अभिजीत🚩🇮🇳 Profile picture
Sep 24, 2020 11 tweets 7 min read Read on X
तिरुपतीमधील श्री बालाजीच्या मूर्तीपेक्षाही सुंदर अन् विलोभनीय अशी जगातील सर्वात उंच #शारंगधर_बालाजी ची मूर्ती #विदर्भ तील मेहकर गावात विराजमान आहे. ११.२ फूट उंच फूट रुंद अन् अडीच फूट जाडी असलेल्या मूर्तीचे सौंदर्य तिच्या भव्यतेमुळे अधिकच खुलून दिसते. (१/१०)
या मूर्तीचा इतिहासही रंजक आहे. पुरातन काळातील ही मूर्ती अठराव्या शतकात गावकऱ्यांना खोदकाम सुरू असताना सापडली. इंग्रज अधिका-यांनी मूर्तीसह शिलालेख अन् दागिने ताब्यात घेतले. ही मूर्ती लंडनच्या संग्रहालयात हलवली जाणार होती, पण गावकऱ्यांनी प्राणांची बाजी लावत तिची (२/१०)
रातोरात प्राणप्रतिष्ठा करून टाकली. संतापलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांनी शिलालेख दागिने लंडनला नेले, पण मूर्ती मात्र ते नेऊ शकले नाहीत. तेव्हा इंग्रजांनी मेहकरच्या ६० गावकऱ्यांना महिने तुरुंगात डांबले होते. यात जानकीराम अप्पा पाठक, रामभाऊ पाटील, मा. ल. देशमुख, निंभा गोंधळी, (३/१०)
रामा कुणबी, विठ्ठल माळी आदींचा समावेश होता. #औरंगाबाद पासून १२५ किमी अंतरावर विदर्भात मेहकर हे गाव आहे. नागपूर-मुंबई महामार्गावर हे गाव असूनही जगाला या अदभुत मूर्तीसह मंदिराची माहितीच नाही. पैनगंगा नदीकाठी जुन्या लाकडी, परंतु अत्यंत रेखीव वाड्यात हे मंदिर आहे.मोठ्या काळ्या (४/१०)
पाषाणावर ही मूर्ती कोरलेली असून तिच्याभोवती प्रभावळ आहे. त्यावर विष्णूंचे १० अवतार चितारले आहेत. मूर्ती मध्ययुगीन आहे.
मूर्तीचा शोध लागण्यापूर्वी गाव #नृसिंह चे स्थान म्हणून ओळखले जात होते. लक्ष्मीनृसिंहाचे प्राचीन मंदिर आहे. ही मूर्तीदेखील एका भुयारात होती. १५व्या शतकात (५/१०)
ती गावकऱ्यांनी गावात आणली. त्यानंतर ३१९ वर्षांनी गावात शारंगधर बालाजीची मूर्ती सापडली.
१८८८ मध्ये पोलिस पाटील रामभाऊ भिते यांच्या गढीत खोदकाम करताना २० फूट लांब फूट रुंद लोखंडी पेटीत ही मूर्ती होती. मूर्तीवर चंदनाचा भुसा होता. सोबत दोन ताम्रपट होते. त्यावर मूर्तीचा इतिहास (६/१०)
लिहिलेला होता. तो दिवस होता नागदीपावलीचा. मार्गशीर्ष शुद्ध पंचमी, गोरज मुहूर्तावर डिसेंबर १८८८ ला मूर्ती सापडल्याने तोच दिवस गेल्या सव्वाशे वर्षांपासून प्रकटदिन म्हणून साजरा केला जातो.
🔸असा आहे शारंगधर बालाजी🔸

✔️रेखीव मूर्ती, छाती पोट गोमुखाकृती. (७/१०)
✔️मूर्ती चतुर्भुज असून हातात गदा, चक्र,पद्म आहे.
✔️पायाजवळ जय-विजय, लक्ष्मी-कुबेर भूदेवी.
✔️हातातील शस्त्रांत धनुष्य नाही, पण मूर्ती भोवती प्रभावळीत विष्णूंचे दहा अवतार कोरले आहेत
✔️डोक्यावर शारंग नावाची धनुष्य धारण केलेली विष्णूंची मूर्ती कोरली आहे म्हणून हा शारंगधर. (८/१०)
✔️ही मूर्ती आशिया खंडातील सर्वात मोठी श्री बालाजीची मूर्ती आहे. तसा उल्लेख बुलडाणा जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये आहे. तीर्थक्षेत्रांच्या यादीत या मंदिराचे नाव असले तरी याला अद्याप हवी तेवढी प्रसिद्धी मिळालेली नाही.

लेखक-संकलक माहीत नाही।

Source Whatsapp (९/१०)
जालन्यापासून वाशीम कडे जाणाऱ्या रस्त्यावर मेहकर आहे। ... आता समृद्धी महामार्ग पण मेहकर जवळुन जाणार आहे। मुकुटाच्या मध्यभागी धनुर्धारी श्रीराम मूर्ती आहे.. शारंगधर म्हणून नाव आहे। ही विशेष माहिती दिलेय श्री Uday Akolkar यांनी। (१०/१०) @RajeGhatge_M @GaneshGaitondeG @gajanan137

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with अभिजीत🚩🇮🇳

अभिजीत🚩🇮🇳 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Abhikapshikar

Oct 10, 2022
मित्रांनो हलाल या बद्दल आज थोडी माहिती घेऊ हलाल सर्टिफिकेट ही संकल्पना HSBC बँकेचे CEO ह्यांच्या डोक्यातून आली, सुरवातीला मास या पुरती मर्यादित होती, म्हणजे काय? तर कोंबडी, बकरा कापणारे हे मुस्लिमच हवे, त्यांनी त्या प्राण्याला एका झटक्यात न मारता श्वसन व अन्ननलिका चीर देऊन..👇
कापावी, रक्त येऊन द्यावे मग तडफडत प्राण्याला ठेवावे म्हणजे ते चिकन, मटण हलाल होते अशी ह्यांची धारणा आहे, ह्या धंद्यांत #हिंदू_खाटीक समाज मोठ्या प्रमाणात आहे, पण हलाल सुरू झाल्याने कापणार मुस्लिम पाहिजे या अट्टहासा मुळे हा हिंदू खाटीक समाज बेरोजगार झाला. हे इतक्यावरच थांबले नाही👇
तर यांनी इतर व्यवसायात पण हलाल सर्टिफिकेट ची सक्ती करण्यास सुरुवात केली आहे, म्हणजे सौदर्यप्रसाधने, औषधे, कपडे असे बरेच...
आता हे सर्टिफिकेट ना राज्यसरकार देते, ना केंद्रसरकार देते,
तर काही मुस्लिम संघटना
₹60 हजारात व्यवसायिकांना देशात आणि देशाबाहेर मुस्लिम देशात प्रॉडक्ट 👇
Read 9 tweets
Sep 16, 2020
भारताला सतत शिव्या घालणाऱ्या भारतातील सर्व डुकरांना 🐖 समर्पित.

एक माणूस त्याच्याकडे असलेल्या डुकरा सकट एका बोटीतून जात होता.
त्या बोटीत इतर प्रवाशांबरोबरच, एक तत्त्वचिंतकही प्रवास करत होता. डुकराने आधी कधीच बोटीतून प्रवास केला नसल्याने ते अस्वस्थ होतं. सारखं वर-खाली जात होतं. +
त्याचा सगळ्यांनाच त्रास होत होता.
नावाड्याला भीती वाटत होती की या सगळ्या गोंधळामुळे बोट बुडेल की काय. जर डुक्कर शांत झालं नाही तर बोट बुडायची. ज्याचं ते डुक्कर होतं तो माणूसही अस्वस्थ होता, पण काही करू शकत नव्हता.
तत्त्वचिंतक हे सगळं निरखीत होता. त्याने मदत करायचं ठरवलं. +
तो त्या माणसाला म्हणाला, "तुमची परवानगी असेल, तर मी या डुकराला एकदम गरीब मांजरी सारखं बनवू शकतो".
त्या माणसानं लागेच "हो" म्हटलं.
मग त्या तत्त्वचिंतकाने दोन सहप्रवाशांच्या मदतीने डुकराला उचललं आणि पाण्यात फेकलं

डुक्कर जीवाच्या आकांताने ओरडायला लागलं आणि पोहायला लागलं. +
Read 6 tweets
Sep 9, 2020
तहानभुकेने अगदी व्याकुळ घामाने चिंब झालेले तुम्ही बऱ्यापैकी सावली असलेलं झाड शोधून आसपास कुठे पाणी मिळतय का हे बघताय तेवढ्यात समोरच्या बिल्डिंग मधल्या खिडकीत उभ्या असलेल्या व्यक्तीकडे तुमचं लक्ष जात आणि ती व्यक्ती तुम्हाला पाणी हवंय का विचारते
त्या क्षणी तुम्हाला काय वाटेल? +
त्या व्यक्तीबद्दल तुमचं मत काय होईल ?!
ती व्यक्ती मग खिडकी बंद करून तुम्हाला बिल्डिंगच्या खाली यायचा इशारा करते , तुम्ही लगबगीने तिथे जाता पण नंतरची 15 मिनटं तिथे कोणीही येत नाही !
आता तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल काय वाटेल? हे तुमचं दुसरं मत असणार आहे थोड्यावेळाने ती व्यक्ती +
तिथे येते आणि म्हणते "सॉरी मला जरा उशीर झाला पण तुमची अवस्था बघून मी तुम्हाला नुसत्याच पाण्याऐवजी लिंबू पाणी आणलं आहे !"
आता तुमचं त्या व्यक्तीबद्दल मत काय आहे ?
तुम्ही एक घोट सरबत घेता आणि तुमच्या लक्षात येत की अरे ह्यात साखर अजीबातच नाहीये ! +
Read 6 tweets
Sep 7, 2020
#कापूर #Thred
कापूराबद्दल माहिती ही माझी स्वयंसंकलीत माहिती असून हा माझा शोधप्रबंध आहे.

तर सुरू करूयात कापूराच्या इतिहासापासून...
कापूर म्हणजे नेमकं काय? कुठुन येतो कापुर?

अजूनही 60-70% लोकांना माहीतच नाही की कापूर हा झाडाला येतो. हा डिंक ही असतो आणि बाष्पीभवन प्रक्रियेतून +
सुद्धा मिळवता येतो. जो डिंक प्रकार असतो तो बाष्पीभवनाचा प्रक्रियेपेक्षा कमी शुद्ध असतो.
कापूर मूलतः आशिया खंडातली वनस्पती आहे जी भारतासह जपान, चीन, जावा,सुमात्रा बेटे आणि इंडोनेशिया इथे मुबलक प्रमाणात मिळतअसे. भारत हा कापूराचा उद्गाता म्हणुन ओळखला जातो. वैद्यगुरु धन्वंतरी आणि +
ऋषी चरकांनी सर्वप्रथम कापूर हा औषधींमध्ये वापरला आणि नंतर तो घरोघरी त्याचा वापर सुरु झाला.
आज आपल्याला कापुर भारतात आढळत का नाही? त्याचे मुख्य कारण आहे परकीय आक्रमणे आणि सोबतच त्यांनी आणलेले शोभेची झाडे जशी गुलमोहर आणि निलगिरी (हे दोन्ही झाडे दलदलीच्या प्रदेशातली आणि ह्यांचा +
Read 21 tweets
Jun 16, 2020
आज पेपर मधे चीनी आणी इतर देशातील कंपन्या #मॅग्नेटिक_महाराष्ट्र 2.0 मधे हजारो कोटींची गुंतवणूक करणार आहे, आणि दुसरी बातमी की भारत चीन सीमेवर चीन कडून गोळीबार यात एक अधिकारी आणि दोन जवान #हुतात्मा झाले. मग अश्या देशा बरोबर आर्थिक व्यवहार करून त्यांचे खिशे भरायचे आणि मग तोच पैसा +क Image
चीन आपल्या जवानांना मारण्यासाठी उपयोगात आणणार. सध्या कोरोना वरून जगाचे लक्ष हटवण्या साठी पण चीन ही आगळीक करत असेल, मग आपणच आपल्या सैन्याला मारण्या साठी चीनी कंपनीना भारतात कशाला बोलवायचे, हा देश किती धूर्त आणि सीमा विस्तारवादी आहे हे जगाला माहीत आहे. नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश +
पाकिस्तान, भूतान अश्या देशांना कधी आर्थिक मदत देऊन अगर धमकावून भारता विरुद्ध त्यांचा वापर करून घेत आहे. आज भारत अमेरिकेच्या आणि इतर देशांच्या जास्त जवळ आला आहे त्यामुळे पण चीन ची जळफळाट होत आहे. त्यामुळे यापुढे किती आर्थिक संबंध असल्या देशाशी ठेवायचे हे ठरवण्याची वेळ आली आहे +
Read 5 tweets
Jun 5, 2020
#WorldEnvironmentDay खरतर निसर्ग प्रत्येकाला त्याच्या गरजेच्या वस्तू फुकट देत असतो ऑक्सिजन,हवा,पाणी,सूर्यप्रकाश आणि आपण कशा प्रकारे परत करतो तर जंगलतोड,प्रदूषण प्राण्यांची हत्या,जलप्रदूषण,ओझोन थर कमी होत आहे तापमानवाढ, प्लॅस्टिक आणि रसायनांचा अनिर्बंध वापर..+ #विश्वपर्यावरणदिवस Image
माणूस आपल्या स्वार्थासाठी करत आहे पण त्यामुळे त्याचा परिणाम म्हणजे मोठे हिमनग वितळत आहे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत आहे परिणाम जमिन समुद्र गिळंकृत आहे, जलचर कायमचे नष्ट होत आहे, शेतजमीन रासायनिक खतांच्या मुळे नापीक बनत आहे, जंगले तोडत असल्याने त्यावर अवलंबून असलेले पशुपक्षी +
यांचापण नाश होत आहे, प्लॅस्टिक नष्ट करणे ही तर मोठी डोकेदुखी झाली आहे पृथ्वी वर सगळी कडे नष्ट न झालेले प्लॅस्टिक आढळते, जलचर,पशूपक्षी नकळत हे खातात आणि मग मनुष्य मासे, चिकन, दूध यांचे सेवन करतात आणि ते त्यांच्या पोटात जातात मग नवीन रोग निर्माण होतात. निसर्ग हया सर्व गोष्टींची +
Read 5 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us!

:(