देश कोणताही असो, शासन कोणतेही असो, संबंधित नेत्यांच्या अथवा पक्षाच्या जाहीरनाम्यात हमखास आढळणारा शब्द म्हणजे सामाजिक न्याय. जगण्याला वेळ गरजेची असते पण वेळेची व्याख्या कशी करणार? त्याप्रमाणे कोणत्याही समाजाला सामाजिक न्याय गरजेचा असतो पण ह्या सामाजिक न्यायाची व्याख्या काय? 1+
सामाजिक न्याय हा सर्वसमावेशक शब्द असूनसुद्धा त्याची सर्वमान्य व्याख्या करता येते? किंबहुना सामाजिक न्यायाची सर्वमान्य व्याख्या करता नं येणे हेच सामाजिक न्यायाची अवस्था भीषण असल्याचे द्योतक आहे. अगदी भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेतसुद्धा हा शब्द आहे. शब्दशः अर्थ काढायचा झाल्यास 2+
संपूर्ण समाजाची गरज जो पूर्ण करू शकतो तो न्याय म्हणजे सामाजिक न्याय. मग ती गरज आर्थिक, सामाजिक, राजकीय, पर्यावरणाच्यादृष्टीनेही असू शकेल. वरकरणी पाहता ही व्याख्या परिपूर्ण वाटू शकेल पण दुसरा प्रश्न उभा ठाकतो तो म्हणजे इथे नेमका कोणता संपूर्ण समाज अभिप्रेत आहे? जातीवर आधारित?3+
धर्मावर आधारित? लिंगावर आधारित? राजकीय आर्थिक वा सामाजिक पुढारलेपणावर आधारित? नेमका कोणता? इथेच आणि इथेच खरी मेख आहे..
रॉस्को पौंड नावाचा एक प्रसिद्ध विचारवंत होऊन गेला तो म्हणतो कि समाजात एकूण तीन रस (इंटरेस्ट) असतात. वैयक्तिक, सामाजिक आणि राजकीय. आणि ह्या तीन रसांचे संचालन 4+
करणे हे कायद्याचे काम. म्हणजे थोडक्यात ह्या तीन रसांमध्ये ताळमेळ बसवणे हे कायद्याचे काम. आणि जिथे वैयक्तीक रस आड येईल तिथे समाजाचा विचार करून त्याला बाजूला केले तरी चालेल. पण जर सामाजिक रसच जर एकमेकांच्या आड येत असतील तर? ह्यावर तो काहीच बोलत नाही. सामाजिक न्यायाच्या आड 5+
हीच गोष्ट येते. जेरेमी बेंथम नावाचा एक अजून प्रसिद्ध विचारवंत आहे तो म्हणतो, कि जास्तीत जास्त लोकं आनंदी होणे हे बघणे कायद्याचे कर्तव्य. अल्पसंख्य समाजाकडे दुर्लक्ष झाले चालेल. शेवटी समाज म्हणजे काय तर माणसांचा समूह. त्याला आकडा असतोच.
बेंथम समाजाकडे आकडा म्हणून बघतो. 6+
तिथेच फसतो. कारण सामाजिक न्यायाच्या परिमाणात आकडा महत्वाचा नाही तर कोणावरही अन्याय नं होणे अभिप्रेत असते..
न्यायाची व्याख्या कशी करायची हा अजून एक दुसरा प्रश्न. एकासाठी असणारा न्याय दुसऱ्यासाठी अन्याय असेल तर पहिल्या व्यक्तीला मिळालेला न्याय हा सामाजिक न्यायाच्या परिमाणात बसत 7+
नाही. आरक्षणावरून जो वाद सतत ज्वलंत असतो तो पाहता आरक्षणाने खरंच सामाजिक न्याय प्रस्थापित केला? आरक्षण नसतं तर त्या समाजाला आशेची एवढी किरणं आज उपलब्ध असती? न्यायालयातून जलद न्यायाची अपेक्षा असणे गैर नाहीच पण अतिजलद न्यायाने खरंच न्यायाची प्रक्रिया पाळली जाईल? 8+
अमर्त्य सेन त्यांच्या, "आयडीया ऑफ जस्टीस" नावाच्या पुस्तकात एका बासरीचे उदाहरण देतात. ह्या बासरीवर तिघे हक्क सांगतात. ती वाजवू शकणारा कलाकार, ती विकून जो स्वतःचं पोट भरू शकेल असा गरीब, आणि ती विकत घेऊन जो आपल्या आलिशान बंगला सजवू शकतो तो श्रीमंत. तिघेही आपापल्या जागेवर बरोबर 9+
आहेत. जर तो बासरी कलाकाराला दिली तर इतर दोघांवर ते अन्याय करणारं आहे. तसंच
इतर दोघांच्या बाबतीतही. ह्यावर बराच मोठा वाद होऊ शकतो.
थोडक्यात सामाजिक न्यायाच्या गप्पा मारत असताना इथे नेमका कोणता समाज अपेक्षित आहे हेही कोणाला स्पष्ट करता येत नाही. आणि न्यायाची सर्वमान्य 10+
व्याख्यासुद्धा कोणास करता येत नाही. म्हणजे एकंदरीत काय तर ज्या संकल्पनेचे अस्तित्वच अस्पष्ट आहे त्यावर अवलंबून असणारे राजकारण मात्र अतिशय स्पष्ट आणि आखीव आहे हेच खरं..
जगाच्या इतिहासात एका राष्ट्रातली सामाजिक न्यायाची संकल्पना इतर राष्ट्रात लागू होत नाही. म्हणजे पुन्हा हा 11+
समाज हा राष्ट्रा राष्ट्रांच्या सीमांनी बांधला गेलाय का? असाही प्रश्न उभा राहतो. कम्युनिस्टांचा सामाजिक न्याय लोकशाहीवादी लोकांना पटत नाही. लोकशाहीवाद्यांचा सामाजिक न्याय धार्मिक राष्ट्रात मानला जात नाही. धार्मिक राष्ट्रातील सामाजिक न्याय हा त्यांच्या पुस्तकात लिहिलेला असतो जो 12+
गेली कित्येक दशके, शतके बदललेला नाही. कायद्याने समाजानुसार बदलले पाहिजे असा तथाकथित सर्वमान्य समज आहे. इथेही आपण एकवाक्यताआणली, तर पुन्हा एक फार मोठा फरक समोर येतो म्हणजे अविकसित, विकसनशील आणि विकसित राष्ट्रातील मूलभूत समाज.. इथे कशी एकवाक्यता आणणार?
ह्या संकल्पनेत एकमत नाही 13+
तर धोरणांमध्ये कुठून येणार?
अमर्त्य सेन ह्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर कोणावरही सामाजिक अन्याय होऊ नं देणं म्हणजे सामाजिक न्याय अशी संदिग्धतेत अजून भर टाकणारी व्याख्या करतो आणि थांबतो..
धन्यवाद..
अंबानींनी देश सोडून द्यायला पाहिजे..त्यांना धर्म कळत नाही.. काहीही कळत नाही..
त्या माधुरीला मोठ्या प्रमाणावर गुडघेदुखी, सांधेदुखी, पायांना गँगरीन होणे, तसेच मोठ्या प्रमाणावर वाढलेली नखे या समस्या असून देखील (१/६)
तिला धार्मिक प्रथा-परंपरांचा भाग म्हणून गावातील मिरवणुकांमध्ये नेले जात असे म्हणे.. कशाला ह्यात खंड पाडायचा? तिच्या आरोग्याची ह्या प्रथेपुढे काहीही किंमत नाहीये हे एकावेळेस न्यायालयाला समजणार नाही पण निदान अंबानींना तरी कळायला हवं होतं राज्यात इतर कुठे एकतरी (२/६)
हत्तीण आहे? आता कुठून प्रथा पार पडणार?
जिथं तिला ठेवलं जात होतं ती जागा टणक होती म्हणून तिचे आजार बळावत गेले म्हणे. त्या हत्तिणीने कधी कोण्या माहुताला हे सांगितलं का? नाही ना? मग?
एक तर हत्तीला कसं सांभाळायचं हे वनताराला कळत नाही. कशाला तिच्या पायातले साखळदंड काढायचे? (३/६)
हिंदी सक्तीला व्यवस्थित आणि अत्यंत अभ्यासपूर्ण विरोध केल्याने फडणवीसांना एक पाऊल मागे घ्यायला भाग पाडल्याबद्दल माय मराठी राज ठाकरेंचे मनापासून अभिनंदन करत असेल.
आज एक मराठी त्यातही कट्टर मराठी म्हणून मला राज ठाकरेंचा (१/१०)
काय अभिमान वाटत आहे हे मराठीत व्यक्त होताना मराठीत पुरेसे शब्द नाहीत हे माझे दुर्दैव. त्यावर लवकरच अभ्यास करून मराठीला अजून समृद्ध करण्यासाठी जर्मन भाषेकडून नक्कीच मार्गदर्शन घेतले जाईल. कारण ह्याच राज ठाकरेंच्या सुपुत्राने मराठी नाकारून जर्मन घेतली होती. (२/१०)
अर्थात जर्मन शिकून त्यांनी काय "दिवे" लावले आपण सर्वांनी पाहिले असेलच. असो डॉन बोस्को सॉरी डॉन बॉस्को.. ठाकरे उद्या हिब्रू भाषेत जरी शिकले तर त्याने मराठीचीच सेवा होणार आहे. "वो ठाकरे है कूच बी कर सकते है.."
शाळेत, सॉरी मराठीमध्ये बोललं पाहिजे, मराठी स्कूल मध्ये (३/१०)
सुरुवातीला सांगतो.. लेख फार मोठा आहे.. वेळ घेऊन वाचा..
"घटनाद्रोही इंदिरा वि. नरेंद्र मोदी.."
सकाळपासून इंदिरा गांधींचा भयंकर उदो उदो सुरू आहे. आज इंदिरा असायला हवी होती वगैरे वगैरे..
ह्याच विषयावरची डिटेल्ड पोस्ट.. (१/२४)
मोदी वि. इंदिरा म्हणजे, १९७१ चे युद्ध वि. ऑपरेशन सिंदूर, म्हणजे १९७२ चा शिमला करार वि. कथित शस्त्रसंधीची बोलणी..
* नेमका काय फरक आहे?
तेंव्हा भारत काश्मीरचा मुद्दा सोडवू शकला नव्हता. जिन्नालँडच्या पश्चिमेकडील १५ हजार वर्ग किलोमीटर जमीन घेऊ शकला नव्हता. कारण (२/२४)
शिमला करार १९७२..
त्यावेळेस जर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय दबावापुढे झुकल्या नव्हत्या तर
१. जिन्नालँडचे ९३,००० युद्धकैदी का सोडले? आणि जिन्नालँडकडून भारताचे ५४ युद्धकैदी ज्यामध्ये मेजर रँकवरील अधिकाऱ्यांचासुद्धा समावेश होता ते का परत मागू शकली नाही?
२. जिन्नालँडचा १५ (३/२४)
कालच्या निवडणुकीत एका वृद्ध व्यक्तीचा कमळ कुठाय, मला कमळालाच मतदान करायचं आहे चा विडिओ वायरल झाला होता. ह्यावर बर्याचजणांनी प्रदेश भाजपवर तोंडसुख घेतलं होतं, कि राजकीय तडजोडी तळागाळार्यंत न्यायला ते कमी पडले. त्यांचं चूक कि बरोबर ह्यात मी पडणार नाही. पण (१/९)
अंतिम मत बनवायच्या आधी हा लेख वाचा..
ह्या एका व्हिडिओवरून जर जनरलायजेशन करायचं ठरवलं तर (अर्थात ते चुकीचं आहेच) जे भाजपसमर्थक आहेत ते काहीही झालं तरी कमळाला मतदान करणार हे सिद्ध होतं. म्हणजे काही झालं तरी भाजपमागे उभा असणारा हा वर्ग सुटणार नाहीच. कितीही प्रचार आणि (२/९)
प्रसार केला तरी एक असा वर्ग आहे ज्याला समकालीन राजकीय घडामोडींची फारशी कल्पना नसते. कमळ दिसलं कि बटन दाब, कुठलाही दुसरा विचार नाही करत. असे समर्थक प्रत्येक पक्षात असतात.
हा मुद्दा राष्ट्रवादी आणि शिवसेनेसंदर्भात वापरून बघू.
राज ठाकरे आणि भाजपमध्ये जे काही चाललं आहे त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे.. (अर्थात मी कोण?)
येन केन प्रकारेण "तो" आकडा मिळवण्यासाठी जे काही केलं जाईल त्याला माझी कसलीच ना नाही.. (अर्थात पुन्हा मी कोण?)
मोदी शहा आणि फडणवीस ह्यांच्या दूरदृष्टीबद्दल मलाच काय (१/७)
कोणालाही शंका असल्याचे कारण नाही. विरोधाला विरोध करायला गुलाम्स येतीलच पण ज्यांना त्यांचे मालकच मानत नाहीत त्यांच्याबद्दल मी पामराने काय बोलावे?
फक्त २०१९ हे वर्ष, जाहीर सभांमधून पातळी सोडून केलेली वक्तव्ये, "त्या" नेत्याच्या वैयक्तिक जीवनात त्याचे पडलेले प्रतिबिंब (२/७)
आणि त्याची झालेली जाहीर वाच्यता (पुत्राच्या लग्नाच्यासंबंधीचा किस्सा जगजाहीर आहे), भाजपच्या कार्यकर्त्यांना/समर्थकांना सोडू नका सारखी जाहीर आवाहने, ला वा री स आणि सोबतची सगळी कार्ड्स संपल्यावर अपहार्यतेतून हिंदुत्वाकडे वळलेली पावले ह्याकडे दुर्लक्ष करता येत नाही.. (३/७)
गुजरातच्या मार्गाने प्रदेश भाजपचा प्रवास सुरु आहे..
बऱ्याच जणांना भाजपमध्ये जो काही विरोधी पक्षातील नेत्यांचा प्रवेश सुरु आहे त्यावरून वाईट वाटतंय. विरोधीपक्षातले कार्यकर्ते आता कसं वाटतंय? म्हणत खिल्ली उडवण्यात समाधान शोधत आहेत, आत खोलवर झालेली (१/६)
जखम विसरायचा केविलवाणा प्रयत्न करत...
हे जे काही प्रदेश भाजपात सूरु आहे ते अगदी गुजरातच्याच मार्गाने सुरु आहे. गुजरातेत गेल्या वीस वर्षात भाजपा प्रबळ झाली आणि काँग्रेस दुर्बळ झाली ह्यामागे काँग्रेसला त्यांचे नेते टिकवता आले नाहीत हे जेवढे मोठे कारण आहे (२/६)
तेवढेच हे सगळे मोठे नेते भाजपात आले हेही आहे.
यादी पाहुयात..
१. शंकरसिंह वाघेला - काँग्रेस पाठिंब्यावरचे पूर्व मुख्यमंत्री (त्याआधीचे जनसंघी)
२. केशूभाई पटेल - काँग्रेस पाठिंब्यावरचे पूर्व मुख्यमंत्री (त्याआधीचे जनसंघी)
३. नरहरी अमीन - काँग्रेसचे नेते, पूर्व (३/६)