@Jollyboy Profile picture
Sep 11, 2020 18 tweets 5 min read Read on X
*पालि (मागधि) भाषेतून मराठीचा उगम - आश्चर्यकारक साम्य* Indian languages including Sanskrit originated from Pali

आपण महाराष्ट्रीयन आपली मराठी संस्कृती, भाषा आणि साहित्य यांच्या विषयाचे संशोधन महाराष्ट्राच्या सीमा आणि मराठी कलाकृती यांच्या परिघातच करतो. त्यामुळे त्याचे
1) Image
प्रतिबिंब किंवा कार्य राष्ट्रीय पातळीवर पडतच नाही. या देशाच्या सांस्कृतिक इतिहासात बंगाली, हिंदी व दाक्षिणात्य भाषा सोडल्यास मराठीचा मागमूस दिसत नाही. मराठीचा सांस्कृतिक इतिहास डोळसपणे पाहण्याचे व कथन करण्याचे प्रामाणिक प्रयत्न फारसे झाले नाहीत. त्यामुळेच मराठी
2) Image
भाषेच्या कित्येक बाबी अद्याप अज्ञात राहिल्या आहेत.आपण भारतीय आपल्या सर्व भाषा या संस्कृत मधून निर्माण झाल्याचे लहानपणापासून ऐकत आहोत. त्यामुळे ही गोष्ट खरी आहे काय याचा शोध आपण घेतच नाही. प्रत्यक्षात चित्र वेगळेच दिसते. परंपरेने जे मानले गेले आहे त्याच्या सीमा आपण ओलांडीत नाही
3) Image
आणि मग इथेच सर्व चुकते. जर सर्व भारतीय भाषा या संस्कृत पासून निर्माण झाल्या तर संस्कृत भाषेचा प्रसार व विकास होण्यास काहीच अडचण नव्हती. मग आज ती फक्त मूठभर लोकांची मक्तेदारी का राहिली आहे ? जनसामान्यात संस्कृत भाषा का रुजली गेली नाही ? का त्याबाबत सर्वसामान्यजन त्या
4) Image
भाषेतून व्यवहार करीत नव्हते ?

अभ्यास करता असे आढळते की मूळ उत्तर भारताची पालि भाषा ही भारतातील अनेक भाषांची जननी आहे. इ.स.पूर्व ६व्या शतकातील ही मगध राजवटीची मागधी भाषा हिलाच पुढे पालि भाषा नामनिधान प्राप्त झाले. भगवान बुद्धांचा सर्व उपदेश या भाषेतून केलेला दिसून
5) Image
येतो. सर्व त्रिपिटक पालि भाषेत आहे. सर्व भारतभर एकेकाळी बौद्ध संस्कृतीची भरभराट होती. त्यामुळे त्या पालि भाषेतील अनेक शब्द आज इतर भारतीय भाषेत सामावून गेल्याचे आढळून येत आहे. तसे संस्कृत भाषेबाबत दिसून येत नाही. उच्चवर्णीयांची भाषा म्हणून तिला राजदरबारात स्थान दिले गेले.
6) Image
त्यामुळे तिचा परिघ मर्यादित राहिला हे सत्य आहे. तरीही अनेक अभ्यासक डोळे झाकून त्याचीच री ओढतात. सत्य संशोधन करीत नाहीत.आज असंख्य पालि भाषेतील शब्द संस्कृत, मराठी व इतर अन्य भारतीय भाषेत आढळतात हे मोठे नवल नव्हे काय ? यावरून मग पालि भाषेतून मराठी भाषेचा उगम झाला असे का
7)
म्हणू नये ? कदाचित भारताची बौद्ध संस्कृती हळूहळू बदलत गेल्यामुळे बुद्धांच्या आणि त्रिपिटकाच्या पालि भाषेचा संबंध आताच्या मराठीशी जोडणे काही संशोधकांना अवघड वाटत असावे.

महाराष्ट्रात इ.स.पूर्व ४०० ते इ.स. ७००-८०० पर्यंत बुद्ध तत्वज्ञान सर्वव्यापी झाले होते. याच काळात
8)
मराठी भाषा आकारास येत होती. इतिहासात डोळसपणे पाहिले असता १२व्या शतकापर्यंत भारतात पालि भाषेत तयार झालेले साहित्य दिसते. बुद्धांच्या नंतर तीनशे वर्षांनी संस्कृत भाषेचा विकास होत गेला. वाल्मिकी रामायण, व्यासांचे महाभारत आणि अज्ञात लेखकाची भगवतगीता ही नंतरच्या काळातली आहे.
9)
बुद्धीचा संबंध हा मुख्यत्वे बुद्धांशी आहे. थेरवादा बरोबर महायान सुद्धा त्याकाळी पसरला होता. बुद्धांचा अष्टांगिक मार्ग महाराष्ट्राच्या मातीत खोलवर रुजल्याने इथल्या आठ महत्वाच्या लेण्यांना अष्ट विनायक (बुद्धांचे एक नाव) नाव पडले. मंगलसूत्ताचे मंगळसूत्र झाले. नाथपंथाने
10)
बुद्ध तत्वज्ञान अंगिकारले. पंढरपूरच्या विठ्ठलाला बुद्ध रुपात पाहिल्याचे सर्व संतानी अभंगात म्हटले. मेत्त भावनेचा ( सर्वांप्रति मैत्री भावना ) आविष्कार ज्ञानेश्वरांच्या पसायदानातून उमटला. नामदेवांच्या तेराव्या शतकातील हिंदी सदृश्य भाषेतील रचनेमध्ये नामरूपाच्या
11)
गोष्टींचा उल्लेख आला. दखनी भाषेचा याच दरम्यान उदय होत गेला. ११व्या शतकात आढळलेल्या एका शिलालेखात मराठी वाक्ये दिसून येतात. संस्कृत भाषेचा एक शब्दही दिसत नाही.

तिसऱ्या धम्मसंगतीनंतर महायान पंथांने आपले वेगळेपण जपण्यासाठी संस्कृत मधून ग्रंथ लिहिले. त्यामुळे काही
12)
बौद्ध तत्वज्ञानाचे संस्कृत शब्द सुद्धा मराठी, मल्याळम आणि अन्य भाषेत आले. बाराशे वर्षे महाराष्ट्रात असलेल्या बुद्ध तत्वज्ञानामुळे लोक व्यावहारिक भाषेत देखील बुद्ध वचनातील शब्द वापरत होते. त्यामुळे मराठी भाषेतील बरेच शब्द, स्वर, व्यंजने आणि व्याकरण सुद्धा पालि भाषे
13)
सारखे असल्याचे दिसून येते. पालि भाषा आणि मराठी भाषा वर्ण जवळजवळ सारखेच आहेत तसेच जोडाक्षरे देखील सारखीच आहेत. एकवचन आणि अनेकवचन पालि आणि मराठी भाषेतच दिसून येतात. संस्कृतमध्ये एकवचन, द्विवचन आणि बहुवचन असा प्रकार आढळतो. नाम,वचन, लिंग, विभक्ती, कर्ता, कर्म क्रियापद अशी
14)
वाक्यरचना देखील मराठी आणि पालिमध्ये जवळजवळ सारखीच आहे. फक्त लिहिण्याची लिपी वेगवेगळी आहे. भाषा तज्ज्ञांनी या सत्यतेबाबत आतापर्यंत संशोधन का केले नाही याचे आश्चर्य वाटते. आणि म्हणूनच मराठी भाषेचा उगम पालि भाषेतून झाला असे ठामपणे म्हणावेसे वाटते.

पालि व मराठी भाषेतील
15)
साम्य दर्शविणारे असंख्य शब्‍द आहेत. त्याची माहिती थोडक्यात येथे देण्यात येत आहेत.

अज्जली-अंजली /आकास-आकाश /अंस-अंश /अकुसल-अकुशल / अग्गी-अग्नि / अतिवुठ्ठी-अतिवृष्टी / अधम्मी-अधर्मी / इतिवुत्त-इतिवृत्त / उग्गम-उगम /उग्ग-उग्र / उच्छेद-उच्छेद / उपाधि-उपाधी / ओसध-औषध /
16)
कज्जल-काजळ / करुणा-करुणा / कम्मवाद-कर्मवाद / खारीय-खारट / गमन-गमन / चपल-चपळ / चातुरीय-चातुर्य / जरामरण-जरामरण / तपस्सी-तपस्वी / धनु-धनुष्य / नगर-नगर / नदी-नदी / निब्बान-निर्वाण / पज्ज-पद्य / पब्बत-पर्वत / पुन्णमासी-पौर्णिमा / मज्झिम-मध्यम / मित्त-मित्र / रक्खक-
17)
रक्षक / विसाल-विशाल / वेदना-वेदना / सिप्प-शिल्प / सत्था-शास्ता / सील-शील / सक्क-शक्य / हरित-हरित / हित-हित.
18).

[संदर्भ :- मराठी भाषेचा उगम पालि भाषेतून...! (संस्कृत मधून नव्हे ) लेखक - मा.श. मोरे ]

--- #संजय_सावंत ,( नवी मुंबई )

⚛⚛⚛

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with @Jollyboy

@Jollyboy Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Jollybo71936649

Nov 7, 2020
डॉ . अल्बर्ट एलिस .
अमेरिकेतील नामांकित मानसोपचारतज्ञ . यांना मानसशास्त्रज्ञ सुद्धा म्हणता येईल . विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती (rational emotive behaviour thearapy ) हा त्यांचा मनाच्या जगातील सर्वात महत्वाचा शोध . अनेकांना मानसिक स्थैर्य मिळवून देणाऱ्या या पद्धतीचा शोध
1)
खरंतर त्यांनी स्वतःला स्थिरता मिळवून देण्यासाठी लावला होता . या शोधाची सुरुवात त्यांनी लहानपणीच केली होती . भावनेच्या आहारी न जाता , तर्कसंगत बुद्धी वापरून केलेला विचार मनाला स्थिर करतो हा त्यांचा अनुभव त्यांनी जगाला पटवून दिला . त्यासाठी अनेक उदाहरणे आणि दाखले दिले .
2)
आणि आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांच्या कार्याची दखल घेणे सर्व जगाला भाग पडले . त्यांनी मांडलेले काही सिद्धांत सोप्या भाषेत पुढीलप्रमाणे आहेत .

१) माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर त्याच्या प्रतिक्रिया आणि कृती अवलंबून नसतात , तर त्या घटनांकडे तो कोणत्या दृष्टीकोनातून बघतो
3)
Read 16 tweets
Nov 7, 2020
नाणेघाट

नुकतीच नाणेघाटला जाऊन आले होते.त्यासंदर्भात #मर्यादित वाचन केलं होतं.त्यातून हे कळालं की, हा नाणेघाट म्हणजे घाटांचा राजा.हा इसवीसनपूर्व काळात बांधला गेलाय.हे वाचूनच रोमांच उभे राहिले. काय ते कसब? अभियांत्रिकीमधला चमत्कारच.

सातवाहन सम्राज्ञी गौतमीपुत्र
1)
सातकर्णीची पत्नी नागणिका हिचा नाणेघाटातल्या लेणीतला तो प्रख्यात शिलालेख. पहिल्यांदा गेले तेव्हा वेड्यासारखी धावत गेले होते त्या भित्तीकडे. त्या पाषाणातल्या अक्षराईत हरवून गेले होते.मला न समजणाऱ्या ब्राम्ही भाषेतली ती अक्षरं पण विलक्षण प्रेमानं,कदाचित इतिहासाच्या फारसं न
2)
जपता आलेल्या वेडामूळे माझे हात त्या अक्षरांवरनं फिरत होते.नागणिका इथेच असेल का? माझ्या आसपास?माझी ही ओढ बघत असेल का?तिला छान वाटत असेल का आपला शिलालेख असा चिरंजीवी झालेला पाहून? तिचा चुडाभरला अमानवी हात माझ्यासोबतच तीही त्या अक्षरांवरनं फिरवत असेल का? धुक्यासारख्या तरल
3)
Read 42 tweets
Nov 7, 2020
सोनबा येलवे पाणपोई, पनवेल

इथल्याच (पनवेल स्टॅंडजवळ) एका छोटेखानी हाॅटेलवाल्याने बाबासाहेबांना पाणी नाकारले त्यावेळी अस्वस्थ झालेले, गरीब मजूर असलेले सोनबा येलवे बाबासाहेबांसाठी पाणी आणायला गेले.

पाणी आणले, तोपर्यंत बाबासाहेब पुढील प्रवासाला निघूनही गेले होते.
1)
बाबासाहेब परत याच मार्गाने येतील तेव्हा त्यांना पाणी मिळायला हवे आणि ते मी देईन या इच्छाशक्तीने ते दरदिवशी पाणी घेऊन येत. परंतु बाबासाहेब परत त्या मार्गाने आले नाहीत.

...आणि वाट पाहून अखेर, इथेच सोनबा येलवेंचा मृत्यू झाला.
2)
त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पनवेल महानगरपालिकेने ही पाणपोई बांधली आहे. येणार्‍या-जाणार्‍यांना पाणी मिळावे या उदात्त हेतूने.

उशीरा का होईना, बाबासाहेबांच्या प्रेमाखातर त्याग करणारी व्यक्तिमत्त्वं उजेडात येत आहेत.
3)
Read 4 tweets
Nov 7, 2020
मनुस्मृती दहन केल्यानंतर तत्कालीन काही ब्राह्मण्यग्रस्त वृत्तपत्रांनी टीकात्मक लेखन केले. त्यावर बाबासाहेबांनी बहिष्कृत भारत पत्रातून त्यांचा समाचार घेतला. वाचा !
- आनंद गायकवाड

आमच्या मित्रांचा दुसरा असा एक आक्षेप आहे की मनुस्मृती ही जुन्या काळी अंमलांत असलेल्या
1)
नियमांची एक जंत्री आहे. त्या जंत्रीतील नियम आज कोणास लागू नाहीत. मग असले जुने बाड जाळण्यात काय अर्थ आहे ? मनुस्मृती हे एक जुने बाड आहे असे आमच्या मित्राप्रमाणे आम्हासही म्हणता आले असते तर आम्हास मोठाच आनंद झाला असता. परंतु दुर्दैवाने आम्हांस तसे म्हणता येत नाही. आणि आमची
2)
खात्री आहे की, भावी स्वराज्याचा चंद्रोदय केव्हा होतो हे पाहण्याकरिता, आमच्या मित्रांचे डोळे आकाशाकडे लागले नसते तर आपल्या पायाखाली काय जळते आहे हे त्यांना निरखून पाहताच आले असते. मनुस्मृती हे एक जुने बाड आहे, ते राहिले तरी काही हरकत नाही असा युक्तिवाद करण्याऱ्या गृहस्थांना
3)
Read 33 tweets
Nov 6, 2020
#जमालगढी_स्तूप_व_विहार

जमालगढी सध्याच्या पाकिस्तानातील खबैर पक्ख्तुन्ख्वामधील मरदानच्या कटलांग मरदान मिर्गापासून १३ किमी अंतरावर हे शहर आहे. जमालगढी येथे प्राचीन स्तूप व विहारांचे अवशेष सापडले आहेत.

जमालगढी येथील स्तूप व विहार १/५ शतकातील भरभराटीचे बौद्ध ठिकाण होते.
1)
जमालगढीचे स्थानीय नाव "जमालगढी कंदारत" किंवा "काफिरो कोटे" असे आहे. जमालगढीच्या भग्नावशेषांचा प्रथम शोध ब्रिटीश पुरात्ववेत्ता व गाढे अभ्यासक अलेक्झांडर कॅनिंगहॅम यांनी इसवी सन १८४८ मध्ये लावला.

कर्नल ल्युम्स्डेन यांनी जमालगढी येथे उत्खनन केले होते पण तेव्हा तेथे विशेष
2)
काही सापडले नाही. नंतर इसवी सन १८७१ मध्ये लेफ्टनंट क्राॅमटन यांनी पुन्हा येथे उत्खनन केले व अनेक बौद्धशिल्पे सापडली आहेत.

चित्र क्रमांक एक जमालगढी, मरदान, पाकिस्तान बौद्ध नगरीचे भग्नावशेष.

चित्र क्रमांक दोन १/३ शतकातील राणी महामायेचे स्वप्न शिल्प जमालगढी, मरदान,
3)
Read 5 tweets
Nov 5, 2020
आम के पेड़ के नीचे ब्राह्मण तुलसीदास रामचरित्रमानस लिख रहे थे. अचानक पेड़ से आम तुलसीदास के सर पर गिरा. तुलसीदास बहुत खुश हुआ, उसने आम को ईश्वर का दिया हुआ उपहार समझकर खा लिया !

मुग़ल राज में गाय कट रही थी, मुग़ल समोसे में गाय का मांस भर भर कर खा रहे थे.
1) Image
लेकिन तुलसीदास को कोई आपत्ति नही थी, वह मग्न होकर आनंदित होकर, लगा लिखने "ढोल गंवार पशु नारी सकल ताड़ना के अधिकारी" !

किसान का बेटा इसाक न्यूटन सेब के पेड़ के नीचे विज्ञान की पढ़ाई कर रहा था. अचानक से एक सेब न्यूटन के सर पर गिर गया. न्यूटन ने सेब उठाया उसे ध्यान से
2)
देखने लगे मानो कभी सेब देखा ही नही. लेकिन न्यूटन सेब नही देख रहे थे वह सोच रहे आखिर सेब नीचे क्यों गिरा ?

सेब ऊपर क्यों नही गया... नीचे ही क्यों आया ?. ऊपर चांद है वह क्यों नही गिरता. धरती में जरूर कोई फ़ोर्स है. ताक़त है जो चीजों को अपनी ओर आकर्षित करती है !
3)
Read 7 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us!

:(