राज्यात एकीकडे कोरोनाचा हाहाकार माजला आहे, परिस्थिती अक्षरशः हाताच्या बाहेर गेलीय, महाविकास आघाडी सरकार नागरिकांना फसवत आहे, लुटत आहे. नागरिकांना बेड मिळत नाही, उपचार मिळत नाही, व्हेंटिलेटर नाहीत, अम्ब्युलन्स नाही, ऑक्सिजन नाही आणि ज्यांना या व्यवस्था मिळतात त्यांना लाखोंची बिलं+ Image
दिली जातात,ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांना रुग्णालयात घेतलेच जात नाही, मग तो त्याच्या नशिबाने वाचला तर वाचला नाहीतर तरफडत मरण येतच आहे.ही विदारक परिस्थिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या राज्यात असताना त्या विरोधात सरकारला जाब विचारत एका व्यक्तीने दंड थोपटले आहेत.+
ते म्हणजे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे माजी कक्षप्रमुख श्री. ओमप्रकाश शेटे सरांनी.
केवळ त्या विरोधात आवाजच उठवला नाही तर त्यांनी राज्य सरकारच्या आरोग्य क्षेत्रातले कोरोना उपचार संदर्भातील घोटाळे आणि फसवणुक पुराव्यासह मुंबईच्या हुतात्मा चौकात मांडून सिद्ध करतो, चर्चेला या असे+
जाहीर आव्हानही राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना दिले आहे. शेटे सरांनी आव्हान देऊनही आज तब्बल 14 दिवस झाले मात्र आरोग्यमंत्री राजेश टोपे अजूनही आव्हान स्वीकारण्याचे धारिष्ट्य दाखवायला तयार नाहीत. हे असतानाच आता ओमप्रकाश शेटे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या विरोधात+
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सरकार विरोधात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर पहिली सुनावणी झाली असून औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला 15 दिवसाच्या आत तातडीने त्या जनहित याचिकेवर खुलासा करण्याबाबत नोटीसही दिली आहे.
राज्य सरकारकडून नागरिकांना फसवण्याचे आणि लुटण्याचे+
काम सुरू आहे, कोरोनासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे परिपत्रक काढताना राज्य सरकारने मुद्दामहून 'अंगीकृत' हा शब्द टाकून जाणूनबुजून चूक केली, सरकारने दोन वेगवेगळे परिपत्रक काढून लोकांना लुटण्याचा रुग्णालयांना मार्गच मोकळा केला. एका परिपत्रकात खाजगी दवाखान्यांना ICU साठी 9 हजार+
रुपये, PPE किट व मेडिसीनच्या खर्च असे साधारण 15 हजार रुपये दिवसाला घेण्याची थेट अनुमती दिली, म्हणजेच 15 दिवसाला सव्वा दोन लाख रुपये घेण्याची अनुमती दिली. तर दुसरीकडे महात्मा फुले योजने अंतर्गत जे रुग्ण फक्त व्हेंटिलेटरवर जातील त्यांना 15 दिवसाला 65 हजारांची तरतुद केली. म्हणजे+
खाजगी दवाखान्यांनी कमी पैसे असल्याने महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून उपचार करण्यास स्पष्टपणे नकार दिला, देतात. गरजू आणि योजनेचा लाभ मिळू शकणाऱ्या मात्र पैसे नसणाऱ्या रुग्णांना उभंही केलं जातं नाही हे वास्तव आहे. खरंतर राज्यातील खाजगी रुग्णालयांनी त्याद्वारे रुग्णांना उपचारच केले+
नाहीत. हे आम्ही नाही तर माहिती अधिकाराच्या माध्यमातून राज्याचे महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे जनमाहिती अधिकारी डॉ.नितीन पाटील यांनी माहिती दिलीय की, 24 ऑगस्ट 2020 पर्यंत राज्यातील 7 लाख रुग्णांपैकी केवळ 9 हजार 118 रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार झाले आहेत. आणि+
धक्कादायक हे आहे की, जेव्हा राज्यात 1 लाख 69 हजार रुग्ण होते तेव्हा आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते की महात्मा फुले आरोग्य योजनेतून 1 लाख 22 हजार रुग्णांवर उपचार केला. त्यांनतर लगेचच मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांनीही बाईटच्या माध्यमातून हाच+
खोटा मुद्दा रेटला की 1 लाख 22 हजार रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार झाले. वास्तविक केवळ 9118 रुग्णांवरच त्यातून उपचार झालेले आहेत. हे राज्यात जेव्हा 7 लाख रुग्ण होते त्या 24 ऑगस्ट 2020 तारखेला माहिती अधिकारातून हे भयंकर वास्तव आणि सरकारचा प्रचंड खोटेपणा बाहेर पडला+
त्या विरोधात ओमप्रकाश शेटे सरांनी आता कंबर कसली आहे. राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी राज्याच्या जनतेला वाऱ्यावर सोडणं तर गंभीर आहेच मात्र त्याहीपेक्षा गंभीर हे खोटेपणा आणि नागरिकांच्या उपचार न करता मृत्यूला कारणीभूत ठरणे हे आहे.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेत राज्यातील 85 टक्के लोकं+
बसली असती मात्र सरकारच्या लुटारू धोरणाने हे अक्षरशः लुटले आहेत, लोकांनी उपचारासाठी घर,जमीन,मालमत्ता सगळी विकली आहे. आयुष्यभराची कमाई या सरकारने खाजगी रुग्णालयांवर उधळायला लावली, खाजगी रुग्णालयाच्या माध्यमातून आणि कोरोनाच्या आडून सरकार लुटत आहे. आता राज्य सरकारला उच्च न्यायालयाने+
15 दिवसात म्हणणे सादर करण्याची नोटीस दिल्यानंतर आरोग्यमंत्री आणि राज्य सरकार धावपळ करत म्हणणे सादर करेल. मात्र शेटे सरांनी त्यामध्ये मागणी केली आहे की, "महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून कोरोना रुग्णांचा केवळ व्हेंटिलेटरसाठीच नाही तर सर्वच उपचारांचा समावेश करावा, आत्तापर्यंत+
(दि. 16 सप्टेंबर2020 पर्यंत) राज्यात 11 लाख 21 हजार 221 रुग्ण कोरोनाग्रस्त आहेत. त्यापैकी 9118 रुग्ण वगळता उर्वरित 11 लाख 12 हजार 103 रुग्णांना उपचारासाठी घातलेले पैसे राज्य सरकारने तातडीने परत करावे, आणि शासनाच्या परिपत्रकात ज्यांनी मुद्दामहून चूक करून लाखो रुग्णांना सरकारी+
योजनेपासून वंचित ठेवले त्यांच्यावर कडक कारवाई करावी."

आणि या जनहित याचिकेत प्रतिवादी म्हणून राज्य सरकार, द्वारा प्रधान सचिव, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव, हेल्थ स्टेट इन्श्युरन्स सोसायटीचे CEO, आरोग्य संचालनालयाचे संचालक, विभागीय आयुक्त आणि+
युनायटेड इंडिया इन्श्युरन्स कंपनी यांना केले आहे. त्यामुळे आता काहीही झाले तरी सरकारच्या खोटेपणाचा बुरखा फाटला तर आहेच मात्र यातून सहज सुटकाही होणे शक्य वाटत नाही. उलट राज्यातल्या ज्यांना सरकारी योजनेतून वंचित राहावे लागले त्यांना न्याय मिळेल. आयुष्यभराची कमाई खाजगी रुग्णालयावर+
उधळली ती परत मिळण्याची आशा आहे आणि महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणा आणि लुटारूपणा याचा पर्दापाश होईल हे नक्की.
आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि इतर गँग वेगाने हालचाल करणार यात शंका नाही. हा विषय मागे पाडण्यासाठी भावनिक, वादग्रस्त आणि अस्मितेचे प्रश्न निर्माण+
केले जातील. अराजकता माजवली जाईल, दडपशाही, मोगलाई तर सुरूच आहे.

मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे की, ज्यावेळी राज्यातले नागरिक कोरोनाच्या विळख्यात होते, उपचाराअभावी मरत होते त्यावेळी राज्य सरकार त्यांना न्याय देण्याऐवजी, मदत करण्याऐवजी त्यांना लुटण्याचे नियोजन करत होते. उपचाराअभावी+
ज्यांनी ज्यांनी जीवनयात्रा संपवली त्याला कारणीभूत हे राज्य सरकार आहे. अजूनही आपल्या भूमिका हे बदलत नाहीत, केवळ बोलबच्चन देऊन आणि फेसबुकवर लाईव्ह येऊन राज्य हाकणाऱ्या थोर बेस्ट शियमला राज्याचे अजिबात सोयरसुतक नाही. उलट कोरोनाच्या आकड्यात जगात 4 थ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे.+
जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्याच्या वलग्ना करणारे बिळात लपले आहेत हे कटू पण वास्तव आहे!
- विकास विठोबा वाघमारे

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with vikas waghamare (Modi Ka Parivar)

vikas waghamare (Modi Ka Parivar) Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @WaghamareVikas

Oct 28, 2023
महत्त्वाचा थ्रेड ..👇
एका बाजूला मराठा आरक्षणाचं आंदोलनं निर्णायक टप्प्यावर आहे अन् दुसऱ्या बाजूला एक घटक उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांना व्हिलन बनविण्याच्या प्रयत्नात आहे. कालपासून काहीजणांच्या पोस्ट पाहून थोडं वाईट वाटलं, गुणरत्न सदावर्ते हा देवेंद्र फडणवीस यांचा माणूस+ Image
असल्याचा जाणीवपूर्वक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. सदावर्ते काय बोलतात किंवा त्यांची भूमिका काय आहे याचा आणि भाजपचा किंवा देवेंद्र फडणवीसांचा काहीच संबंध नाही, सदावर्ते हा माणूस तसा थोडा आगाऊ आहे, जेव्हा मराठा समाजाला देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदा आरक्षण दिलं, ते+
आजपर्यंतच्या इतिहासात दिलं नव्हतं, जर त्या माणसाच्या मनात मराठा समाजाबद्दल आस्था नसती, आपुलकीची भावना नसती, संवेदना नसत्या तर कधीच आरक्षण दिलं नसतं, कारण त्यापूर्वी कितीतरी जातिवंत मराठे मुख्यमंत्री होऊन गेले मात्र त्यांनी मराठ्यांना आरक्षण कधीच दिलं नाही, ना त्याबद्दलची तळमळ+
Read 11 tweets
Sep 13, 2023
काल उरलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी अत्यंत संतापून एक वाक्य उच्चारलं की, “देवेंद्र फडणवीस करतात तरी काय ?”
आणि त्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटलं की, त्यांच्या संतापाचे दुसरे काही कारण नाही, सध्या आपल्या वडिलांचा पक्ष फुटल्याचे प्रचंड+ Image
मोठे टेन्शन ताईंना आहे, राष्ट्रीय बेरीज करण्याच्या बेतात असणाऱ्या वडिलांच्या घरातच वजाबाकी होते हे काही बरे नाही, याचे प्रचंड मोठे दुःख मनात आहे. आणि ताईंना ते जगाला दाखवायचेही नाही, देवेंद्र फडणवीस तर काहीच करत नाहीत मग करतात तरी काय असा यक्षप्रश्न ताईंना पडला आहे.

खरंतर+
देवेंद्र फडणवीस स्वतःचे कारखाने निर्माण करत नाहीत, कारखाने दिवाळखोरीत काढत नाहीत, त्याच्या आडून सरकारी अनुदान लाटत नाहीत, मग देवेंद्र फडणवीस करतात तरी काय?
देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचार करत नाहीत, बगलबच्चांच्या भ्रष्टाचाराला प्रोत्साहनही देत नाहीत, मग देवेंद्र फडणवीस करतात तरी काय?+
Read 8 tweets
Sep 5, 2023
थ्रेड👇
आज शरद पवार एका रात्रीत मराठा आरक्षणाच्या व्यासपीठावर जाऊन फक्त आणि फक्त देवेंद्रजी फडणवीस यांना लक्ष्य करत आहेत, मात्र स्वतः शरद पवार याच महाराष्ट्राचे एकदा, दोनदा नव्हे तर तब्बल चार वेळा मुख्यमंत्री होते, त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून म्हणा, नाहीतर मराठा मुख्यमंत्री+ Image
म्हणा मराठा बांधवांच्या वाट्याला त्यांनी काय दिलं?
तेही सोडा, देवेंद्रजी फडणवीस यांना आज इतक्या द्वेषाने लक्ष्य करण्यात शरद पवार पुढाकार घेताहेत, त्या पवारांना मराठा बांधवांनो, एवढंच सांगा की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 2018 साली मराठा आरक्षणाचा कायदा केला आणि मराठा+
समाजाला सामाजिक आर्थिक दुर्बल घटकात समाविष्ट करून आरक्षण दिले. ते धाडस फक्त फक्त देवेंद्र फडणवीस या एकाच व्यक्तीने केले, एवढेच नाही तर सारथीसारखी संस्था असो, अण्णासाहेब पाटील महामंडळ असो, प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजातील मुलांना वसतिगृह असो अशा अनेक योजनांच्या माध्यमातून मराठा+
Read 6 tweets
Sep 3, 2023
महत्त्वाचा थ्रेड👇
मराठा आरक्षणाचा विषय आला तेव्हा तेव्हा “फडणवीस” धावून आले. शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीत कधीच मराठा बांधवांना आरक्षण दिले नाही. पण देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण चळवळीने वेग घेतला आणि त्यांच्या चाणाक्ष, अभ्यासू आणि धोरणात्मक बुद्धीने+ Image
मराठा समाजाला आरक्षण दिले. खरंतर सुप्रीम कोर्टात आरक्षण जेव्हा स्थगित झाले तेव्हा राज्यात शरद पवारांच्या विचारातून आलेलं उद्धव ठाकरे सरकार होतं, जेव्हा सुप्रीम कोर्टात सुनावण्या होत्या तेव्हा त्या ठिकाणी मराठा आरक्षणची बाजू राज्य सरकार लढवत होते, मात्र शरद पवारांनी आजपर्यंत कधीच+
मराठ्यांना आरक्षण मिळावे अशी भूमीका घेतली नाही. आज जालन्याची एक घटना झाली आणि लगेचच रातोरात शरद पवार तिथे गेले आणि त्यांना मराठा आरक्षणाचा कधी नव्हे तो कळवळा आला. पण मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे ही पहिल्या दिवसापासूनची भूमिका देवेंद्र फडणवीसांची होती. ती त्यांनी सत्यात+
Read 16 tweets
Jun 4, 2023
थ्रेड👇
परवा ओरिसात रेल्वे दुर्घटना घडली अन शरद पवार सवयीप्रमाणे राजकारण करायला पुढं आले, बोलता बोलता त्यांना स्व. लालबहाद्दूर शास्त्रींची आठवण आली, एकदा दुर्घटना घडली होती आणि शास्त्रींनी नैतिक जबाबदारी स्वीकारुन रेल्वे मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता, आता याही दुर्घटनेनंतर+ Image
रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा असं पवार साहेब बोलून गेले. त्यात त्यांनी वापरलेला नैतिकता हा शब्द माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विचार करायला लावत होता.

वयाने आणि राजकारणात जेष्ठ असलेले शरद पवार आज नैतिकतेचे धडे देत आहेत, मात्र त्यांच्या इतिहास काळात थोडं जायला हवं असं सतत+
वाटत होतं. 1993 साली मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाला, हे बॉम्बस्फोट तब्बल 12 ठिकाणी झाले मात्र धडधडीत खोटं बोलत शरद पवारांनी 13 ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्याचं सांगितलं, त्या स्फोटात तब्बल 257 जणांचा बळी गेला होता, तर शेकडो लोकं जखमी झाले होते, तेव्हा शरद पवार स्वतः मुख्यमंत्री होते+
Read 7 tweets
Mar 22, 2023
महत्वाचा थ्रेड👇
बारामतीच्या पवारांना बामणाचं पोरगं आणि तेही आपल्यापेक्षा कमी वयाचं, आपल्या डोळ्यादेखत राजकारणात आलेलं पोरगं मुख्यमंत्री झालं हेच खटकायला लागलं होतं अन त्या तरुण मुख्यमंत्री झालेल्या देवेंद्र फडणवीसांच्या भोवती आंदोलन, संप आणि मोर्चाचे फास आवळायला लागले. रोज नवी+
आव्हानं आणि रोज नवी संकटं उभी केली जात होती आणि प्रत्येक आव्हानाला पेलत, सामोरे जात हा फडणवीस नावाचा बहाद्दर काटेरी खुर्ची सांभाळत होता, एकीकडं तत्कालीन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसारखा गद्दार पक्ष सोबतीला होता, रोज पाठिंबा काढण्याच्या धमक्या सुरू होत्या, एकीकडं रोज विरोधकांच्या+
काव्यांची परीक्षा द्यायला लागायची अन हे सगळं सुरू असताना महाराष्ट्राच्या समृद्धीचा रोडमॅप सुरू होता, प्रचंड वेगाने महाराष्ट्र पुढे न्यायचा हा ध्यास देवेंद्र फडणवीस यांच्या मनात होता. कितीही संकटं वाट्याला आली तरी न थकणारा, न थबकणारा आणि जराही डळमळीत न होणारा हा माणूस पवारांच्या+
Read 21 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us!

:(