2003 मध्ये बाळासाहेब आंबेडकर UNO ( संयुक्त राष्ट्र परिषद) च्या एका कॉन्फरन्ससाठी डरबन, द.आफ्रिका येथे गेले होते. भारताचे प्रतिनिधी म्हणून. ती परिषद जागतिक आनुवंशिक हल्ले यावर होती. त्यावेळी UNO च्या अजेंड्यावर भारतातील जातीयवाद हा किती खोलवर रुजला आहे, यावर त्यात चर्चा व्हावी,
यासाठी बाळासाहेब आंबेडकर आग्रही होते. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी आणि भारत सरकार यासाठी तयार नव्हते. तेव्हा बाळासाहेब आंबेडकर यांनी जगभरातील वेगवेगळ्या NGO सोबत मिळून भारत सरकारवर दबाव आणला होता आणि UNO च्या परिषदेत 'भारतातील जात वास्तव' हा विषय जागतिक पटलावर मांडला होता.
तेव्हा बाळासाहेब यांनी भारत सरकारचा या विषयाला असणारा विरोध, आनुवंशिक हल्ल्या बरोबर भारतातील भीषण जात वास्तव इ.इ. मुद्दे त्यावेळेस मांडले होते. भारत सरकारची ही बाजू जागतिक पातळीवर तेव्हा उघडी पडली होती.
त्या परिषदेनंतर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीने बाळासाहेब आंबेडकर यांना विचारले होते की, बाळासाहेब तुम्ही हे कसं काय केले?
त्यावर बाळासाहेब यांनी पंतप्रधान वाजपेयीला स्कुल ऑफ स्टडीचा भारत सरकारकडे अभाव आहे आणि म्हणून सरकारला हरवणे सोपे गेले अस सांगितले होते.
यावर बाळासाहेब आंबेडकर यांनी अटलबिहारीला जी कॉन्सेप्ट सांगितली होती, ती ही होती.
त्यानंतर वाजपेयींनी टेक्स्टाईल मिनिस्ट्रीकडून इंदू मिलची जागा ही ''इंटरनॅशनल स्कुल ऑफ सेन्टर स्टडीजसाठी राखीव ठेवावी" अशी नोट पंतप्रधान असतांना दिली होती. त्यावर त्यांचा शेरा होता.
पंतप्रधानांनी दिलेला शेरा/नोट ही अंतिम असते.ती बदलण्याचा अधिकार पंतप्रधानालाच असतो.
काँग्रेसने कधीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने जागतिक दर्जाचे "इंटरनॅशनल स्कुल ऑफ सेंटर स्टडीजचा" हा मुद्दा पुढे येऊ न देता फक्त पुतळ्याचे राजकारण केले. #इंदू_मिल #आंबेडकर @Prksh_Ambedkar
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
बुद्ध धर्मावर बरेच लोक खोडसाळपणे टीका करतात, त्यापैकी #सावरकर एक होते. वास्तविक त्यांना काय म्हणायचे आहे हेच मला कळत नाही. बुद्ध हा वाईट मनुष्य आहे असे त्यांना म्हणावयाचे आहे काय ?बौद्ध धर्म प्रचारक राजे वाईट होते असे त्यांना म्हणावयाचे असेल तर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट मांडावी
मी त्यांना उत्तर देण्यास समर्थ आहे. सावरकरच काय, पण कुणालाही बौद्ध धर्माबाबत काही विचारावयाचे असल्यास त्यांनी उघडपणे मला विचारावे, त्यांना उत्तर देण्याची माझ्यात हिम्मत आहे.
भगवान बुद्धांचा जो अफाट भिक्षुसंघ होता त्यात शेकडा ७५ टक्के ब्राम्हण होते, हे सावरकरांना माहीत आहे काय?
सारीपुत्त मोगलानसारखे पंडित ब्राम्हण होते, हे सावरकरांनी विसरू नए. सावरकरांना मला असा प्रश्न विचारायचा आहे की पेशवे कोण होते ते भिक्षु होते काय ? मग त्यांच्या हातून इंग्रजांनी राज्य कसे हिसकावून घेतले?
तेव्हा अशा नादान व बेजबाबदार लोकांच्या आपण नादी लागू नए.
(१/३)स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत @VBAforIndia@INCIndia सोबत आघाडी करण्यास तयार आहे. या संदर्भात बोलणी करण्याची जबाबदारी वंचित बहुजन आघाडीने पक्षाचे प्रवक्ते @priyadarshi07 यांच्यावर सोपवली आहे,
४फेब्रुवारी रोजी प्रियदर्शी तेलंग हे काँग्रेसचे प्रवक्ते गोपाल तिवारी यांना
(२/३)भेटले, आगामी महानगर पालिका निवडणुकीत आघाडी करण्या संदर्भात त्यांनी तिवारी यांना प्रस्ताव दिला आहे. गोपाल तिवारी यांनीही कॉंग्रेस @VBAforIndia सोबत आघाडी करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले. मात्र @INCMaharashtra प्रदेशाध्यक्ष @NANA_PATOLE यांनी वंचित बहुजन आघाडी तर्फे आघाडीचा
प्रस्ताव नसल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष @NANA_PATOLE आणि प्रवक्ते गोपाल तिवारी यांच्यात काहीतरी कम्युनिकेशन गॅप असावी असे दिसते.
नाना पटोले यांनी वंचित ने दिलेल्या युतीच्या प्रस्तावा बाबत @INCIndia ची भूमिका स्पष्ट करावी. @RekhaTh31654382
ह्या कॉलेज ला मिलिंद हे नाव देण्याचा माझा उद्देश आहे. मिलिंद हा एक बॅक्ट्रीया चा ग्रीक राजा होता . त्याला आपल्या विद्वत्तेबद्दल घमंड होती. त्याला असे वाटे कि, ग्रीक सारखे विद्वान लोक जगाच्या पाठीवर कोठेच सापडावयाचे नाहीत.
आपल्या बुद्धिमत्तेचा मिलिंद ला गर्व चढला होता. तो सर्वांना वादविवादाने आव्हान देत असे. त्याने जगाला आव्हान दिले. त्याला एकदा वाटले कि आपण एखाद्या बौद्धभिक्खू बरोबर वाद करावा. पण त्याच्याबरोबर वाद करावयास कोणीही तयार झाला नाही. तसं मिलिंद हा काही तत्वज्ञानी नव्हता
किंवा गाढा विद्वानही नव्हता. त्याला राज्यकारभार कसा चालवावा हेच माहित होते पण अशा मिलिंद बरोबर बुद्धिवाद करण्यास कोणीही तयार होईना. ह्याची बौद्धांना लाज वाटली आणि वाईटही वाटले. नंतर महान प्रयासाने त्यांनी नागसेन भिक्खूला तयार केले. मिलिंद चे आव्हान आपण स्वीकारले पाहिजे
लालडोंगर/चुनाभट्टीइथे झालेल्या घटनेचा साधारण घटनाक्रम समजतोय तो असा आहे,
१) घटना साधारणपणे दीड महिन्यापुर्वी लालडोंगर,मुंबई येथे घडली आहे.गुन्ह्यातील पिडीत मुलीला तेथील प्रमुख आरोपी वइतर संशयित आरोपीनी इंजेक्शनद्वारे ड्रग्ज देऊन पाशवी बलात्कार करुन तिचा खुन करण्याचा प्रयत्न केला
घटना घडल्यानंतर सदर मुलीला ज्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडे नेण्यात आलं, त्या जोशी नामक डॉक्टरने प्रथम मुलीची जात विचारली.
२) सुर्वे म्हणुन कुणीतरी महिला तपासाधिकारी (IO) आहेत त्यांनी या प्रकरणावर प्रचंड दबाव टाकला आहे, पिडीत मुलीच्या कुटुंबीयांना मानसिक त्रास दिला आहे.
त्यांनी एफआयआर देखील दाखल होऊ दिला नाही.
३) मुलीच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती, परंतु आरोपींकडुन ड्रग्ज चा ओवरडोस दिल्याने ती बोलु शकत नव्हती. सदर मुलीच्या प्रकृतीत सुधारणा झालेली असताना देखील डॉ. जोशीच्या सांगण्यावरुन आणि महिला अधिकारी सुर्वेंच्या दबावातुन मुलीला दुसऱ्या