फक्त काळजावर तितका दगड ठेवा..

या थ्रेडला कुठल्याही पक्षाची, विचारसरणीची मर्यादा नाही. मराठी व्यक्तीने मराठीजनांसाठी लिहिलेला 'राग'! फार काही ग्रेट लिहिलेलं नाही. तुमच्या आमच्या आजूबाजूला घडणारं दुर्लक्षित वास्तव आहे. पुढील काही वर्षात या थ्रेडमधील.. (१/२७)
मुद्द्यांमुळे 'किमान' बदल घडावेत अशी अपेक्षा ठेऊन हा थ्रेड लिहितोय. त्यामुळे थ्रेड स्वतःपुरती मर्यादित ठेवावा की इतरांपर्यंत पोहोचवावा हे ज्याचे त्याने ठरवावे.

सुरुवातीला काही मुद्दे सांगतो.. (२/२७)
१. अलीकडेच एका उच्चपदस्थ लोकांच्या सोसायटीमध्ये जाणे झाले. अगदी प्रवेशद्वारापासून संकुलातील बगीच्यापर्यंत जिथे पाहाल तिथे डोळे दिपून जातील अशी स्वच्छता, त्यामुळे आपोआप आलेलं 'स्टॅण्डर्ड' असं काहीसं हे चित्र होतं. या संकुलात मराठी कुटुंबांची संख्या अवघे ५-१० टक्के! मात्र.. (३/२७)
या ठिकाणी काम करणाऱ्या सुरक्षारक्षकापासून, मोलकरीण, हाऊसकिपींगपर्यंत सर्व स्टाफमध्ये जवळपास ९० टक्के मराठी माणूस! (ठीके, कुठलेही काम छोटे नसते या जगप्रसिद्ध वाक्याचा आदर राखूनच..)
२. अलीकडेच ९० टक्क्याहून अधिक अभियंते (इंजिनीअर्स) नोकरी करण्याइतपत लायक नाहीत अशा आशयाचा.. (४/२७)
अहवाल आला आहे.
३. मराठी लोकांचा व्यवसायात असलेला कमी टक्का
४. २०११च्या जनगणनेनुसार मुंबईत केवळ ३५ टक्के मराठी असणे (आता किती कमी झाले याची कल्पना करवत नाही)
५. दिवा, नवी मुंबई, कल्याणपलीकडे वाढलेला मराठी टक्का (तिथेही अल्पमतात)
६. मुंबईत असा एकही प्रभाग नाही जिथे मराठी.. (५/२७)
मतांवर उमेदवार जिंकून येऊ शकतो.
७. एमएमआरडीए किंवा एमएमआरसीच्या जवळपास २१ हजार जागांसाठी मराठी श्रमिक न मिळणं
८. आणि बरंच काही..

मूळ विषयाला सुरुवात करतो. तर काह महिन्यापूर्वी मी मुद्रा योजना किंवा मुख्यमंत्री रोजगार योजनांचे थ्रेड लिहिले होते. केवळ मीच नव्हे तर.. (६/२७)
अनेक मंडळी यावर सातत्याने लिहीत आहेत. मराठी तरुणांनी व्यवसायाकडे वळावं यादृष्टीने.. त्यात एमएमआरडीएच्या कंत्राटदारांकडून माहिती आली की मराठी तरुणांकडे त्यांना अपेक्षित स्कील नाहीये किंवा गव्हर्मेंट जॉब नसल्याने प्रतिसाद मिळालेला नाही. हे ऐकून डोक्यात तिडीक गेली.. (७/२७)
यादरम्यान बरेच दिवस गेले. राग निवळला. मग वरचे काही प्रसंग डोळ्यासमोरून तरळले. म्हटलं.. साला आपली पोरं तर मेहनती आहेत. रग आणि उत्साह दोन्ही आहे. मग अडतंय कुठे? थोडा अभ्यास केला. लक्षात आलं, माती आपली मानसिकता खातेय.. आणि वर्षानुवर्षे रुजलेली एक सवय देखील..

बघा.. आपण.. (८/२७)
भैय्याना शिव्या घालतो. इथे येतात, व्यवसाय करतात, मुंबईला अस्वच्छ करतात. दुसरीकडे गुजराती - मारवाडी लोक इथे येतात, व्यवसाय करतात आमच्या मुंबईतील जागा हडपतात. जैन लोकांच्या सोसायटीत मच्छी-मटण चालत नाही वगैरे वगैरे.. मग लक्षात येतं की त्यांची 'हॅबिट' (सवय) आहे. (९/२७)
वर्षानुवर्षे ही सर्व मंडळी त्यातच मुरली आहेत. साधं गणित पाहा ना.. आपण काय म्हणतो? स्वभाव आहे असा लगेच बदलणार नाही.. अगदी तसंच.. देशातील मजूरांची (श्रमिक) गरज युपी, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिसा अशा राज्यातून पूर्ण केली जाते. महाराष्ट्र हा आयटी क्षेत्रातील मनुष्यबळ.. (१०/२७)
पुरवणार राज्य. आपल्याकडे अस्मिता आणि प्रतिष्ठा (दोन्ही खोट्या) विकल्या जातात. यावर पुढे सविस्तर लिहितोच . पुढे गुजरात किंवा राजस्थानमध्ये छोटे मोठे व्यावसायिक जन्माला घातले जातात.

जेव्हा मुंबईसह राज्यातील श्रमिक पुन्हा आपापल्या मूळगावी परतले. तेव्हा इथे त्यांची टंचाई (११/२७)
भासायला लागली. मग 'भूमिपुत्रांना संधी' सांगत जाहिराती फिरल्या. एमएमआरडीएच्या १६ हजार जागांसाठी मोजून ५००-६०० च्या वर आपली पोरं गेलेली नाहीत हे वास्तव आहे. याची कारणं देताना कंत्राटदार सांगतात, 'बहुतांश मराठी पोरांना ही शासनाची नोकरी (गव्हर्मेंट जॉब) वाटली. तर.. (१२/२७)
अनेकांचे स्किल या लेबर कम्युनिटीला जुळणारे नव्हते. याठिकाणी अथक परिश्रम घ्यावे लागतात. त्यांना मेहनत नको आणि पुन्हा मराठी तरुण येणार म्हणजे युनियन्स निघणार.. काम कमी आणि संप जास्त इतकंच घडणार यापेक्षा वर उल्लेख केलेल्या राज्यातून श्रमिक हे 'गुलाम' कॅटेगरीत मोडतात. (१३/२७)
किंबहुना ते तसे मोल्ड झालेले आहेत अनेक वर्ष.. शिक्षण कमी त्यामुळे मुंबईला जायचं, काहीतरी मेहनतीचं काम करायचं, मिळे तो पगार गावी पाठवायचा अशी ही कोवळी पोरं.. कंत्राटदार बोलला उठ, उठायचं, बस बोल्ला कि बसायचं.. त्यामुळे अशी मुलं परवडतात. अशांना अक्षरशः विमानातून मुंबईत.. (१४/२७)
आणलं गेलं. त्यामुळे ही लोक तुम्हाला अशा प्रकल्पांवर किंवा मुंबईतील रस्त्यांवर कानाकोपऱ्यात काहीतरी गाडा टाकून बसलेले दिसतील. लाचारी यांच्याकडे लहानपणापासून शिकवलेली आहे.

सर्वात शेवटी मराठी माणसाबद्दल.. त्यापूर्वी गुजराती, मारवाडी.. ही मंडळी मुलखाचे बनिया.. यांच्या.. (१५/२७)
घरात लहानपणापासूनच मोठं होऊन काहीतरी स्वतःचं करायचंय हेच शिकवलं जात. यांच्याकडे पहिले लक्ष्मी मग त्यातून सरस्वती हा फॉर्म्युला ठरलेला. यांचा कुठलाही प्रथमपुरुष घेऊन बघा. त्याने स्ट्रगल केलेलं असतं. वेळप्रसंगी वेळेशी तडजोड करतात. हे सगळं आपल्या पुढील पिढीसाठी.. (१६/२७)
करून ठेवतात. कारण व्यवसायाचं खूळ आपल्या वंशांच्या डोक्यातून जाऊ नये यासाठी ही धडपड. 'डोक्यावर बर्फ, तोंडात साखर' म्हणजेच तह करणं यांना लहानपणापासून शिकवलेलं आहे. (काही वेगळं नाही, निरीक्षण करा फक्त)

आता मराठी माणूस.. बंडखोरी आपल्या रक्तात.. मगाशी म्हटलं तसं.. (१७/२७)
आपल्याकडे अस्मिता आणि प्रतिष्ठा (दोन्ही खोट्या) रुजवल्या जातात. घरात पार नागडं व्हायची वेळ आली तरी, बाहेर मात्र शेरवानी घालून मोठेपणा मिरवायचा. ऑफेंड होण्याची गरज नाही. आपल्या खोट्या अस्मिता जोवर आपणच ठेचत नाही तोवर 'याची मार, त्याची मार', आमचे साहेब.. (१८/२७)
आमचे दादा, भाऊ, या वर्तुळातच आपण अडकून राहणार आहोत. फक्त मुंबईच नाही अख्खा महाराष्ट्र कधी गिळून टाकतील हे कळणारही नाही.. आम्ही फक्त सोशल मीडियावर आमच्या अस्मिता जपत राहू.

आपल्याकडे आयुष्यभर मराठी माणूसच मराठी माणसाचा पाय खेचतो इतकं वाक्य घेऊन स्वतःच अपयश लपवत बसवण्याचं..(१९/२७)
जणू फॅड आहे. आपल्याकडे घराघरात किमान एक इंजिनीअर आढळेलच.. मुंबईमध्ये तर निश्चितच. कारण इथे इंजिनीअरिंग, डॉक्टर आणि फारतर सीए हेच करिअर ऑप्शन आहेत पोरांकडे.. त्याशिवाय आपल्या पूर्वजांना शांती लाभणार नाही असाच जणू पालकांचा होरा.. 'मी गरिबीत दिवस काढले तुमच्या.. (२०/२७)
वाट्याला नको...' इतकं बोलून पोरांच्या आवडीला रीतसर फाट्यावर मारून निवडक क्षेत्रात करिअर करण्याची जबरदस्ती.. यात पालकांची काहीएक चूक नाही. कारण वर्षानुवर्षे हीच मानसिकता आपल्याकडे रुजलीय. एका व्यवसायात लॉस झाला म्हणजे, सांगितलं ना तुला.. हे आपल्या आवाक्यातलं नाही, तू आपली (२१/२७)
नोकरीच कर बरं.. या वाक्याने अनेक व्यावसायिक जागीच मारले. यामुळे चाकरी करणं हे सूत्र आपल्यात इतकं भिनलंय की नोकरी टिकवण्यासाठी किती आणि काय 'ध्यान' आपण करतो हे स्वतःला विचारावं. काही ग्रामीण भागात विशेषतः कोकणात शेतीत काही नाही.. तू जा बाबा आपला शहराकडे हीच बोंब असते. (२२/२७)
आणखी एक म्हणजे संकुचित वृत्ती.. काही अपवाद वगळता आपल्याकडे फार महत्त्वाकांक्षीपणा नाही. असला तरी, तो राजकारणाच्या खोल गर्तेत बुडून गेला आहे. आपल्याआपल्यातील स्पर्धेने आपल्यातील जळकी वृत्ती कायम तेवत ठेवलीय. आपल्याला भव्य काहीतरी दाखवलं की आपण लगेच त्या प्रेमात पडतो. (२३/२७)
तेच आणि तसंच करायचंय हा हट्ट धरतो. त्यामागील मेहनत आपल्याला माहित नाही. अशामुळे फक्त भव्यता बघून केलेल्या गोष्टी अर्धवट अवस्थेत राहतात. आपल्याला वाटतं आपण अपयशी ठरलो. मात्र आपलं योग्य नियोजन नसल्याने अपयशी झालो याबाबत कोणीही बोलत नाही. आपल्याकडे स्वतःचे असे व्हिजन नाही. (२४/२७)
बहुदा हे व्हिजन स्वातंत्र्यपूर्वकाळात पारतंत्र्यासोबत निघून गेलं.

अजून खूप काही लिहिता येईल. जे तुम्हालाही माहितीय. कितीकाळ हे सर्व करत बसायचं हा प्रश्नच आहे. मी माझ्यात बदल करतोय. प्रयत्न करतोय. जोवर राज्यभरात आपण आयटी, व्यावसायिकता, श्रम अशा विविधांगी सवयी रुजवत.. (२५/२७)
नाही तोवर परप्रांतीयांना शिव्या घालण्याचा अधिकार आपल्याला नाही. राजकारणी त्यांचे हेतू साध्य करताहेत. त्यांचा पक्ष अडचणीत आला म्हणजे अस्मिता अचानक बाहेर येतात. आपले तरुण बेरोजगार पक्षाची मडकी नाचवत बसतात. ठीके.. ज्याचा त्याचा प्रश्न.. (२६/२७)
मात्र आपण बदललो नाहीतर आपल्याच शहरातून आपणच बाहेर पडणं अटळ आहे. अजून काय बोलावे, योग्य ते जाणिजे.. (२७/२७)

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with प्रथमेश सुभाष राणे.

प्रथमेश सुभाष राणे. Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @RaneSays

5 Sep
📌📌📌

सवय लावून घ्या. आता अशा 'अस्मिता' जाग्या होतच राहतील..

कंगनाबाई व्हायरल होणे नवीन नाही. यंदाचे व्हायरल 'ट्रोल'च्या माध्यमातले आहे. निमित्त असंय की, तिला 'मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते आहे.' हा म्हणजे.. आम्हाला तितकंच सांगण्यात आलं.. त्याआधी राऊत साहेबांच्या..
धमकीबद्दल वर्तवलेली भीतीचे शब्द आम्ही विसरून गेलो. आम्हाला फक्त आमच्या मुंबईला बोलल्याचं लागलंय. एकदम खोलवर.. यापुढे कंगना बोलणार त्यावरून आमच्या मुंबई पोलिसांच्या कर्तृत्वाची रेंज ठरवली जाणार. बरोबर ना? असो.. थ्रेड लिहितो म्हटल्यावर अनेकांनी लाइक, रिप्लाय देणंच टाळलं.
उद्या कोणावर बरसणार हे माहिती नाही. उगाच आता समर्थन देऊन तोंडावर न पडलेलं बरं.. अर्थात या सर्वांचा आदर! मुळात थ्रेड कंगना किंवा राऊत यांच्यापैकी कोणाच्याही वक्तव्याचा समाचार घेण्यासाठी नाहीचे.. म्हटलं, आपल्या 'अस्मिता' कशा कामचलाऊ आहेत त्यावर लिहू...आणि कंगनापेक्षा मुंबई मोठी आहे
Read 35 tweets
3 Sep
📌📌📌

आता वाचवा नको, शेतकरी 'शिकवा' म्हणू..

ट्विटरवर सक्रिय सहभाग मागील वर्षभरापूर्वी वाढलेला.. त्यापूर्वीपासून अनेक दिग्गज या पिचवर चौफेर फटकेबाजी केलेली आहे. त्यात शेतकरी, त्यांची आत्महत्या, त्यांच्या अडचणी, त्यांना हेतुपुरस्पर दुर्लक्षित करणे अशा.. (१/१५) #शेतकरी_वाचवा
अनेक विषयांवर निवडक मराठी ट्विटरकरांनी आपापली मतं मांडली. याबाबत लिहावं अशी आर्त हाक आमच्या एका मित्राने डीएमवर केली. आणि मग या थ्रेडच्या लिखाणाचं नियोजन सुरु केलं. काही कारणांमुळे उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व. तर #शेतकरी_वाचवा या हॅशटॅगवर काय काय मतप्रदर्शन.. (२/१५)
झालीयेत याचा अंदाज घेतला. दुर्दैवाने यातील अनेकांनी आपापल्या 'पक्षाला' मिळतीजुळती भूमिका रेटून नेल्याचे दिसून आले. म्हणजे केवळ आम्हाला कळवळा आहे. आम्हीही तुमच्या गटातील आहोत ही बालिश धावपळ त्यात दिसून आली. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना असे कोणीही.. (३/१५)
Read 15 tweets
20 Aug
📌📌📌

शिक्षणाच्या गंगेसाठी तिचे भगीरथ प्रयत्न

काल म्हटल्याप्रमाणे आज स्वप्नालीच्या न व्हायरल झालेल्या वाचनाच्या आवडीबद्दल लिहितोय. काल लिहिता आले असते मात्र आज बातमी प्रसिद्ध होऊ घातली होती. त्यामुळे ब्रेक घेऊन निवांत लिहू म्हटलं. (१/१६)
तर, स्वप्नालीचे प्रयत्न आज राज्यभर प्रेरणादायी ठरतायत. काल बातमीनिमित्त कॉल केल्यावर स्वप्नालीला म्हटलं, 'अगं सोशल मीडियावर फेमस झालीयेस, तुझ्या जिद्दीला आज लोक सलाम ठोकतायत..' ती अगदी थंड आवाजात म्हणाली, सर मला काही माहीत नाही. मी सोशल मीडियावर नाही. (२/१६)
फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर अकाउंट नाही. ऑनलाइन लेक्चर्ससाठी वगैरे व्हॉट्सअप असावं म्हणून ठेवलंय.' आता या काळात विशीच्या मुलीला सोशल मीडियाची क्रेझ नाही म्हटलं की असेही हात आपोआप जोडले जातात. त्यात तिने एका निर्मनुष्य डोंगरावर झोपडी उभारण्याचा निर्णय घेणं म्हणजे (३/१६)
Read 16 tweets
17 Aug
📌📌
मायझयांनी धंद्याक लावल्यान..

काल- परवा कोकणात जाणारी रेल्वे 'रिकामी' गेल्याची माहिती आलीच असेल. ६ हजार ३९२ जागा होत्या. केवळ २५५ जागा भरल्या होत्या. सोबत सविस्तर आकडेवारी जोडतोय. अशा विशेष रेल्वे सोडण्यासाठी झालेला खर्च अर्थातच वाया गेला. (१/१५)
मात्र त्यापूर्वी थोडं फ्लॅशबॅकमध्ये जाऊ. लॉकडाउन सुरु झाला तेव्हा मुंबईत अडकलेल्या ग्रामस्थांचा कोकणात जाण्यावरुन संघर्ष सुरु होता. लॉकडाउन शिथिल होताच चाकरमान्यांचाही संघर्ष सुरु झाला. जवळपास महिनाभर हे रणकंदन सुरु होतं. त्यात गणपतीसाठी जाण्याचे प्रयत्न सुरु झाले. (२/१५)
कोकणासाठी गणेशोत्सव किती महत्त्वाचा आहे हे आघाडी सरकारातील शिवसेनेला खूप चांगले माहिती आहे. मात्र तरीही चाकरमान्यांची झालेली 'आर्थिक आणि मानसिक' होरपळ त्रास देणारी होती. याचाच उहापोह करण्याचा छोटा प्रयत्न.

कोकणात जाण्यासाठी तीन महत्त्वाचे सोर्स.. (३/१५)
Read 15 tweets
16 Aug
📌📌📌
कुणी पाणी देतं का पाणी..

जवळपास वीसेक दिवसांच्या गॅपनंतर थ्रेड लिहितोय. हा विषय सांगून पुन्हा ८ दिवस गेले. तसदीबद्दल क्षमस्व.

काही दिवसांपूर्वी 'तुळशी तलावाएवढे पाणी चार दिवसांत पालिकेने उपसले' या मथळ्याची बातमी वाचली. बातमीनुसार, 'साधारपणे ४ दिवसांच्या कालावधीत (१/१९)
सर्व उदंचन केंद्रामधून तब्बल १७ हजार १४५ दशलक्ष लीटर पाण्याचा उपसा करण्यात आला. जवळपास ८ हजार ४६ दशलक्ष लीटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या तुळशी तलावातील पाण्याच्या दुपटीपेक्षा अधिक पाण्याचा उपसा गेल्या ४ दिवसांत करण्यात आला आहे. तुळशी तलाव म्हणजे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या (२/१९)
तलावांपैकी एक. एकीकडे दुष्काळाचे सावट असताना, मुंबईत दरवर्षी पावसाळी पाण्याची होणार नासाडी चिंताजनक आहे. केवळ नदीजोड प्रकल्पाच्या मदतीनेच नाहीतर मुंबई, पुणे सारख्या शहरांमधील असे वाया जाणारे पाणी वळवून ते नेता येईल कि नाही यासाठी अभ्यासपूर्व प्रयत्न राहायला हवे. (३/१९)
Read 19 tweets
4 Aug
पावसानं पुरता झोडपलाय. बरं, आता तरी कोणी मुंबईतील कार्यसम्राट पालिकेबद्दल बोलणार आहे का? नाहीतर सत्तेतील पक्षाला बोल लावले की झोंबाझोंबी सुरु होइल..
या मंडळींनी टिका मनाला लावून न घेता जरा ग्राऊंडवर फिरावं. लोकं काय म्हणतायत पाहावं. फक्त शाखेत राहून खुशमस्करीत मश्गुल राहू नये.
एकीकडे त्या मनसेकडे नगरसेवक नाही म्हणून छेडता, आणि स्थानिक स्तरावर त्यांच्याच कार्यकर्त्यांकडे मदत मागता?
राज ठाकरेंच्या कार्यपद्धतीबद्दल काही मतभेद जरूर आहेत. त्यांच्या संघटनाचं नियोजन आजही फसतंय.. मात्र त्यांच्याकडे असलेले कष्टाळू कार्यकर्ते आजही राज्यात कुठल्या पक्षाकडे नाहीत.
इतर पक्षांकडे 'कसं टाकू' कार्यकर्ते (अपवाद वगळता) आहेत.
राज ठाकरेंनी संघटनबांधणीत थोडाबहुत बदल केल्यास याच कार्यकर्त्यांच्या जिवावर किमान २५ नगरसेवक पुन्हा निवडून आणता येतील हे खरे.. काही वर्षांपूर्वी ठाकरे बंधूंनी या विचारांचे पाईक होतो. मात्र घरच्या, नि एबीपीच्या..
Read 7 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!