नागा करार - मुईवांची मिजास उतरवणार!

नागा करारावर सह्या होण्याचा अंतिम दिवस,३० सप्टेंबर जसजसा जवळ येत आहे तसतसे राजकीय चित्र ही स्पष्ट होत चालले आहे. थुईंगा लेंग मुईवा वेगळा नागा झेंडा आणि वेगळी नागा घटना यावर अडून बसले असले तरी यापुढे मुईवांच्या अडेलतट्टू पणाला मुळीच भीक न घालता
नागा पाॅलिटीकल ग्रुपसह अन्य नागा सामाजिक संस्था बरोबर नागा करार करायचाच असा ठाम निश्चय करून केंद्र सरकारची पावले पुढे पडत आहेत. त्यामुळेच सप्टेंबरच्या तिसर्या आठवड्यात सर्व प्रमुख नागा राजकीय आणि सामाजिक संस्थांचे नेते नवी दिल्लीत डेरेदाखल होत आहेत. मध्यस्थ आणि नागालँडचे राज्यपाल
असलेले श्री आर.एन.रवी दिल्लीत दाखल होणार आहेत.त्यामुळे घटना चक्राला वेग आला आहे. श्री आर.एन. रवी ह्यांच्याशी बोलणी करणार नाही अशी भूमिका घेतलेले थुईंगा लेंग मुईवा इंटेलिजन्स ब्युरोच्या अधिकार्यांशी स्वतंत्रपणे बोलणी करीत आहेत.थुईंगा लेंग मुईंवांच्या धमक्यांना आणि दडपणाला झुगारून
"याल तर तुमच्या सह नाहितर तुमच्या शिवाय" नागा करार होणारच अशी ठाम भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे.

जर ह्या करारावर सह्या न करण्याची भूमिका एन.एस.सी.एन(आय एम) चे अध्यक्ष थुईंगा लेंग मुईवा ह्यांनी घेतली तर पुढे काय? त्यातून कोणते नवे प्रश्न पुढे उभे राहतील ह्यांचा विचार केंद्र
सरकारने नक्कीच केलेला असेल आणि त्या दृष्टीने पुढिल व्यूहरचना ही तयार ठेवली असेल ह्यात शंकाच नाही. शक्यता अशी आहे की भारतावर चहुबाजूने दबाव आणण्याच्या चीनच्या योजनेनुसार चीन थुईंगा लेंग मुईवांचा प्याद्याप्रमाणे उपयोग करेल आणि पूर्वीप्रमाणेच शस्त्रे आणि पैसा पुरवून भारताविरोधात
हिंसक संघर्ष करण्याला उद्युक्त करेल. नाहितरी मुईवा १९८०च्या दरम्यान चीनच्या पाठींब्यावरच नागालँडमध्ये हिंसक कृत्य करित होते. पण गेल्या चाळीस वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. सर्वसामान्य नागा जनता राजकीय दृष्ट्या आता सजग झाली आहे.
एक आऊटसायडर मणिपूर मधील तांखुल नागा नागालँडचे भवितव्य कसेकाय ठरवू शकतो? असा अधिकार त्याला कोणी दिला?असे उघडपणे आज "नागा" माणुस विचार करू लागला आहे. मुईवांच्या कुकृत्याचा जाहीरपणे पाढा वाचला जात आहे.तेथील वर्तमानपत्रातून मुईवाने "नागालिमचे" स्वप्न दाखवून नागांवरच कसे अत्याचार केले
ह्यावर लेखांचा रतीब घातला जात आहे. ह्या सगळ्याचा निष्कर्ष एव्हढाच की मुईवाला आता नागा समाजाच्या विरोधालाच तोंड द्यावे लागणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाश्चात्यांचे भारतीय उपखंडात हितसंबंध जोपासणार्या चर्चचा, कम्युनिस्टांचा एजंट असलेल्या मुईवांना कडाडून विरोध आहे.
आणि त्यातही आता सर्वात अत्यंत महत्त्वाचे म्हणजे मुईवाला त्याच्याच भाषेत उत्तर देणरे खंबीर आणि धाडसी नेते केंद्रात सत्तेवर आहेत. विरोधात गेल्यास मुईवांच्या एन.एस.सी.एन ची गठडी वळण्यास त्यांना मुळीच वेळ लागणार नाही.
आधी म्हटल्याप्रमाणे तशी तयारी करूनच केंद्राने वाटाघाटींचे फासे टाकले असणार ह्यात शंकाच नाही.

श्री. पुरूषोत्तम रानडे
संपादक, ईशान्य वार्ता
#NagalandDiary

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with 🚩प्राजक्ता ओक™🚩Prajakta Oak

🚩प्राजक्ता ओक™🚩Prajakta Oak Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @BalshaliBharat

Jun 13, 2021
संस्कृतीची जपणूक:

दोन महिन्याहून अधीक दिमापूर येथे वास्तव्य केल्यानंतर परतीच्या प्रवासाची वेळ अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपली. येथील लाॅकडाऊन अजून १८ जून पर्यंत वाढवलेले असले तरीही परवानगी घेऊन काही महिला सदस्य कालपासून मला भेटायला आलेल्या आहेत. येतांना मायेचा पदर पांघरत कुणी स्थानिक
तांदूळ तर कुणी तांबूल गुत्थी म्हणजेच सुपारी, कुणी दारचे आंबे आणले. एकीने तिने तयार केलेले कानातले हातावर ठेवत मला बसवल.कपाटातून पिशव्या काढून त्यातून हिरव्या आणि दोन डिझाइन असलेल्या बांगड्या माझ्या हातात भरल्या. सिंदूरची डबी हातात दिली. मला आश्चर्य वाटल.तांदूळ,सुपारी हा दरवर्षीचा
वानोळा असतो पण बांगड्या?मी विचारल, "अग हे काय? बांगड्या कशासाठी?" तर मागे कधीतरी मी बोलतांना सांगितल होत की आमच्याकडे सासर माहेर कस असत, त्यांच्या चाली रिती कशा असतात. त्यात मुलगी माहेराहून परत जातांना आई तिला चोळी बांगडी शिवाय नाही पाठवत.
Read 4 tweets
Jun 9, 2021
वीर बिरसा मुंडा / बलिदान दिवस - 9 जून,1900. स्वतंत्रता संग्राम के दौरान भारतभूमि पर ऐसे कई नायक पैदा हुए जिन्होंने इतिहास में अपना नाम स्वर्णाक्षरों से लिखवाया.एक छोटी सी आवाज को नारा बनने में देर नहीं लगती बस दम उस आवाज को उठाने वाले में होना चाहिए और इसकी जीती जागती
मिसाल थे बिरसा मुंडा. बिरसा मुंडा ने बिहार और झारखंड के विकास और भारत के स्वतंत्रता आंदोलन में अहम रोल निभाया.

अपने कार्यों और आंदोलन की वजह से बिहार और झारखंड में लोग बिरसा मुंडा को भगवान की तरह पूजते हैं. बिरसा मुण्डा ने मुण्डा विद्रोह पारम्परिक भू-व्यवस्था के जमींदारी
व्यवस्था में बदलने के कारण किया. बिरसा मुण्डा ने अपनी सुधारवादी प्रक्रिया के तहत सामाजिक जीवन में एक आदर्श प्रस्तुत किया. उन्होंने नैतिक आचरण की शुद्धता, आत्म-सुधार और एकेश्‍वरवाद का उपदेश दिया. उन्होंने ब्रिटिश सत्ता के अस्तित्व को अस्वीकारते हुए अपने अनुयायियों को सरकार को
Read 11 tweets
Jun 1, 2021
बरेच लोक केनियाने पाठवलेल्या १२ टन धान्याची थट्टा करीत आहेत. केनियाला सोशल मीडियावर "भिकारी, गरीब देश" अशी तर भारताला त्यांनी मदत पाठवली म्हणून त्या आडून मोदींना नको नको ती दूषणे दिली जात आहेत.

आता केनियाबद्दल एक छोटीशी कथा ऐका..

तुम्ही अमेरिका, मॅनहॅटन, वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि
ओसामा बिन लादेन ही सर्व नावे ऐकली असतीलच. बहुतेक लोकांनी हे ऐकले नसेल, ते म्हणजे 'केनिया आणि टांझानियाच्या सीमेवर पडणारे 'इनोसाईन' गाव आणि येथील स्थानिक जमात म्हणजे

"मसाई"!

मसाई लोकांपर्यंत अमेरिकेवर झालेल्या ९/११च्या हल्ल्याची बातमी पोहोचायला कित्येक महिने लागले.तिथेच जवळच्या
गावात राहणारी आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेणारी विद्यार्थिनी किमेली नाओमा सुट्टीवर जेव्हा केनियाला परत आली तेव्हा तिने मसाईच्या स्थानिक जमातीला ९/११ च्या हल्ल्याविषयी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली घटना सांगितली तेव्हा ही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली.
Read 12 tweets
May 12, 2021
आज मुंबई हायकोर्टात काय झालं नक्की वाचा -

मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्ता : महाराष्ट्रातील ऑक्सिजनची स्थिती काय?

महाराष्ट्र सरकारचे वकील अ‍ॅड शिंदे : 11 मे रोजी 1700 मेट्रीक टन

मुख्य न्यायाधीश : आणि केंद्र सरकारने किती दिला?

अ‍ॅड.शिंदे : 1779 मेट्रीक टन
मुख्य न्यायाधीश : राज्य सरकारने दररोज 70 हजार रेमडेसिवीर पाहिजे अशी मागणी केली आहे, हा आकडा कुठून ठरविला. यात काहीतरी समन्वयाचा अभाव दिसतो.

अ‍ॅड.शिंदे : हा आकडा सक्रिय रूग्णांवर आधारित आहे.

मुख्य न्यायाधीश : आधी 50 हजारांची मागणी आणि नंतर 70 हजारांची आणि आता तर सक्रिय रूग्ण कमी
होत असताना तीच मागणी कशी?

(केंद्र सरकारच्या प्रतिज्ञापत्राप्रमाणे 21 एप्रिल ते 11 मे या काळात 8,01,000 रेमडेसिवीर महाराष्ट्राला मिळाल्या आणि 16 मे पर्यंत 11,57,000 असा कोटा रिवाईझ झाला.)

मुख्य न्यायाधीश : आमचा आदेश का पाळत नाही. पेशंटला रेमडेसिवीर आणायला का सांगितले जाते?
Read 7 tweets
Apr 17, 2021
शिवसैनिकांचे आजच्या सामना मधून प्रबोधन :
ज्या राज्यांत निवडणुका होत आहेत तेथून किमान 500 पट वेगाने कोरोनाचा प्रसार देशभरात झाला आहे.. पहिल्या लाटेला चीन जबाबदार 'असेल' (अजूनही हे यांना कन्फर्म नाही बरं का), पण दुसऱ्या लाटेला निवडणूक आयोग जबाबदार 'आहे'
(हे मात्र यांना कन्फर्म माहीत आहे)!- दै.सामना
आता,फॅक्ट-चेक :
जास्त लांब जायची गरज नाही. जिकडे निवडणुका आहेत, त्या पाच राज्यांतील कालचेच आकडे बघूया पश्चिम बंगाल :6901 (26 मृत्यू)
केरळ :10031 (21 मृत्यू)
पुद्दुचेरी :531 (3 मृत्यू)
तामिळनाडू :8449 (33 मृत्यू)
आसाम : 537 (4 मृत्यू)
टोटल : 26449 नवे रुग्ण ( 87 मृत्यू)

आणि, जिकडे निवडणुका नाहीत त्या महाराष्ट्रातले कालचे आकडे -
महाराष्ट्र :63729 नवे रुग्ण (398 मृत्यू)

म्हणजे -
★ ज्या राज्यांत निवडणुका होत आहेत त्यात आढळलेले रुग्ण आहेत 26449,जे निवडणुका नसलेल्या महाराष्ट्राच्या कालच्या 63729 नव्या केसेसच्या
Read 6 tweets
Jan 3, 2021
Forwarded message!!

नमस्कार , मी केदार जाधव, म्युनिक , जर्मनी येथे राहतो .

मी गोएथे इन्स्टिट्यूटमधून, जर्मन भाषेचे सर्वोत्तम मानले गेलेले आणि सर्वात कठीण असे C2 सर्टिफिकेशन पूर्ण केले आहे आणि जर्मन शिकवणे ही माझी पॅशन/आवड आहे .

गेली ४वर्षे मी जर्मन भाषा विनामूल्य शिकवत आहे
आणि आजपर्यंत ४४ बॅचेसमध्ये ११०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिकवले आहे. त्यातील अनेकांना विविध लेवल्सवर/पातळ्यांवर उत्तम यश मिळाले आहे.

ज्याला ज्याला जर्मन शिकायचे आहे त्याला ते विनामूल्य शिकता यावे हे माझे ध्येय आहे , आणि म्हणूनच मी मराठीतून जर्मन शिकवण्यासाठी Learn German
with Kedar Jadhav हे चॅनेल सुरू केले आहे .
खाली पहिल्या मराठी व्हिडिओची लिंक दिली आहे


आज जर्मन भाषा येत असणार्यांना अनेक संधी उपलब्ध आहेत , पण दुर्दैवाने भारतात चांगले जर्मन शिकणे खूप कठीण आहे . चांगल्या क्लासेसची फी प्रत्येक लेव्हलला हजारोंच्या घरात आहे
Read 7 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us!

:(