*केरळात सापडल्या प्राचीन बुद्धमूर्ती* Ancient Buddha Statues found in Kerala State.
केरळ राज्यात अनेकजण पर्यटनासाठी जातात. कुणी तिथे देवालयांच्या दर्शनासाठी जातात तर कुणी केरळातील निसर्गसौंदर्याचा अविष्कार पाहण्यास जातात. कुणी संस्कृतीचा अभ्यास करण्यास तर कुणी कामानिमित्त 1)
भेट देतात. पण केरळाला जाऊन कुणी बुद्धमूर्ती पाहून आल्याचे आजपर्यंत सांगितले काय ? कारण केरळ म्हणजे सगळीकडे मोठं मोठी मंदिरे. बुद्धमूर्ती तिथे कशा असतील हा अनेकांना प्रश्न पडतो. पण आता अनेक ठिकाणी पुरातन बुद्धमूर्ती प्राप्त झाल्याने केरळाची मूळ संस्कृती उजेडात येत आहे. 2)
एकेकाळी भरभराट असलेली बौद्ध संस्कृती या प्रदेशातून विस्मरणात कशी काय गेली या बाबत संशोधन होत आहे. ४५ वर्षांपूर्वी शाळेत असताना केरळला भेट दिली होती. वडील त्यावेळी केंद्र सरकारच्या सेवेत त्रिचूर येथे कार्यरत होते. त्यामुळे तेथील देवालयांची माहिती ज्ञात होती. पण त्यांचा 3)
खरा इतिहास आता कळत आहे.
इथे जेवढ्या बुद्धमूर्ती सापडल्या आहेत त्या सर्व तेथील देवळाजवळील तलावातून बाहेर काढल्या आहेत. एकेकाळी अनेक शतकांपूर्वी तिथल्याच विहारात, देवळात या मूर्ती तेथे स्थानापन्न होत्या. बुद्धिझमचा राजाश्रय जसजसा कमी होत गेला तसतसा पुरोहित लोकांनी त्याचा 4)
फायदा उचलला. तेथील राजाला अंकित करून घेतल्यावर बुद्धमूर्ती देवळाच्या तलावातच ढकलून दिल्या आणि त्याबाबत कल्पित कथा रचल्या. राजाच पुरोहित वर्गाचा बाहुला झाल्यावर लोकांनी सुद्धा राजाचे अनुकरण केले. इतिहासात सांगितले जाते की शंकराचार्याने वाद-विवादात बौद्ध भिक्खूंना हरविले. 5)
त्यांचा पाडाव केला. त्यामुळे बौद्धधर्म तिथून नाहीसा झाला. पण हा इतिहास लिहिला कोणी ? प्रत्यक्ष केरळच्या इतिहासात कुठेच वाद-विवाद आणि तात्विक चर्चा झाल्याचा पुरावा नाही. शंकराचार्यांची ही कथा बनावट असून संतांच्या अनेक बोगस दंतकथा प्रमाणे ती एका विशिष्ट वर्गाला अनुकूल होईल 6)
अशा पद्धतीने तयार केली आहे.
प्रत्यक्षात केरळात अकराव्या शतकापर्यंत बौद्धधर्म भरभराटीला होता. १२-१४ व्या शतकात आये, येजिमला आणि कुलशेखरा या बौद्ध राजांची राजवट संपुष्टात आल्यावर बौद्ध धम्माला कुणी वाली उरला नाही. धम्माचा उरलासुरला प्रभाव कमी झाला. तलावांना मल्याळी
7)
भाषेत 'अनपलंम' म्हणतात. 'अनप' म्हणजे प्रेम, दया, शांती आणि 'अलम' म्हणजे जागा. म्हणून 'अनपलंम' म्हणजे शांतीची, प्रेमाची जागा असा होतो. देवळातील बुद्धमूर्ती तलावात टाकल्यावर लोक तलावांना 'अनपलंम' म्हणु लागले. हा मोठा पुरावा पिढ्यानपिढ्या टिकून राहिला. धम्म विस्मरणात गेल्यावर
8)
हळूहळू उच्चनीचता आणि वर्णद्वेष यांचे विष सर्व केरळ आणि आजूबाजूच्या प्रदेशात पसरले. आणि हळूहळू पिढ्यानपिढ्या खोलवर रुजत गेले.
केरळात तलावाचे क्षेत्र हे 'अनपलंम' क्षेत्र झाले. महायान बौद्ध साहित्यात क्षेत्र म्हणजे जमीन, पूजनीय जागा असा अर्थ आहे. बुद्धक्षेत्र, पुण्यक्षेत्र,
9)
कुरुक्षेत्र हे शब्द मूळ महायानी बौद्ध पंथाची देण आहे. दुसरी आश्चर्याची गोष्ट म्हणजे केरळातील प्राचीन राजा ओनाटूक्कारा याची राजधानी 'मावेलिक्करा' याच्या आजूबाजूच्या क्षेत्रात अनेक बुद्धमूर्ती प्राप्त होत आहेत. ओनम आणि त्याचा प्रांत हा राजा मावेली याच्याबरोबर जोडला गेला
10)
आहे. ज्याचे राज्य समानता, सत्यता आणि गुणात्मकता यांचे द्योतक होते. ओनाटूक्कारा आणि ओनम या अशा पवित्र जागा आहेत जिथे धम्माची ज्योत शेवटपर्यंत फडफडत होती. केरळात प्राप्त झालेल्या बुद्धमूर्तीची ठिकाणे खालील प्रमाणे आहेत.
१) कायाकुलम बुद्ध :- कोलम जिल्ह्यात मुरुतूरकूलगारा
11)
येथील पल्लिकल तलावात ही बुद्ध मूर्ती सापडली.
२) नेपियर बुद्ध :- कोलम जिल्ह्यात अडूर येथून ११ कि.मी. दूर असलेल्या तलावात ही बुद्ध मूर्ती सापडली.
३) मन्नाडी बुद्ध :- पथनामिथीटा जिल्ह्यात इजाथुलक्काढा येथे ही बुद्धमूर्ती सापडली.
४) भरनिक्कावू बुध्द :- अलपूझा जिल्ह्यात
12)
कायमकुलम येथून ५.५ कि.मी. दूर असलेल्या तलावात सापडलेली बुद्धमूर्ती.
५) मावेलिक्करा बुद्ध :- अलपूझा जिल्ह्यात कंडीयूर देवळाच्या तलावात आढळलेली बुद्धमूर्ती.
६) करूमाडी बुद्ध :- अलपूझा जिल्ह्यात अंबालापूझा पासून पूर्वेकडे ४.७ कि.मी. अंतरावर सापडलेली बुद्धमूर्ती.
13)
याव्यतिरिक्त अर्नाकुलम जिल्ह्यात ३, इडुक्की जिल्ह्यात १, अलपूझा जिल्ह्यात १ आणि थ्रिसूर जिल्ह्यात १ अशा बुद्धमूर्ती सापडलेल्या आहेत. त्यातील काही क्षतिग्रस्त आहेत. केरळातील बौद्ध संस्कृतीचा पगडा अरबी समुद्रात कोचीन पासून २०० ते ४०० कि.मी. दूर असलेल्या लक्षद्वीप बेटांवर
14)
सुद्धा पडला होता. ६-७ व्या शतकात तेथे बौद्ध संस्कृती होती आणि अनेक स्तूप होते.( त्याबाबतची पोष्ट पुढे कधीतरी ) थोडक्यात इतिहासातील अनेक धागेदोरे आता सापडत असून केरळ राज्याचा मूळ इतिहास उजेडात येत चालला आहे. 15)
डॉ . अल्बर्ट एलिस .
अमेरिकेतील नामांकित मानसोपचारतज्ञ . यांना मानसशास्त्रज्ञ सुद्धा म्हणता येईल . विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती (rational emotive behaviour thearapy ) हा त्यांचा मनाच्या जगातील सर्वात महत्वाचा शोध . अनेकांना मानसिक स्थैर्य मिळवून देणाऱ्या या पद्धतीचा शोध 1)
खरंतर त्यांनी स्वतःला स्थिरता मिळवून देण्यासाठी लावला होता . या शोधाची सुरुवात त्यांनी लहानपणीच केली होती . भावनेच्या आहारी न जाता , तर्कसंगत बुद्धी वापरून केलेला विचार मनाला स्थिर करतो हा त्यांचा अनुभव त्यांनी जगाला पटवून दिला . त्यासाठी अनेक उदाहरणे आणि दाखले दिले .
2)
आणि आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांच्या कार्याची दखल घेणे सर्व जगाला भाग पडले . त्यांनी मांडलेले काही सिद्धांत सोप्या भाषेत पुढीलप्रमाणे आहेत .
१) माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर त्याच्या प्रतिक्रिया आणि कृती अवलंबून नसतात , तर त्या घटनांकडे तो कोणत्या दृष्टीकोनातून बघतो
3)
नुकतीच नाणेघाटला जाऊन आले होते.त्यासंदर्भात #मर्यादित वाचन केलं होतं.त्यातून हे कळालं की, हा नाणेघाट म्हणजे घाटांचा राजा.हा इसवीसनपूर्व काळात बांधला गेलाय.हे वाचूनच रोमांच उभे राहिले. काय ते कसब? अभियांत्रिकीमधला चमत्कारच.
सातवाहन सम्राज्ञी गौतमीपुत्र 1)
सातकर्णीची पत्नी नागणिका हिचा नाणेघाटातल्या लेणीतला तो प्रख्यात शिलालेख. पहिल्यांदा गेले तेव्हा वेड्यासारखी धावत गेले होते त्या भित्तीकडे. त्या पाषाणातल्या अक्षराईत हरवून गेले होते.मला न समजणाऱ्या ब्राम्ही भाषेतली ती अक्षरं पण विलक्षण प्रेमानं,कदाचित इतिहासाच्या फारसं न 2)
जपता आलेल्या वेडामूळे माझे हात त्या अक्षरांवरनं फिरत होते.नागणिका इथेच असेल का? माझ्या आसपास?माझी ही ओढ बघत असेल का?तिला छान वाटत असेल का आपला शिलालेख असा चिरंजीवी झालेला पाहून? तिचा चुडाभरला अमानवी हात माझ्यासोबतच तीही त्या अक्षरांवरनं फिरवत असेल का? धुक्यासारख्या तरल
3)
इथल्याच (पनवेल स्टॅंडजवळ) एका छोटेखानी हाॅटेलवाल्याने बाबासाहेबांना पाणी नाकारले त्यावेळी अस्वस्थ झालेले, गरीब मजूर असलेले सोनबा येलवे बाबासाहेबांसाठी पाणी आणायला गेले.
पाणी आणले, तोपर्यंत बाबासाहेब पुढील प्रवासाला निघूनही गेले होते. 1)
बाबासाहेब परत याच मार्गाने येतील तेव्हा त्यांना पाणी मिळायला हवे आणि ते मी देईन या इच्छाशक्तीने ते दरदिवशी पाणी घेऊन येत. परंतु बाबासाहेब परत त्या मार्गाने आले नाहीत.
...आणि वाट पाहून अखेर, इथेच सोनबा येलवेंचा मृत्यू झाला.
2)
त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पनवेल महानगरपालिकेने ही पाणपोई बांधली आहे. येणार्या-जाणार्यांना पाणी मिळावे या उदात्त हेतूने.
उशीरा का होईना, बाबासाहेबांच्या प्रेमाखातर त्याग करणारी व्यक्तिमत्त्वं उजेडात येत आहेत.
3)
मनुस्मृती दहन केल्यानंतर तत्कालीन काही ब्राह्मण्यग्रस्त वृत्तपत्रांनी टीकात्मक लेखन केले. त्यावर बाबासाहेबांनी बहिष्कृत भारत पत्रातून त्यांचा समाचार घेतला. वाचा !
- आनंद गायकवाड
आमच्या मित्रांचा दुसरा असा एक आक्षेप आहे की मनुस्मृती ही जुन्या काळी अंमलांत असलेल्या 1)
नियमांची एक जंत्री आहे. त्या जंत्रीतील नियम आज कोणास लागू नाहीत. मग असले जुने बाड जाळण्यात काय अर्थ आहे ? मनुस्मृती हे एक जुने बाड आहे असे आमच्या मित्राप्रमाणे आम्हासही म्हणता आले असते तर आम्हास मोठाच आनंद झाला असता. परंतु दुर्दैवाने आम्हांस तसे म्हणता येत नाही. आणि आमची
2)
खात्री आहे की, भावी स्वराज्याचा चंद्रोदय केव्हा होतो हे पाहण्याकरिता, आमच्या मित्रांचे डोळे आकाशाकडे लागले नसते तर आपल्या पायाखाली काय जळते आहे हे त्यांना निरखून पाहताच आले असते. मनुस्मृती हे एक जुने बाड आहे, ते राहिले तरी काही हरकत नाही असा युक्तिवाद करण्याऱ्या गृहस्थांना
3)
जमालगढी सध्याच्या पाकिस्तानातील खबैर पक्ख्तुन्ख्वामधील मरदानच्या कटलांग मरदान मिर्गापासून १३ किमी अंतरावर हे शहर आहे. जमालगढी येथे प्राचीन स्तूप व विहारांचे अवशेष सापडले आहेत.
जमालगढी येथील स्तूप व विहार १/५ शतकातील भरभराटीचे बौद्ध ठिकाण होते. 1)
जमालगढीचे स्थानीय नाव "जमालगढी कंदारत" किंवा "काफिरो कोटे" असे आहे. जमालगढीच्या भग्नावशेषांचा प्रथम शोध ब्रिटीश पुरात्ववेत्ता व गाढे अभ्यासक अलेक्झांडर कॅनिंगहॅम यांनी इसवी सन १८४८ मध्ये लावला.
कर्नल ल्युम्स्डेन यांनी जमालगढी येथे उत्खनन केले होते पण तेव्हा तेथे विशेष 2)
काही सापडले नाही. नंतर इसवी सन १८७१ मध्ये लेफ्टनंट क्राॅमटन यांनी पुन्हा येथे उत्खनन केले व अनेक बौद्धशिल्पे सापडली आहेत.
चित्र क्रमांक एक जमालगढी, मरदान, पाकिस्तान बौद्ध नगरीचे भग्नावशेष.
चित्र क्रमांक दोन १/३ शतकातील राणी महामायेचे स्वप्न शिल्प जमालगढी, मरदान,
3)
आम के पेड़ के नीचे ब्राह्मण तुलसीदास रामचरित्रमानस लिख रहे थे. अचानक पेड़ से आम तुलसीदास के सर पर गिरा. तुलसीदास बहुत खुश हुआ, उसने आम को ईश्वर का दिया हुआ उपहार समझकर खा लिया !
मुग़ल राज में गाय कट रही थी, मुग़ल समोसे में गाय का मांस भर भर कर खा रहे थे. 1)
लेकिन तुलसीदास को कोई आपत्ति नही थी, वह मग्न होकर आनंदित होकर, लगा लिखने "ढोल गंवार पशु नारी सकल ताड़ना के अधिकारी" !
किसान का बेटा इसाक न्यूटन सेब के पेड़ के नीचे विज्ञान की पढ़ाई कर रहा था. अचानक से एक सेब न्यूटन के सर पर गिर गया. न्यूटन ने सेब उठाया उसे ध्यान से
2)
देखने लगे मानो कभी सेब देखा ही नही. लेकिन न्यूटन सेब नही देख रहे थे वह सोच रहे आखिर सेब नीचे क्यों गिरा ?
सेब ऊपर क्यों नही गया... नीचे ही क्यों आया ?. ऊपर चांद है वह क्यों नही गिरता. धरती में जरूर कोई फ़ोर्स है. ताक़त है जो चीजों को अपनी ओर आकर्षित करती है !
3)