणास लागू नाहीत. मग असले जुने बाड जाळण्यात काय अर्थ आहे ? मनुस्मृती हे एक जुने बाड आहे असे आमच्या मित्राप्रमाणे आम्हासही म्हणता आले असते तर आम्हास मोठाच आनंद झाला असता. परंतु दुर्दैवाने आम्हांस तसे म्हणता येत नाही. आणि आमची
2)
खात्री आहे की, भावी स्वराज्याचा चंद्रोदय केव्हा होतो हे पाहण्याकरिता, आमच्या मित्रांचे डोळे आकाशाकडे लागले नसते तर आपल्या पायाखाली काय जळते आहे हे त्यांना निरखून पाहताच आले असते. मनुस्मृती हे एक जुने बाड आहे, ते राहिले तरी काही हरकत नाही असा युक्तिवाद करण्याऱ्या गृहस्थांना
3)
जमालगढी सध्याच्या पाकिस्तानातील खबैर पक्ख्तुन्ख्वामधील मरदानच्या कटलांग मरदान मिर्गापासून १३ किमी अंतरावर हे शहर आहे. जमालगढी येथे प्राचीन स्तूप व विहारांचे अवशेष सापडले आहेत.
जमालगढी येथील स्तूप व विहार १/५ शतकातील भरभराटीचे बौद्ध ठिकाण होते. 1)
जमालगढीचे स्थानीय नाव "जमालगढी कंदारत" किंवा "काफिरो कोटे" असे आहे. जमालगढीच्या भग्नावशेषांचा प्रथम शोध ब्रिटीश पुरात्ववेत्ता व गाढे अभ्यासक अलेक्झांडर कॅनिंगहॅम यांनी इसवी सन १८४८ मध्ये लावला.
कर्नल ल्युम्स्डेन यांनी जमालगढी येथे उत्खनन केले होते पण तेव्हा तेथे विशेष 2)
काही सापडले नाही. नंतर इसवी सन १८७१ मध्ये लेफ्टनंट क्राॅमटन यांनी पुन्हा येथे उत्खनन केले व अनेक बौद्धशिल्पे सापडली आहेत.
चित्र क्रमांक एक जमालगढी, मरदान, पाकिस्तान बौद्ध नगरीचे भग्नावशेष.
चित्र क्रमांक दोन १/३ शतकातील राणी महामायेचे स्वप्न शिल्प जमालगढी, मरदान,
3)
आम के पेड़ के नीचे ब्राह्मण तुलसीदास रामचरित्रमानस लिख रहे थे. अचानक पेड़ से आम तुलसीदास के सर पर गिरा. तुलसीदास बहुत खुश हुआ, उसने आम को ईश्वर का दिया हुआ उपहार समझकर खा लिया !
मुग़ल राज में गाय कट रही थी, मुग़ल समोसे में गाय का मांस भर भर कर खा रहे थे. 1)
लेकिन तुलसीदास को कोई आपत्ति नही थी, वह मग्न होकर आनंदित होकर, लगा लिखने "ढोल गंवार पशु नारी सकल ताड़ना के अधिकारी" !
किसान का बेटा इसाक न्यूटन सेब के पेड़ के नीचे विज्ञान की पढ़ाई कर रहा था. अचानक से एक सेब न्यूटन के सर पर गिर गया. न्यूटन ने सेब उठाया उसे ध्यान से
2)
देखने लगे मानो कभी सेब देखा ही नही. लेकिन न्यूटन सेब नही देख रहे थे वह सोच रहे आखिर सेब नीचे क्यों गिरा ?
सेब ऊपर क्यों नही गया... नीचे ही क्यों आया ?. ऊपर चांद है वह क्यों नही गिरता. धरती में जरूर कोई फ़ोर्स है. ताक़त है जो चीजों को अपनी ओर आकर्षित करती है !
3)