पबजी आणि युवाशक्ती

नमस्कार.
एक बातमी तुम्ही सर्वांनी ऐकली असेल की भारत सरकारने चीनचे ११८ अॅप बॅन केले, ज्यामध्ये पबजी अॅप देखील शामील आहे. पबजीचे सर्वात जास्त अॅक्टिव्ह युजर्स भारतात होते आणि आतापर्यंत २२००० करोडपेक्षा जास्त पैसे ह्या अॅपच्या मालकाने पबजीमधून कमावलेले आहेत.
याआधीही भारत सरकारने चीनचे ५९ अॅप बॅन केले होते, ज्यामध्ये टिकटॉक सारखा फेमस अॅप देखील शामील होता.

या बातमीवरून एक वैतागलेला पुणेकर म्हणतो, ‘अख्खा भारत चीनचे अॅप वापरतोय..! मग भारतातील पंधरा वीस कोटी आणि पुण्यातले पन्नास लाख जे सॉफ्टवेअर डेव्हलपर आहेत ते काय करताय? का यांचा
जन्म फक्त नुसता हिंजेवाडीला जाऊन वाकड ब्रिजला ट्रॅफिक जाम करायला झालाय?’ या माणसाचं बोलणं सर्वजण हसण्यावारी घेताहेत; परंतु खरंच हा विषय हसण्यावारी नेण्यासारखा आहे का? आपल्या देशात जगातील सर्वात जास्त इंजिनीअरर्स आहेत. जगातील सर्वात तरुण युवक आपल्या देशात आहेत त्यामुळे साहजिकच
सर्वात जास्त क्रिएटिव्हिटी आपल्या देशात हवी होती.परंतू तसे अजिबात दिसत नाही.आपला देश आणि आपण आपल्या पुर्वजांनी केलेल्या कामावरच आजही अभिमान बाळगण्यात धन्यता मानतो.जगात कुठेही काहिही घडले की म्हणायचे हे सर्व आमच्या पूर्वजांनी वेदांमध्ये लिहून ठेवलल आहे.इतिहासाबद्दल अभिमान जरूर
बाळगावा,तो असायलाच पाहिजे.पण आज आपण काय करतोय त्याच आत्मपरीक्षण झालच पाहिजे.या नविन जगात नुसत्या इतिहासाचा गर्व असून चालत नाही.गेल्या ४०ते ५० वर्षात आपण भारतीयांनी किती शोध लावले?ज्याचा जगावर परिणाम होईल.एकही नाही.हेच तर आपले पंतप्रधान आपल्या तरुणांना समजावत आहेत.आम्ही भलत्याच
विषयांमध्ये अडकून पडतोय.बर त्या गोष्टींच राजकारण काही उच्च विचारांनी करतोय का?तर नाही.नुसता जातीवाद,धर्मवाद बास.गलीच्छ भाषा आणि स्वार्थी विचार बास...ह्यामध्ये देशाचा विचार कुठे आहे?कट्टरते बरोबर त्याला अधुनिकतेची जोड हवीच.श्रध्देबरोबर प्रयत्नांची जोड हवीच.नेमके हिथेच आपला तरूण
मार खातो.लाँकडाऊन चा काळ ८५% पेक्षा जास्त युवकांनी टाइमपास करण्यात घालवला.स्वामी विवेकानंद, मा.एपीजे अब्दुल कलाम,स्वा.सावरकर याची चरित्र आणि विचार अंगीकारले असते तर ही वेळ नसती आली.युवक देशाची शक्ती आहे.भविष्य आहे.युवाशक्ती आपली सद्यघडीची आपली संपदा आहे.तीचा योग्य वापर झालाच
पाहिजे.ह्या सगळ्याला आपला पालकवर्ग ही जबाबदार आहेच.आपल्या महाराष्ट्रात जवळजवळ ५ कोटीपेक्षा जास्त लोकांनी ह्या टाळेबंदी मध्ये केक बनवायची रेसिपी बघितली किंवा बनवले.अजून काय काय बघितल असेल त्याची कल्पनाच न केलेली बरी.ह्यातल्या ५लाख पालकांनी सुध्दा मुलांमध्ये वेळ देऊन मुलांची
कल्पनाशक्ती वाढावी,स्किल्स डेव्हलप व्हावेत,नविन काहीतरी शिकावे यासाठी प्रयत्न केले नसतील.आपण फक्त शासनव्यवस्था,शिक्षणव्यवस्था यांना दोष देत राहिलो.आपली मुल फक्त मार्कांमध्ये अडकून पडली.देशात लाखो करोडो इंजिनिअर, साँफ्टवेअर डेव्हलपर असले तरी जगावर प्रभाव पाडू शकेल अशी
निर्माणक्षमता आपण तयार करु शकलो नाही.आणि हाच आपला खरा दोष आहे.नुसता युवादेश असून चालत नाही,तर जगाशी सामना करेल अश्या वस्तु तयार करणे,नविन टेक्नॉलॉजी तयार करणे,हे तरुणांनी करायचय.आपल्या देशाला आज अशा युवकांची जरूर आहे.पब्जी,टिकटाँक वर वेळ घालवणार्या युवकांची नाही.
जातीभेद,धर्मभेद,इतिहासातील महनीय व्यक्तिंबद्दल काहितरी अर्धवट ज्ञानाने अचरट वाद करणे.अत्यंत स्वार्थी नीच दर्जाच राजकारण करणे,ह्या सगळ्यात जीव घालण्या पेक्षा माझा देश,शहर,तालुका,गाव,पाडा कसा प्रगतीशील होईल,आत्मनिर्भर कसा होईल याकडे लक्ष द्या.समाजधुरीणांनी सुध्दा युवकांना
या गोष्टीकडे वळवले पाहिजे.तर आणि तरच स्वतःच आणि देशाच भवितव्य घडवता येईल.
संकल्पनाः प्रा.मिलींद नाईक,
ज्ञानप्रबोधिनी पुणे...
काही बदल माझे स्वतःचे आहेत.🙏🚩🙏🚩🙏

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with 🚩jay.anant.kal🚩मोदीजी का परिवार🚩

🚩jay.anant.kal🚩मोदीजी का परिवार🚩 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Jay_Kalki

Jan 29, 2023
**रोडच्या कडेनं जाणारं प्रत्येक गरीब जोडपं
भिकारी असतंच, असं काही नाही** ...
🙏

आज कोपरगाव येथून येत असताना रोड च्या कडेने एक म्हातारं जोडपं जाताना दिसलं माझी नेहमीची सवय असल्यामुळं मी त्या भिकारी दिसणाऱ्या जोडप्याला दुपार असल्यामुळं सहजच जेवणाचं विचारलं, तर ते 'नको' म्हणाले.
मग मी त्यांना 100 रुपये देऊ केले, तर ते सुद्धा नको म्हणाले , मग पुढचा प्रश्न विचारला की :तुम्ही असे का हिंडताय?'🤔
मग सुरू झाला त्यांचा जीवनपट -

ते 2200 km चा प्रवास करून आता द्वारकेला स्वतःच्या घरी परत चालले होते. त्यांनी सांगितले की माझे दोन्ही डोळे 1 वर्षांपूर्वी गेले होते
आणि डॉक्टरनी सांगितले की ऑपरेशन करून उपयोग नाही मग माझ्या आईने डॉक्टर ला भेटून ऑपरेशन करायला भाग पाडले व तिने श्री कृष्ण मंदिरात जाऊन देवाजवळ नवस केला की, 'डोळे परत आले तर माझा मुलगा पदयात्रा करत बालाजी व पंढरपूर ला जाऊन परत द्वारकेला पायी येईल',
म्हणून मी आईच्या शब्दासाठी
Read 9 tweets
Sep 1, 2022
🙏🚩१. मंत्रपुष्पांजली शब्दार्थ :-🕉️🚩🙏
मंत्रपुष्पांजली कुबेराला उद्देशून आहे. महाराष्ट्रात जास्त प्रचलित असलेली, आरती नंतर मंत्रपुष्पांजलीची प्रथा जाणीवपूर्वक आणली असावी.ही प्रथा कुणी, कशासाठी कधी सुरु केली हे प्रश्न अनुत्तरीच राहिले असले तरी, सर्वांसाठी सुशासित राज्याची .
प्रार्थना या मंत्रपुष्पांजलीतून व्यक्त होते. आपण मंत्रपुष्पांजलीची मूळ ऋचा आणि तिचा शब्दार्थ पहाण्याचा प्रयत्न करु..
मूळ ऋचा -
यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्| ते ह नाकं महिमान: सचंत यत्र पूर्वे साध्या: संति देवा:|
(ऋग्वेद मंडल १.ऋचा१६४)
ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने | नमो वयं वैश्रवणाय कुर्महे| स मे कामान्कामकामाय मह्यम्| कामेश्वरो वैश्रवणो ददातु| कुबेराय वैश्रवणाय | महाराजाय नम:|
(तैत्तरीय आरण्यक अनुवाक ३१मंत्र ६)
ॐ स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं माहाराज्यमाधिपत्यमयं
Read 8 tweets
Jul 29, 2021
"कस्तुरीमृग"

गुरुवार 22 तारखेपासून कोल्हापुरात पावसामुळे पाण्याची पातळी वाढू लागली. समस्त कोल्हापुरवासियांना चिंता वाटू लागली .आम्हीही त्यापैकी एक होतो . शुक्रवारी सकाळी आमच्या एका जवळच्या स्नेह्यांच्या घरी पुराचं पाणी यायला सुरुवात झाली. त्यामुळे त्यांचं
स्थलांतर करणं अत्यावश्यक होतं. ते होतंय न होतंय तोच दुपारी आमच्या घराच्या अलीकडे भरपूर पाणी आलं आणि आपल्या घराच्या खाली पाणी येणार याची खात्री झाली. लाईट गेले.. पाणीपुरवठा खंडीत झाला. त्याच वेळी आमच्याकडे फरशी पुसणारी 'कस्तुरी' कामाला आली होती .दुसरीकडे राहायला जाण्यासाठी सामान
भरण्याची आमची गडबड सुरू होती. कस्तुरी म्हणाली, "उद्या जर पुराचं पाणी फार वाढलं तर मी कामाला येणार नाही".
तिला म्हटलं.."अगं आम्हीच चाललोय दुसरीकडे रहायला!" आम्ही सगळे गडबडीने नातेवाईकांकडे राहायला गेलो.
काल दि.26 रोजी रात्री आमची 'घरवापसी' झाली. आज सकाळी आमचा नेहमीचा
Read 8 tweets
Jul 20, 2021
🙏🚩देवशयनी एकादशी🚩🙏🌹आषाढी/कार्तिकी पंढरपुर वारीच आपल्या भागवत धर्मातील स्थान, वारीमध्ये चालणार्या,भझन/अभंग गाऊन टाळ म्रुदूंग वाजवत विठ्ठलाशी एकरुपता साधणार्या वारकरी भक्तांची मनाची धारणा यावर छोटास ललित वाचनात आल...मला आवडल..म्हणून ईथे पाठवतोय🙏
🙏🚩वारीमधील रिंगण सोहळा🚩 🚩विठ्ठल!विठ्ठल!विठ्ठल!विठ्ठल🚩
समतेचा,जातीभेद रहित,भक्तिमय एकोप्याचा विठ्ठलनामाचा असा सोहळा अपूर्वच,हिच आमची खरी संस्कृती आपण जपलीच पाहिजे.।।🚩विठ्ठल!विठ्ठल!विठ्ठल!विठ्ठल🙏
Read 5 tweets
May 5, 2021
🚩हिंदु नो सावध रहा!!सतर्क रहा!!आचार विचारांनी आक्रमक व्हा🚩!मोदी 5 एक वर्षात सगळं सोडून निघून जातील. त्यांना मुलबाळ कोणी नाही. पैसे जमवणं हा हेतू नाही.
मोदींच्या पराभवामुळे आनन्द झालेल्या हिंदूंनी पुढचा विचार करायला हवा.
आज प बंगाल मध्ये अनेक भागांमधून हिंदू हाकलले गेले आहेत.
या पूर्वी कम्युनिस्ट राजवट होती त्यांनी एक एक करत उद्योग धंदे बंद केले. ममतानी फक्त मुसलमानांना जवळ करून हिंदूंचा छळ सुरु केला आहे. सुशिक्षित हिंदू बंगाल सोडून गेले आणि जात आहेत.
जे शिल्लक आहेत ते ममता च्या कार्यकर्त्यांच्या भितीनी मतदान करू शकत नाहीत. तिथून घुसणारे रोहिंग्या
काश्मीर पर्यंत पोचले आहेत.
मुसलमान एकजात बाहेर पडून मोदी विरोधी मतदान करतात.
हा मोदी विरोध नसतो तर हिंदू विरोध असतो.
पण हिंदू मात्र एकत्र न येता मोदी विरोध करत बसतात. या हिंदूंच्याच मोदी द्वेषामुळे आज मुस्लिम मस्तवाल होत आहेत.
मोगलांच्या काळातही हेच होत होत.
इतिहासापासून
Read 8 tweets
Sep 19, 2020
🚩🙏🚩हिंदुह्रदयसम्राट,मराठी ह्रदय सम्राट,मा.श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून काही प्रश्न विचारायची इच्छा होते.**************🚩🚩🚩

मा.बाळासाहेबांच्या शिवसेनेला झालय तरी काय?
सुशांत राजपूत प्रकरणात अख्खी सत्ता एवढ्या ताकदीने ते प्रकरण मिटवायला राबली की त्यात
कुणाची नावे आहेत ह्या प्रश्नालाच काही अर्थ उरला नाही.कारण भलतीच घाण जगासमोर आली.सुशांतची प्रतिमा काय होती?हा विषयच गौण ठरतो.कारण आता दिशा सालीयान प्रकरण सुध्दा पुढे आलय.या हत्या की आत्महत्या हे पुढे ठरेलच.पण तुम्ही अख्खी यंत्रणा राबवलीत आत्महत्या साबित करण्यासाठी.काय मिळाल?संशय.
कट्टर शिवसैनिक,जुना शिवसैनिक,धर्मवीर दिघेसाहेबांचा शिवसैनिक सुध्दा या पोरखेळाला वैतागलाय.मा.बाळासाहेबांनी ज्या कर्माला हिजडेगीरी म्हणून जाहिरपणे संबोधले,तेच कर्मकांड तुमच्या नेत्यांनी चालवले.राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विरोधात संघर्ष करत घडलेल्या शिवसैनिकांना त्याच पक्षाच्या
Read 8 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us!

:(