शिवबांचे शिलेदार ...(अपरिचित मावळे)
मी आज पासून तुम्हाला अपरिचित मावळे यांच्या वरील थ्रेड सादर करणार आहे.
त्या पैकी स्वराज्याचे तिसरे सरसेनापती कुड्तोजी गुजर उर्फ
प्रतापरावजी गुजर
यांचा परिचय तर १ थ्रेड पुरता मर्यादित नाहीय तरी थोडक्यात माहिती देतो.
1.परिचय ..(1/25)
यांचे खरे नाव ''कुड्तोजी गुजर'' त्यांचे मूळ गाव खातगुण आहे. याच्या शेजारी लोणी व भोसरी हि गावे आहेत.यांच्या हद्दी एकमेकाला लागून आहेत. हि गावे सातारा ते पुसेगाव च्या वाटेवर आहेत. तसेच हि गावे खटाव तालुक्यात मोडतात. या तिन्ही गावा मध्ये अजूनही कुड्तोजी गुजरांचे (मराठा) (2/25)
अनेक वंशज राहतात.प्रतिशिवाजी म्हणून ओळखले जाणारे नेताजी पालकरांचा हा शिलेदार त्यांच्या इतकाच रणझुंजार आणि रनगाजी होता.दीर्घकाळापर्यंत त्यांनी स्वराज्याची सेवा केली.
2.संभाजी कावजी चा वध.
अफझल खानच्या वधा च्या वेळी एक महाकाय शरीररक्षक म्हणून महारांजानी त्याची निवड केली. (3/25)
त्या नंतर त्याच्या शक्तीचा बोलबाला सर्वत्र झाला होता.नंतर त्याची बुद्धी फिरली आणि तो शाहिस्तेखानाला फितूर झाला, त्याला समजून परत स्वराज्यात आणण्यासाठी ची जबाबदारी कुड्तोजीं वर आली त्यांनी अनेक प्रकारे त्याला समजावून सांगितले तरी तो परत फिरायला तयार नव्हता नंतर (4/25)
कुड्तोनजींनी त्याला १४ वे रत्न तलवारीच्या चपळाईने दाखवले. असा एक च वार दिला कि,महाकाय माणूस परत उठलाच नाही.
3.उंबर खिंड पराक्रम..
यांचा खरा पराक्रम महाराजांनी पहिला तो उंबर खिंडीत जेव्हा करतलाब खान व रायबाधन यांचे मोघली सैन्य तुंगारण्यामध्ये शिरण्यापूर्वीच नेताजी पालकर व(5/25)
कुड्तोजी गुर्र यांचे मावळे जागोजागी लपून बसले होते.जसे मोघली सैन्य टप्प्यात आले.तसे ह्यांचे मावळे काट्या तलवारी सह तुटून पडले,अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मोघली सैन्य बिथरले सैरावैरा पळू लागले. करतलाब खान ला शरण जाण्याखैरीज दुसरा पर्याय नव्हता. भली मोठी खंडणी भरली तेव्हा(6/25)
महाराजांनी त्यांना जिवन्त जायची धर्मवाट करुन दिली."धन्य ते मावळे अन त्यांचे सरदार नेताजी,कुड्तोजी अन शिवाजी महाराज !! अशे गौरौद्गार या लढाईत काढले गेले.
4.सिंहगडची लढाई.
पुण्यातील लाल महालात महाराजांनी शाहिस्ते खान बरे तलवारीने आंधळी कोशींबीर खेळल्यावर खानाची ५५ सैनिक ठार (7/25)
झाले. खुद्द खानाची करंगळी आणि अंगठा सोडून उजव्या हाताची मधली ३ बोटे तोडली गेली तरी पण " मिया गीर तो भी टांगे उपर ". हा भीषण आणि भयानक हल्ला खान पचवू शकला नाही.त्याने प्रतिशोध करण्यासाठी म्हणून सिंहगडावर चाल केली. महारांची रणनीती म्हणजे भल्याभल्याना पाणी पाजून सोडणारी आहे.(8/25)
अगोदरच हि चाल करणार हे ओळखून होते म्हणून च सिंहगड सज्ज होता.नेताजी पालकरांचा एक अधिकारी कुड्तोजी गुजर वाट पाहत अगोदर च उभा होता. जो पर्यंत मोघली सैन्य टप्प्याचे बाहेर होते तो पर्यंत कुड्तोजी गप्प होते मोघली सैन्य टप्प्यात येताच,किल्ल्यातून तोफ गोळ्यांचा मारा सुरु झाला.(9/25)
दुसरीकडून कुड्तोजी व त्यांचे मावळ्यांनी हल्ला चढविला.सिंहगडच्या पायत्याशी मोघलांची नाचक्की झाली. करतलाबखान,नामदारखान , शाहिस्तेखान,इनायतखान, जसवंतसिंह राठोड यांची पूर्ती दाणादाण उडवण्यात कुड्तोजी पण आघाडीवर होते.
5.कुड्तोजी चा प्रतापराव ..
एवढे सगळे पराभव हाती लागल्यावर ,(10/25)
औरंगजेबाने मिर्जा राजा जयसिंह ला ८० हजार सैन्य व दिलेरखान पठाण आणि त्याचे ५ हजार पठाण अशी फोज घेऊन बुर्हाणपूर वरून निघाली अशी बातमी राजगड वर आली, इकडे कुड्तोजीच्या मनाला टोचणी लागली होती.मनात वादळ विचारांचे थैमान घालत होते.तशेच ते महारांजांकडे गेले आणि म्हणाले महाराज.,(11/25)
मिर्जाराजे स्वस्थ बसले तर ?महाराज म्हणाले तस झाले तर " स्वप्न देखील त्यापेक्षा देखणे असेल" आणि तस झाल तर राजकारणचा रंग बदलून जाईल.ते ऐकून कुड्तोजी म्हणाला आता मिर्जाराज्यांची चिंता करू नका आणि ताडकन निघून गेले आणि ते थेट गेले ते मिर्जाराज्याच्या डेऱ्यात ते मिर्जाराज्याची (12/25)
हत्या करणार होते, पण सफल होऊ शकले नाहीत ते पकडले गेले,मिर्जाराज्यांनी ओळखले हि शिवाजी राज्यांची चाल नाही. त्याला जिवंत सोडून द्या असा फर्मान काढला आणि त्याला म्हणले तुज्या धाडसावर आम्ही खुश आहोत.आमच्या मध्ये सामील हो तू मागशील तो मान व पैका आम्ही पण देऊ.कुड्तोजी म्हणाले (13/25)
छातीत खंजीर खुपसा..त्या पेक्षा माझ डोकंस उडवा
कुड्तोजीनी महाराजांना सर्व हकीकत सांगितली आणि महाराजांचा विश्वास बसेना कि मिर्जाराजे नि एवढी चांगली वागणूक दिली. मिर्जाराज्याच्या एक महत्वाचा निरोप महाराजांना दिला आणि महाराजांनी शत्रूगोटात जाऊन बातमी आणल्या बद्दल आणि (14/25)
त्यांना तलवार मानवस्त्र दिले आणि कुड्तोजी हे नाव बदलून आम्ही तुम्हाला "प्रतापराव" हा 'किताब बहाल करतो.
त्या नंतर भुईकोट किल्ल्यातून सुटका करून लाखोंचा खजिना स्वराज्यत आणला .प्रतापराव गुजरांनी खान्देशात पूर्ती धामधूम उडवली होती.शाहजादा मुअज्जमला औरंगजेबाने बोलावून घेतले व(15/25)
बहादूर खान याला दक्षिणेचा सुभेदार म्हणून नेमणूक केली.बहादूर व दिलेर यांची प्रतापरावनी चांगलीच पंचायत केली होती. वर्हाड,उत्तर तेलगंन,खान्देश,गंगाथडी या प्रांतात प्रतापराव धुमाकूळ घालत होते. 6.उमराणी पराक्रम ..(युद्ध)
प्रतापरावनी हा हा म्हणता म्हणता,वाई ,कऱ्हाड ,चंदन-वंदन,
(16/
नांदगिरी,कोल्हापूर हा भाग जिंकून घेतला.त्या प्रतापराव यांचा तळ,पन्हाळयाच्या पायथ्याशी होता.कोंडोजींनी अवघ्या ६० मावळ्यनिशी पन्हाळा जिंकून घेतला , हि बातमी ऐकून अली आदिलशाह हतबुद्ध होऊन गेला.बहलोल खान नावाचा एक अफगाणी पठाण (दुसरा अफजल खान च) मिरज व पन्हाळ्यचा सुभेदार(17/25)
याने शिवाजी वर स्वारी करावी अशा सूर त्यांच्या दरबारातून येऊ लागला.बहलोल खानाने विदा उचलून दोन हत्ती ४ घोडे आणि बरीचशी शसत्रे घेऊन निघाला.साताऱ्यावर चढाई करत परळी चा किल्ला काबीज केला.तेव्हा महाराज पन्हाळ्या वर होते.पायथ्याशी प्रतापराव गुजरांचा तळ होता.महाराजांनी त्यांना (18/25)
बोलावून घेऊन खलबते केली. आज्ञेनुसार प्रतापराव गुजर १५हजार सैन्य घेऊन रातोरात निघाले त्यांच्या बरोबर कृष्णाजी भास्कर,विसो बल्हाळ,सिद्दी हलाल,विठोजी शिंदे,दीपाजी राऊत.असे सगळे मर्दानी सरदार होते.अखेर उमराणी जवळ आल्यावर खानाच्या सैन्यावर हल्ला केला,या घनघोर युद्धात मुंडक्याचे (19/25
खच साठले होते.त्यांचा१हत्ती व आवा-जावा जिंकला होता ,खान प्रतापरावना शरण आला ,पुन्हा स्वराज्या कडे बघणार नाही अशी विनवणी करू लागला.त्याला धर्म वाट करत, त्याला सही सलामत सोडून दिला.
7.प्रतापरावची चूक..
हि बातमी महाराजांना कळली ते आनंदले व संतुष्ट पण झाले त्याला धर्मवाट देऊन (20/25)
सहीसलामत सोडून दिल्यामुळे महाराज भयंकर रागावले होते ? राजकारणातले काही समजते कि नाही ? अश्या ४ गोष्टी सुनावल्या गेल्या आणि त्यांचा आनंद खाडकन कोसळला.
8.महारांचे पत्र..
बहलोल खान घडोघडी स्वराज्यावर येतो.तुम्ही लष्कर घेऊन. तुम्ही बहलोल खानास ठार मारा नाही तर पुन्हा आम्हास(21/25)
तोंड दाखवू नका अशा आशयाचे पत्र त्यांना दिले.त्या वेळी त्यांचा तळ गडहिंगलज ला होता.
9.हुताम्य..!
धर्मवाट म्हणून सोडून दिलेल्या बहलोल खानाने पुन्हा डोके वर काढले.प्रतापरावांना त्यांची चूक लक्षात आली. "अखेर शत्रू तो शत्रू" त्यांच्या वचनावर किंवा अर्जावर विश्वास ठेवणे म्हणजे (22/25)
आत्मघात.रायगडचे दरवाजे एकट्या सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या साठी बंद होते. महारांचा राज्याभिषेक होणार होता. आणि अखेर तो दिवस उजाडला..आणि खबर आली पठाण खूप मोठी फोऊज घेऊन नेसरी च्या रोखाने येत आहे.हे कळल्यावर प्रतापराव लालबुंद झाले. याला मारल्या शिवाय महाराजांना मुजरा (23/25)
करता येणार नाही आणि देहभान विसरून त्या दिवशी माघ महिना होता (२४ फेब्रुवारी १६७४) महाशिवरात्र होती. अवघ्या ६ मराठी शिलेदारांसह म्हणजेच प्रतापराव धरून फक्त सात च.एकाच दिशेने बेभाम सुटले.पठाण (बहलोल खान) नेसरी ची खिंड ओलांडत होता.तितक्यात त्या ७ मराठी वीर यांनी त्यांच्या (24/25)
वर चाल केली.त्यात खास करून प्रतापराव असतील याची कल्पना पठाणाला नव्हती. अखेर समिंद्राची लाट नौकेत घुसली आणि नौका बुडाली.शर्थीची समशेरी चालवून प्रतापराव धारातीर्थी पडले आणि महारांचा दुसरा तान्हाजी पडला.
म्हणूनच आपण म्हणतो " वेडात मराठे वीर दौडले सात..!"#अपरिचित_मावळे
(25/25)
वॉटर पार्क आणि स्विमिंग पूल मध्ये उतरताना काळजी घ्या !
आज चिखली मध्ये एका डॉक्टरांची मुलगी जी केवळ 16-17 वर्षाची होती अॅक्युट पॅनक्रिया टायटीस मुळे गेली. तीन-चार दिवसांपूर्वी तिला अचानक संध्याकाळी पोट दुखायला लागलं नंतर उलट्या सुरू झाल्या.लगेच ऍडमिट केलं,फिजिशियन कडे दोन
दिवस त्यांनी ट्रीटमेंट करून बघितले. ऍडमिट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोनोग्राफी केली .त्यामध्ये तिला अॅक्युट पॅनक्रियाटायटीस निघाला.ट्रीटमेंटला रिस्पॉन्स करत नाहीये हे बघून थर्ड डे ला तिला लगेच संभाजीनगरला शिफ्ट केलं.
तिथे ती मल्टी ऑर्गन फेलीवरमध्ये गेली .पलमनरी ईडीमा,प्लुरल
ईफ्युजन अशा बऱ्याच शारीरिक अडचणी सुरू झाल्या आणि एडमिट केल्यानंतर थर्ड डे ला सकाळी तिचा आज मृत्यू झाला.
एवढ्या कमी वयामध्ये अॅक्युट पॅनक्रॅटिस कसा काय झाला असं डॉक्टरांना विचारल्यानंतर त्यांनी जे सस्पेक्टेड कारण सांगितलं ते ऐकून सर्वांना आश्चर्य वाटलं.मेडिसिनच्या बुकमध्ये
फक्त तीन आकडेवारी देतो, तुम्हीच decode करा -
1.) पठाण TMC : 524516
रंजन INC : 439494
2.) एकूण हिंदू उमेदवार : 12
अधीर रंजन यांना सोडून 11 हिंदू उमेदवारांनी मिळवलेली (फोडलेली) मते : 5 लाख.
3.) एकूण मुस्लिम उमेदवार : 3
युसूफ
सोडून 2 मुस्लिम उमेदवारांनी मिळवलेली (फोडलेली) मते : फक्त 2035 (ही मते पण कदाचित हिंदूंचीच असतील)
जर भाजपचा उमेदवार रिंगणात असेल, तर मुस्लिम मतदार त्याला हरवू शकेल अशा काँग्रेसच्या हिंदू उमेदवाराला मतदान करतात.
जर भाजपचा उमेदवार रिंगणात नसेल किंवा त्याची जिंकण्याची शक्यता नसेल,
अशा परिस्थितीत मुस्लिम मतदार काँग्रेसच्या हिंदू उमेदवाराला मतदान करण्याऐवजी त्यांच्याकडे उपलब्ध असलेला मुस्लिम पर्याय निवडतात. काँग्रेसच्या पाच वेळा खासदार राहिलेल्या हिंदू उमेदवाराला पण पाडून ते मुस्लिम उमेदवाराला जिंकवतात!
ते कोठून आले आणि कोण होते? याबद्दल कोणतेही अधिकृत दस्तऐवज नाहीत. पण एका उपलब्ध असलेल्या माहितीनुसार,श्री स्वामी समर्थ महाराजांचा अवतार पंजाब प्रांतातील हस्तिनापूरपासून २४किमी अंतरावर असलेल्या छेली खेडा नावाच्या गावात एका वटवृक्षाजवळ झाला.
असे मानले जाते.तर १८५६ मध्ये अक्कलकोटच्या खंडोबा मंदिरात त्यांचे पहिल्यांदा दर्शन झाले, तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया तिथी होता, त्यानुसार या वर्षी १० एप्रिल रोजी स्वामीजींचा प्रकट दिन साजरा केला जाणार आहे.उपलब्ध माहितीनुसार, श्री स्वामी समर्थ महाराज हे इ.स. १८५६-१८७८ या कालावधीत
होऊन गेलेले महाराष्ट्रातील अक्कलकोट येथील दत्त संप्रदायातील एक थोर संत होते. श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार मानले जातात. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्रीस्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले अशीही
श्रावण महिना म्हणले की सगळीकडे हिरवळ आणि सण,त्यात सणांचा उत्साह तर वेगळाच असतो.तसा हा महिना ३० दिवसांचाच असतो.पण यावेळी हा ५९ दिवसांचा असणार आहे.
हिंदू पंचांगामध्ये प्रत्येक तिसऱ्या वर्षात एक महिना अतिरिक्त असतो.त्याला आपण अधिक मास म्हणतो,वैदिक पंचांगात सूर्य आणि
चंद्राच्या आधारे गणना केली जाते.त्यानुसार दरवर्षी चंद्र महिना हा ३५४ दिवसांचा असतो आणि सौर महिना हा ३६५ दिवसांचा असतो.या दोन्हीमध्ये दरवर्षी फरक हा ११ दिवसांचा असतो.जो ३ वर्षात ३३ दिवसांचा होतो.म्हणून,तो अधिकमास असतो.आता हे सर्व दिवस समान करण्यासाठी दर तिसऱ्या वर्षी एक अतिरिक्त
महिना असतो.तो मलमास असतो.त्याला पुरषोत्तम मास पण म्हंटले जाते.आता या दोन श्रावण महिन्याची विभागणी अधिक श्रावण आणि निज श्रावण अशी केली जाते.अधिक श्रावण महिना हा १८ जुलै पासून सुरू होत आहे आणि निज श्रावण महिना हा १७ ऑगस्ट पासून सुरू होत आहे जो १५ सप्टेंबर ला संपेल,त्यामुळे श्रावना
आज तुकाराम गाथेतील "अल्ला देवे अल्ला खिलावे" हा अभंग काही लोकांकडून भरपूर फिरवला जात असून तुकोबा हे कशा रितीने इस्लामचा पुरस्कार करणारे होते किंवा ते कशा रितीने सर्वधर्मसमभावी होते हे दाखवण्याचा प्रयत्न ह्या लोकांनी चालवला आहे. ह्या गोष्टीत किती तथ्य आहे, ते आपण अभंगासहित पडताळून
बघूया.
हा अभंग तुकाराम गाथेतील ३९३७ क्रमांकाचा असून यात तुकोबांनी प्रयत्नवादाचा पुरस्कार केला आहे. अल्लाह हाच सर्व काही देणारा आहे, तो करेल तसेच होईल ह्या नशीबावर विसंबून राहणाऱ्या वृत्तीला तुकोबांनी ह्या अभंगातून झापले आहे.पहिल्या ओळीत तुकोबा म्हणतात-
म्हणजेच जे नशिबावर विसंबून राहणारे लोक असतात ते अल्ला हाच सारे काही देणारा आहे, आजारी पडल्यावर तोच दवादारूची सोय करणारा आहे असा विचार करतात.मात्र जो दैवावर विसंबून न राहता स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवतो
समान नागरी कायद्याची तयारी ही विधी आयोगाकडे देण्यात आलेली होती.गेली ८ महिने हा आयोग मॅरेथॉन बैठका घेत होता.अजून १-२ बैठका झाल्या नंतर हा विधी आयोग पावसाळी अधिवेशनापूर्वी या कायद्याचा तपशील सबंधित मंत्रालयाकडे देणार आहे.या अहवालाच्या आधारे
१/५
केंद्र सरकार समान नागरी कायदा हा आणण्याची तयारीत असणार आहे.हा कायदा कधी आणणार आहे याबाबत अजूनही गुप्तता पाळण्यात आलेली आहे.पण येत्या पावसाळी अधिवेशनात चर्चेसाठी हे विधेयक येणार आहे.२२व्या विधी आयोगाने यावर मिशन मोडमध्ये काम केलं असून,जवळ पास या आयोगाने २४-२८ बैठका घेतल्या आहेत
२
म्हणजेच या कायद्यात सर्व समावेशकाता आणण्यासाठी हर एक पैलूचा अगदी सखोल विचार करण्यात आलेला आहे आणि समान नागरी कायद्याचा सर्वसमावेशक असा एक दस्तेएवज तयार केला आहे.यामध्ये देशातील सर्व जाती धर्म आणि त्यांच्या चालीरीती यांचा सखोल अभ्यास केला असून यामध्ये कोणतीही त्रुटी राहिली नाही.
३