#आजचाथ्रेड 17-09-20 यावर्षीचा वारीसोहळा कोरोनामुळे रद्द झाला असून तुकाराम महाराजांच्या आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका हेलिकॉप्टर ने पंढरपुरला जाणार हायेत अशी बातमी घेऊन वसंता किसनाकडे आला....किसनाने बातमी ऐकली आणि तो मटकन खालीच बसला. 1/1
त्याच्या अंगातील अवसानच गळाले. कोरोनामुळे गेले दोन महिने तो घरातच अडकून पडला होता. त्याचे डोळे आता आषाढी वारीकडे लागले होते. पंढरीचा पांडूरंग आपल्याला असा उघड्यावर येऊ द्यायचा नाही असा त्याचा पांडूरंगावर ठाम विश्वास होता...नव्हे श्रध्दा होती. 1/2
आषाढी वारीच्या निमित्ताने त्याच्या तुळशीच्या माळा विकल्या जात आणि त्याची वारीही घडे...स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधे. पण या बातमीने त्याचा सार्या आशा मावळल्या. बराच वेळ विचार करून त्याने काहीतरी ठाम निर्णय मनाशी घेतला. किसना लगबगीने उठला. 1/3
फडताळातील रेशन कार्ड,आधार कार्ड सोबत घेतले आणि तो पोलीस स्टेशनच्या दिशेने निघाला आणि तो तावातावानेच घरातून बाहेर पडला.पोलीस स्टेशनला जाऊन गावाकडे जायचा पास आणायचा आणि पास मिळाला की गावाकडे निघून जायच असा ठाम निश्चय त्याच्या मनाने घेतला होता.चालतच तो गोपाळपुर्यापाशी पोहचला. 1/4
रोजच्या सवयीने त्याने नांदुकरकीच्या झाडाला आणि पारावर असलेल्या छोट्या मंदिरातील तुकाराम महाराजांच्या मूर्तीला वंदन केले. फार फार वर्षापुर्वी या गोपाळपुर्यातूनच तुकाराम महाराज वैकुंठाला गेले होते.किसनाच्या घरात त्याच्या बापापासून वारी होती. किसनाचा बाप गाव सोडायला तयार नव्हता. 1/5
पण वाढलेल्या गोतावळ्यात आणि येणार्या उत्पन्नावर भागेना म्हणून इकडे देहूला येऊन राहीला येथेच तुळशीच्या माळा तयार करायला शिकला..त्यासोबतच आणखी काही काम करत प्रपंच संभाळला. गावाकडेही येणे जाणे ठेवले....भावकीतल्या मरणाकारणाला आणि गावच्या जत्रेले गावात यावं लागायचं. 1/6
म्हणून जुन घर दुरूस्त करून घेतलं होत. बापाची कष्टाची शिकवण किसनात उतरलेली तुळशीच्या माळा करण्याबरोबरच चहाची एक छोटी गाडीही तो चालवायचा. दिवसाची सुरवात तुकाराम महाराजांच्या दर्शनाने व्हायची आणि दिवसही त्यांच्याच भक्तीत आणि गुणगान गाण्यात जायचा. 1/7
किसना स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधायचा. किसनाला वारी खुप आवडायची. वर्षभर तो वारीची आतुरतेने वाट बगायचा. वारी म्हणजे कीर्तन, प्रवचने, अभंग यांची मांदीयाळी असायची. वारीत भारूडाचा आणि फुगडीचा तर असा दबदबा असायचा की उभ्या पावसात तुम्ही जागचे हलणार नाही. 1/8
टाळ आणि मृदंगाच्या तालावर वारकरी भान हरपून नाचायचे आणि किसना ते बघत रहायचा. भारूडातल्या सोंगाला आणि विनोदाला खळखळून हसून दाद द्यायचा एखाद्या मुक्कामावर भजन, भारूड,गवळणी झोकात म्हटल्या जायच्या.या नादात तल्लीन झालेले वारकरी देवालाही बोलवायचे.मी तु पण वाया जायचे.किसनाला वाटायचे 1/9
देवालाही हे सुख खुणावात असावे....त्यालाही हा विरह सहन होत नसावा मग पुंडलिकाला दिलेला शब्द मोडून विटेवरच ते परब्रह्म फाटक्या वारकर्यांच्या नाचात सामील होत असाव.देव माणसांत मिसळत असावा.
त्याशिवाय का याला एवढी गोडी येतेय..किसनाला हे सार पुन्हा ..1/10
अनुभवायचं होत.पण वारीच रद्द झाली म्हटल्यावर त्याचा हिरमोड झाला होता. किसनाचा सारा प्रपंचा या तुळशीच्या माळा करण्याच्या व्यवसायावरच चालायचा.किसना तुळशीचे काष्ठ आणायचा आणि त्यापासून वेगवेगळ्या सुंदर माळा बनवायचा.गेले दोन महिने असलेल्या लाॅकडाउन मुळे त्याचे चालू चलन थांबले होते.1/11
अजून काही दिवस असेच राहीले तर किसनावर उपासमारीची वेळ येणार होती. आता त्याला आशा होत्या त्या वारीकडून. जर वारी सुरू झाली तर वारीतील वारकर्यांकडून त्याच्या माळांची खरेदी झाली असती. सोबत त्याच्या चहाची गाडीही चालली असती. किसना दरवर्षी वारीत चार पैशे मिळवायचा 1/12
आणि त्यावर त्याचे साल पार पडायचे.आता वारीच रद्द झाली म्हणजे किसनाचे उत्पन्नाचे साधनच बंद झाले.अध्यात्मासोबत उदरभरणही व्हायचे पण आता तर दोन्हीही होणार नव्हते. त्यामुळेच किसनाने गावाकडे जायचा निर्णय घेतला.गावाकडे निदानशेतातील किंवा दुसरे कुठले तरी काम हाताला मिळेल ही आशा होती. 1/13
म्हणून त्याने सर्व कागदपत्रे गोळा केली आणि एक निश्चय करून बाहेर पडला.किसना गोपालपुर्यात आला होता. नांदुरकीचे झाड नेहमीप्रमाणे वार्यावर डोलत होते. किसना तुकाराम महाराजांच्या गोजिर्या रूपाकडे पाहतच राहीला. पण तो लगेच भानावर आला. आज महाराजांचा त्याला रागच आला होता. 1/14
तो त्या हसर्या मुर्तीकडे पहात रागानेच बोलला बुवा तुम्ही आम्हाला सोडून एकटेच वारीला निघालात. आजपर्यंत माझी वारी कधी चुकली नाही. तुमच्या सोबतच आजपर्यंत पंढरीला गेलो आणि आलो. पंढरीचा पांडूरंग डोळे भरून पाहिला. आजवर संसारातील काही दुखल खुपल तर ते तुम्हालाच सांगीतल.1/15
तुम्हीच रस्ता दाखवला माझा संसार तुमच्या जीवावरच चाललाय....तुमचा आशिर्वाद पाठीशी आहे म्हणून आम्ही दोन घास सुखाने खातोय....पण तुम्ही तर आमच्या वरच रूसलात.आम्हाला सोडून तुम्ही एकटेच निघाला.मागबी तुम्ही असच सगळ्यांना सोडून एकटेच वैकुंठाला निघून गेलात.आताही तुम्ही तसच करताय..1/16
तुमची आमच्यावरची मायाच लटकी.....हा रोग काय आला आणि आमचा देवच आमच्यापासून तोंड फिरवून राहू लागला.आजपासून तुमचा नी माझा दावा आहे अस म्हणत तो रागाने पाय आपटत बाहेर पडला.किसना पोलीस स्टेशनमध्ये आला आणि ठाणे अंमलदाराजवळ सर्व कागदपत्रे दिली. 1/17
“काम काय करतोस" या प्रश्नासरशी किसना म्हणाला "मी तुळशीच्या माळा करून विकतो आणि चहाची गाडी चालवतो."किसनाच्या या उत्तराने साहेबांचे लक्क्ष किसनाकडे गेले. साहेबांनी किसनाला आत बोलावून घेतले. किसना दबकतच साहेबांच्या केबीनमध्ये गेला. तिथे ..1/18
साहेबासमोर दोन चांगल्या कपड्यातील माणसे बसली होती.तु काय काम करतोस म्हणाला?"साहेबांनी किसनाला पुन्यांदा विचारले.”मी तुळशीच्या माळा तयार करतो आणि चहाची गाडी चालवतो.साहेब समोरच्या माणसाकडे पहात म्हणाले "तुमचे काम झाले."किसना हे एका मोठ्या कंपनीतून आलेत. यांचे मालक वारकरी आहेत. 1/19
आणि दरवर्षी ते त्यांच्या कंपनीच्या कामगारांची एक दिंडी घेऊन येतात .यावर्षी वारी रद्द झाली म्हटल्यावर ते त्यांच्या कामगारांना वारीची यावर्षीची आठवण म्हणून तुळशीची माळ भेट देणार आहेत.यांना तुळशीच्या माळा हव्यात पण लाॅकडाउनमुळे यांची अडचण झालीय. तु यांना काही मदत करू शकतो का? 1/20
साहेबांच्या या प्रश्नाने किसना भानावर आला.
होय जी नक्की मदत करतो पण मी काय करायचे"
"आम्हाला पाचशे तुळशीच्या माळा हव्यात....तुम्ही त्या बनवून द्याल का?" कंपनीचे साहेब बोलले.”होय देतू की ..माझ्या कडे लय प्रकारच्या माळा आहेत. जपमाळ, दुपट्टीमाळ, पाचपट्टीमाळ, चंदणमाळ 1/21
असे प्रकार हायेत. गहूमणी, गोलमणी, कळसमणी अश्या वेगवेगळ्या मण्याच्या माळाही आहेत. तुम्हाला कसल्या हव्यात." कंपनीच्या साहेबांनी गळ्यातील कळसमण्याची माळ दाखवत सांगितले, "अश्या पाचशे माळा एकादशीच्या अगोदर एक दिवस आम्हाला करून द्या." 1/22
" देतो साहेब पण तुळशीमाळ म्हणजे देवाचा दागीना आहे.....त्याची अनमान व्हायला नको"
"बरोबर आहे तुझं....आम्ही त्याची पुर्ण काळजी घेऊ" अस म्हणत त्यांनी खिशातून एक पाकीट काढून किसनाच्या हातात ठेवले.
किसनाला विश्वासच बसेना. पैश्याचे जाड पाकीट बघून किसना हरकून गेला. 1/23
तो इन्स्पेक्टर साहेबांच्या आणि कंपनीच्या साहेबांच्या समोर वाकून म्हणाला "लय उपकार झाले साहेब. माझ्या हाताला काम मिळाले. वारी रद्द झाल्यामुळे माझ्या हातचे काम गेले आता मी गावाकडे जाणार होतो पण तुम्ही देवासारखे धाऊन आलात... .देवच पावला. 1/24
किसनाच्या चेहर्यावरील समाधान पहात साहेब म्हणाले!
"किसना उद्यापासून तु रोज आमच्या पोलीस स्टेशनला चहा पुरवायचा... हेही काम तुला देतो."
किसनाला एक म्हणता दोन काम मिळाली...तो लांबुनच साहेबांच्या पाया पडला.
किसना पळतच गोपाळपुर्यात आला. नांदुकरकीचे झाड शांत उभे होते. 1/25
किसना तुकाराम महाराजांच्या समोर उभा राहिला...महाराजांची हसरी मुद्रा प्रसन्न दिसत होती महाराज मी चुकलो मी तुम्हाला काहीबाही बोललो....तुमच्याशीच दावा मांडला...माझ गार्हाण तुम्ही ऐकलं....माझ्या हाताला काम दिल. माझ्या लेकराबाळांला दोन घास दिल..1/26
"चुक झाली एक वेळा! मजपासून चांडाळा!!
उभे करोनी जळा! माजी वह्या राखील्या !!"
महाराजांचाच अभंग अनाहुतपणे किसनाच्या तोंडून बाहेर पडला. किसना गालावर मारत बोलू लागला देवा मला माफी करा.. म्या चांडाळाने तुम्हावर आळ घेतला .....तुम्ही माझ घरदार, संसार राखलात.1/27
उघड्यावर पडणार्या माझ्या बायकालेकरांना तुम्ही पदरात घेतलं....माजी लाज राखली तुम्ही मीच पाप्याने तुम्हाला बोल लावले...माझी भक्ती वाया गेली नाही.....माझा देव माझ्यासाठी धाऊन आला....
त्याच्या डोळ्यातून अश्रू घळाळू लागले.....नांदुकरकीच्या पानांची सळसळ वाढली.....1/28
"......तुका म्हणे मज प्रचिती आली देखा आणि या लोका काय सांगू ...." जवळच्या देहूच्या देवळातून ह्या अभंगांचे शांत स्वर वार्यात मिसळत होते. - मा.बालाजी धनवे साहेब(आर.टी.ओ.इन्स्पेक्टर,कोल्हापूर ) यांनी लेखन केले आहे.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
एक छान अनुभव जो मी स्वत: आजही घेत आहे, तुमच्यासाठी पाठवत आहे. प्रयोग करून बघायला काय हरकत आहे. नुकसान अजिबात नाही. 😊
रोजच्या जीवनात बरेच वेळा असं वाटतं की आपल्या मनासारखं काहीच होत नाही. होतील असं वाटणारी कामं ठप्प पडतात, अडकतात.
कितीही प्रयत्न केले तरी ज्या गोष्टी व्हायच्या असतात त्या होत नाहीत.... याचं उत्तर माझ्या एका मित्राकडून मला शिकायला मिळालं. आमची मैत्री जशी वाढू लागली तसं त्यांनी मला एक मजा सांगितली. तो म्हणाला की आम्ही एकामेकांशी बोलायला लागलो की 'आजची चांगली गोष्ट काय?'
असा प्रश्न विचारायचा. प्रश्न सोपा आहे पण पहिले काही दिवस मला नीट उत्तरंच देता येत नव्हतं. मी 'आजची चांगली गोष्ट काहीच नाही' असं म्हटलं की तो, 'काहीतरी असेल, नीट विचार कर' असं म्हणायचा. मग मी काहीतरी छोट्यातलं छोटं छान आहे म्हणून सांगायचो.
आप्पा बळवंतांच आडनाव?
आप्पा बळवंत चौक सर्वज्ञात ठिकाण. या अप्पा बळवंतांचं आडनाव काय?
कोणतंही पुस्तक पाहिजे असेल तर ते हमखास मिळण्याचे ठिकाण म्हणजे *अप्पा बळवंत चौक* गणपतीची आरती असो, देवीची आराधना करणारं श्रीसूक्त.
शाळा, कॉलेज, अभियांत्रिकी विद्यालय, वैद्यकीय विद्यालय, या सर्वांची पुस्तकं असो, ती मिळणारच या चौकातल्या ओळीने बसलेल्या दुकानातूनच. जुन्या पुस्तकांची खरेदी-विक्रीही इथेच चालते. मोठाल्या पिशव्यातून पुस्तकं भरून ठेवून विक्रेते ग्राहक पटवतात. रस्ता अडवला म्हणून तक्रार करणारे अधिकारी
आले तर, पुस्तकाच्या पिशव्या त्वरेने बाजूला नेतात. या पुस्तकपुराणा च्या नादात वर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर राहिलंच.आप्पा बळवंत त्याचं आडनाव 'मेहंदळे'
'बळवंतराव मेहेंदळे' हे होते पेशव्यांचे सेनापती. पानिपतच्या युध्दामध्ये ते मारले गेले.
A beautiful message I received on WA
पहाटेची अमर्याद ताकद*...
*तुम्ही सकाळी किती वाजता उठता?*
*हेल एरॉल्ड* नावाचं एक जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे, ते एक प्रचंड यशस्वी व्यावसायीक होते, मोठ्या जिद्दीने त्यांनी एका अपघातामुळे आलेल्या शारिरीक विकलांगतेवर मात केली होती. झाला,
अब्जोपती हेल कर्जबाजारी झाला.पण तो हार मानणारा नव्हता, यातून बाहेर कसं पडावं, हे विचारण्यासाठी तो आपल्या एका यशस्वी मित्राकडे गेला, मित्राने त्याला काय सल्ला दिला असेल बरं?
त्याला काहीतरी आगळेवेगळे उपाय अपेक्षित होते,काही दिवस त्याने कसेबसे ढकलले, पण दिवसेंदिवस निराशा त्याला घेरत होती, मग नाईलाज म्हणुन *त्याने सकाळी चार वाजता उठायची सुरुवात केली,* आणि हेल सांगतो, त्याचं आयुष्यच बदलुन गेलं!
त्या गणेश मुर्ती विक्रीच्या स्टॉलमधे 'तो' आज सातव्यांदा आला होता. जुनाटसा, कोणत्या तरी मंडळाचा, कदाचित फुकटच मिळालेला टी शर्ट व साधी कॉटनची मळलेली पॅन्ट असा त्याचा पेहराव होता.
दरवेळी तो यायचा..त्या कमळावर बसलेल्या शाडूच्या गणेश मूर्ती ज्या रॅकवर ठेवलेल्या होत्या, तिथे तो जायचा... बराच वेळ त्या मूर्तींकडे देहभान विसरुन पहायचा, मग किंमत विचारायचा.
'कितना को दिया.गणेशजी?'
दरवेळी दुकानातला मुलगा त्याला सांगायचा
अंकल...साडे छहसो रुपये...सीक्स हंड्रेड फिप्टी. दे दूं..?'
तिच किंमत असूनही तो प्रत्येक वेळी..
'अय्यो....ईतना..?' असे स्वतःशीच म्हणायचा..खिशात हात घालून काही तरी चाचपायचा, व पुन्हा एकदा त्या गणेश मुर्तींकडे डोळे भरुन पाहून, उदासपणे बाहेर पडायचा.
जन्माष्टमीच्या निमित्ताने वाचलेली, कै. दुर्गा भागवतांनी लिहिलेली ही सर्वोत्तम पोस्ट:
🌿
कृष्णा,
तुला कसलं संबोधन लावायचं? तू आकाशासारखा वाटतोस मला, आकाश कसं सतत माथ्यावर असतं आपण जिथे जाऊ तिथे सोबत करतं पण त्याचा निळा रंग बोटावर नाही घेता येत…
खरं म्हणजे तुझं नाव घेतल्यावर तू मानवी रूपात डोळ्यासमोर येतच नाहीस.. आधी येते ती आकाशाची गडद निळाई आणि मग त्यामागोमाग लहरत येतं एक मोरपीस .तुझं मोरपीस!
तुझ्याइतका मानवी जीवनात मिसळलेला कुठलाच देव नाही बघ! प्रत्येक नातं तू समरसून जगलास आणि वेळ येताच ते नातं त्यागून मोकळाही झालास!
कधी परत वळून बघितलंस का रे मागे? तुझ्यामागे त्या माणसांचं काय झालं असेल तुझ्याशिवाय ?
तुझं सगळंच अतर्क्य! तू प्रचलित नियम मोडलेस. जन्म घेतलास वसुदेव देवकीच्या मथुरेत पण वाढलास नंद यशोदेकडे गोकुळात! दहीदुधाच्या चो-या केल्यास, भलत्या वयात गोपिकांची छेड काढलीस.
Contact आणि Connection
मध्ये नेमका काय फरक ?
घटना न्यूयार्कमधील आहे. एका भारतीय साधूचे तिथे व्याख्यान झाले.
त्यानंतर पत्रकारांनी त्यांना गाठले.
त्यातील एकाने साधूला विचारलं,
"साधू महाराज, तुम्ही आताच्या व्याख्यानात संपर्क (Contact) आणि लगाव (Connection) यावर बोलला.
पण ते गोंधळात टाकणार आहे. या दोन्हीमध्ये फरक काय ?"
साधुने मंद स्मित केले अन उत्तर देण्याऐवजी वेगळेच प्रश्न त्यांनी त्या पत्रकाराला विचारणे सुरु केले.
साधू : "तुम्ही न्यूयार्कचे रहिवासी का ?"
पत्रकार : "येस !! का हो ?"
साधू : "घरी कोण कोण असत?"
आपल्या प्रश्नाचे उत्तर टाळण्यासाठी साधूबाबा असं काहीतरी वेगळं विचारत आहेत असं त्या पत्रकाराला वाटलं.
कारण त्याचा प्रश्न सार्वजनिक होता अन साधू तर खाजगी काहीतरी विचारत होते.
तरी मूळ प्रश्नाचे "उत्तर" मिळण्याच्या आशेने तो पत्रकार उत्तर देत गेला.