थ्रेड.....
गेले ७-८ महिने घरी , कामधंदा काही नाही.. कोरोनाने जीवे मारला असता तर बरं झालं असतं, पण या बेरोजगारी ने इतकं मारलंय की बस्स जखम झालीय पण दाखवता ही येत नाही अन इलाज पण करता येत नाहीये...अकाउंट मधले पैसे वाळवी लागल्यासारखे खर्च झाले .. कधी घरच्या बांधकामाला तर ....१👇
कधी ऐन उन्हाळ्यात मेच्या महिन्यांत अन कोरोना काळात झालेल्या टायफॉईड च्या आजाराच्या ट्रीटमेंट साठी... अन हा सगळा पैसा क्रेडिट कार्डच्या पेमेंटचा होता.. इकडे पैसा राहिना ,तिकडे जॉब लागेना..सगळीकडे धावाधाव केली मिळेल तिथे काम काम करायची हिम्मत दाखवली , कितीही पैशात कसलंही काम..२👇
पण काम मिळालं नाही.. शेवटी ठरवलं अन भाजीपाला विकायचा ठरवला... गावाजवळच्या गावातून घ्यायचा ठरला , पडत्या पावसात जाऊन ठरवला, जाताना पाऊस येताना पाऊस.. पण शेवटी पोट भरण्यासाठी काहीही करायचं ठरवलं होतं.. झालं सगळं ठरलं.. दुसऱ्या दिवशी गाडीला किक मारली अन निघालो ..३👇
भाजी घ्यायला , पण घोटाळा झाला ,ज्या माणसाकडून भाजी घ्यायची तोच माणूस नेमका त्याच दिवशी बाहरेगावी निघून गेला ..मग आता आपणच भाजी काढायची अन बांधून विकायची असं ठरवलं.. काढली भाजी घेतली गाडीवर निघालो थेट शहरात..पहिल्यांदा हा अनुभव घेत होतो.. कोणी माझ्याकडे बघत तरी नाही ना ??..४👇
असं लपतछपत गेलो भाजी मंडई च्या ठिकाणी.. असं जाण्याचं कारण म्हणजे माझं शिक्षण काय मी करतोय काय हे कुणाला कळू नये म्हणून.. झालं अजून कुणी आलं नव्हतं , सगळ्यांच बस्तान , भाजीपाला, फळभाज्या कॅरेट मधून काढत होते ..माझी काय कोथिंबीर ची भाजी होती.. मी आपला फेरफटका मारला..५👇
अन बाजारभाव बघितला अन ठरवलं की आपण कोथिंबीर ची जुडी १० ला एक अन १५ ला दोन असं विकायचं.. लोकांची लगबग सुरू झाली, जसजसा दिवस मावळू लागला तसतसा लोकं येऊ लागले..मनात भीती होतीच की कुणी आपल्याला बघत तर नाही ना?? शेवटी गावातले दोघचौघे दिसले पण त्यांना मी मुद्दाम दुर्लक्ष केलं..६👇
शेवटी व्हायचं तेच झालं, मला त्यातला अनुभव नाही म्हणून की मंडईत भाजीपाला भरपूर की अजून काही कारणांमुळे माझ्या अवघ्या दोनच पेंड्या विकल्या गेल्या.हताश झालो , तोवर ७ वाजल्या होत्या ,आता उरलेली भाजी काय करायची म्हणून विचार केला, अन घेतली गाडी अन फेरीवाले जसे फिरतात तसा फिरफिरलो.७👇
कशीबशी २५ -३० पेंडी विकली, अन उरलेल्या गावाकडे घेऊन निघालो.. सगळी भाजी विकू शकलो नाही याचं दुःख नव्हतं पण घेतलेल्या भावातंच विकावी लागली याचं दुःख मनाला लागलं.. bc😖😣 इनमीन १००-१५० रुपये हातात पडले अन पेट्रोल च तर वेगळंच.. म्हणजे पहिलाच धंदा बुडीत निघाला..आता मेन क्लायमॅक्स.८👇
तर पुढे आहे..ज्यांच्याकडून भाजी घेतली त्यांना पैसे कुठे दिलेत त्यादिवशी पाऊस न उशीर म्हणून जमलं नाही.. अन आज त्यांचा फोन आला की आमचे पैसे द्या , मी म्हंटल किती , ते म्हणाले ५०० रुपये..😣कारण भाव ठरवताना मी नीट ऐकलं नाही की त्यांनी नीट सांगितलं नाही..९👇