ट्युशनच्या एका कार्यक्रमात त्याची आणि माझी नजरानजर झालेली,
पण त्याची बॅच माहीत नव्हती,
तो माझ्याच ट्युशनला आहे इतकं मात्र पक्कं ठाऊक होतं,
जेव्हा जेव्हा मी ट्युशनला यायचे तेव्हा तेव्हा माझी नजर फक्त त्याला शोधायची,
हळूहळू समजलं की तो माझ्यापेक्षा एक वर्ग पुढच्या वर्गात होता,
१/११
आमच्या दोघांच्या बॅच ची वेळ एकसारखीच होती.
साडे ९ ते साडे ११.💞
बॅच झाल्यावर मी त्याच्या वर्गात टिफिन खायला जायचे फक्त त्याच्याकडे बघता यावं म्हणून..
त्याच्या बॅचमधल्या मुलींसोबत खास मैत्री करून घेतली होती त्या माझ्याच शाळेत असल्यामुळे फार वेळही लागला नाही,
२/११
येताना जाताना मुद्दाम त्याच्या वर्गाकडे बघत जाणं,
जेवायला बसल्यावर त्याने पाणी पिलं की माझं पण लगेच पाणी पिणं एव्हाना माझ्या जवळच्या मैत्रिणीच्या पण ते लक्षात आलेलं.
इतकंच काय तर त्याचा घड्याळाच्या शेपचा डबा होता म्हणून मी सुद्धा खास भांडीबाजारात जाऊन सेम टू सेम डबा आणलेला😅
३/११
ट्युशनमधून शाळेत जाताना मस्त त्याच्या सायकलच्या मागे पुढे घुटमळत रहाणं त्याच्या मित्रांना सुद्धा लक्षात आलं होतं,
माझ्या दप्तरावर नॉडीच चित्र होत म्हणून ते मला आणि त्याला नॉडी म्हणायला लागले , चिडवायला लागले.😅
मला तर जॅम भारी वाटायचं.
तो पण गोड हसायचा.☺️
४/११
मग माझ्या काळजात अजून गुदगुल्या व्हायच्या.
त्याची एक वही पूर्ण नव्हती म्हणून क्लास अडमिनिस्ट्रेशनने त्याच्या वडिलांना बोलवून घेतलं होतं ,
एव्हाना त्याने डबा पण खाल्ला नव्हता मी त्याला शोधत गेले तर काका आणि तो सरांच्या केबिनमध्ये दिसले,
तो खूपच रडवेला झाला होता.
५/११
बाहेर आल्यावर सगळे निघून गेलेले असतांना मी एकटी त्याची वाट बघत थांबले होते.
काका पण निघाले अर्थात त्याला बजावूनच.
खूप हिम्मत करुन बोलायचा प्रयत्न करत होते पण माझ्या तोंडातून शब्द फुटोस्तोवर तो सायकल काढून शाळेत निघून गेला,
मी ही शाळेत गेले तो दिवस जरा नाराजच गेला..😢
६/११
दुसऱ्या दिवशी परत फ्रेश मूडमध्ये ट्युशनला.😍
परत ते लपूनछपून बघणं काहीच न बोलताही खूप काही बोलणं.
एका रविवारी मी परीक्षेला ज्या हॉलमध्ये होते त्याच हॉलमध्ये तो सुद्धा आला.
मला तर जाम आनंद झालेला आणि त्याची भिरभिरणारी नजर जेव्हा माझ्यावर स्थिरावली तेव्हा तर अजूनच भारी वाटलं☺️
७/११
योगायोगाने तो माझ्याच बेंचवर बसायला आला.
तो एक इयत्ता पुढे असल्यामुळे सुपरवायझरने पण बसू दिले..😅
त्याला हातानेच ऑल द बेस्ट केलं.
त्याने पण एक गोड स्माईल देऊन मला 👍🏼 केलं.
माझ्या आयुष्यातले ते सुंदर २ तास होते.☺️
वेडा होता तो पेन ठेवायला पाऊच वापरायचा..😂🙈
८/११
ज्याला बघायला मी माझ्या मैत्रिणी सोडून त्याच्या वर्गातल्या मुलींसोबत मैत्री केली तोच माझ्या बाजूला बसलाय ह्याचा आनंद माझ्या चेहऱ्यावर ठळकपणे दिसत होता.
मध्येच त्याने मला एक चॉकलेट दिलं त्या चॉकलेटचा कागद मी खूप वर्ष जपून ठेवला.
९/११
बघता बघता शाळा संपली आणि कॉलेजमध्ये ऍडमिशन सुरु झाले होते..
त्या नंतर तो कुठेच दिसला नाही ,
कोणत्या कॉलेजला गेला हे पण समजलं नाही.😢
त्याच्या वर्गमैत्रीणींकडे मित्रांकडे खूप चौकशी केली परंतु हाती निराशाच...
१०/११
अजून पण कधी कधी सोशल मीडियावर त्याच नाव टाकून शोधते ढिगाने प्रोफाइल येतात पण त्यात तो नसतो ,
असतात ते त्याच्याच नावाचे दुसरे लोकं.
हरवलाच तो...!!!
कायमचा.....😢
११/११ #मंजिरी #काल्पनिक
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh