राष्ट्रीय एकात्मता आणि आपण -
आपला भारत देश अगदी रामायण काळापासून ते महाभारतापर्यंत आणि चंद्रगुप्त मौर्य पासून इंग्रज काळापर्यंत सांस्कृतिकदृष्ट्या अखंड आणि एकात्म राहिला आहे...
काही राजकारणी लोकांनी वैयक्तिक स्वार्थापायी भाषिक आणि प्रांतिक अस्मितेचे राजकारण करत देशाच्या एकात्मतेला सुरुंग लावण्याचे काम केलं.
इतकचं काय Black Lives Matter वर ट्विट करणारे आम्ही आसामी मणिपुरी बांधवांना नेपाळी म्हणतो? काय वाटतं असेल त्यांना ??
पण जेव्हा युपी बिहार मधून महाराष्ट्रात उपजिविकेसाठी आलेल्या गरीब मजुरांना मारहाण करत अक्षरशः हाकलून लावलं जातं होत तेव्हा त्यांना वाचवायला कुणीच पुढे का आलं नाही?
जी आज आपल्याला नाममात्र दिसत आहे. आणि ती अशी आपसूक निर्माण होणार नाही, ती आपल्याला आपल्या कृतीतून जोपासावी लागेल.
भारताचा अर्वाचीन इतिहास लहान मुलांना शिकवून त्यांच्या वर जात-धर्म, श्रीमंत-गरीब याच्या पलीकडे जाऊन संस्कार करावे लागतील.
जय हिंद 🇮🇳 #tweet4bharat