#औषधीवनस्पती रूईचे मी यापुर्वीच छायाचित्रे व थोडक्यात माहितीसह पोष्ट केलेली आहे परंतु येथे तज्ञ लेखकाची सविस्तर माहिती आपले माहितीसाठी रूईचे दोन प्रकार
1)calotropis procera 2) calotropis gigantea
टिप-tag व धागा बनवन्याचा प्रयोग व वनस्पतीची सविस्तर माहिती देण्यासाठी
भविष्यात संकटकाळामध्ये आयूर्वेदीक औषधांचा प्रचंड तुटवडा असेल. त्यामुळे आताच औषधी वनस्पतींची लागवड करून ठेवायला पाहीजे. औषधी वनस्पतींची लागवड केल्यानंतर वापरण्यासारख्या होईस्तोर भरपूर वेळ लागतो.त्यामुळे #औषधीवनस्पती ची लागवड आताच करावी लागेल(१)
१. धागे बनवन्यासाठी उपयोग
‘रुईच्या झाडाच्या सालीचे तंतू काढून त्याचे दोर बनवतात. झाडे कापून आणून त्यांना १ – २ वेळा ऊन द्यावे. असे केल्याने त्यांच्यावरील हिरवी साल सहज सोलून काढता येते. ती साल ठेचून स्वच्छ धुवावी. असे केल्याने ती पांढरी होते. नंतर तिचे बारीक बारीक धागे (3)
नंतर तिचे बारीक बारीक धागे मोकळे करावेत. हेच याचे सूत. या सुताचे दोर पाण्यात लवकर कुजत नाहीत. त्यामुळे मासे धरण्याच्या गळासाठी हे सूत वापरतात.(4) #औषधीवनस्पती
कागद
रुईच्या सालीच्या आतील भागाचा कागद बनवण्यासाठी उपयोग करतात.
कापूस
रुईच्या झाडाला येणार्या बोंडांतून रेशमासारखा मऊ कापूस निघतो. ‘रुईचा कापूस सावरीच्या (एक प्रकारचे झाड) कापसापेक्षाही थंड असतो’, असे म्हणतात.
रंग
रुईच्या झाडाच्या चिकाचा कातडे रंगवण्यासाठी उपयोग करतात.
गोंद
रुईचा चीक उकळून घट्ट केल्यास गोंदाप्रमाणे एक चिकट पदार्थ बनतो. या चिकाचा रबर बनवण्यासाठी उपयोग होऊ शकतो.
आतषबाजीची दारू
रुईच्या झाडाच्या लाकडाचा कोळसा हलका असल्यामुळे आतषबाजीची दारू बनवण्यासाठी त्याचा उपयोग होतो.
खत
रूईचा झाडांचे व पानांचे खत वाळवीचा नाश करणारे आहे
काही औषधी उपयोग
अ.वेदना: रुईच्या पानाला तेल, तूप किंवा एरंडेल लाउन (दुखर्या भागावर) शेक धावा
आ.कान ठणकणे:रुईच्या पानाचा १ थेंब रस कानात घालावा.
संदर्भ:-व्यवहारउपयोगी वनस्पती वर्णन(भाग १)
लेखक:-गणेश रंगनाथ दिघे वर्ष १९१३ (7)
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh