आपल्याकडे शिक्षण ही एक लक्झरी होती. त्याची लक्षणं आपल्याला मिथके, पुराणे इत्यादिमधून दिसत राहतात. म्हणजे कर्णाला जातीमुळे नाकारणारे परशुराम असोत किंवा एकलव्याला न लाभलेले द्रोणाचार्य असोत... आपल्याकडची अमुक गोष्ट दुसऱ्याने शिकू नये याची इतकी काळजी लागलेली असे की देवाची स्तोत्रे
लिहिताना देखील "हे अपात्राला शिकवेल तो नरकात सडेल" वगैरे त्यात सांगून ठेवलेलं असे !! त्यात मग गुरूने शाप दिला तर शिकलेलं डोज्यातून नाहीसं होतं वगैरे कथा आल्या... मग त्यात पुढे आम्ही कसे गुरूच्या घरी पाणी भरू, पाय चेपू म्हणणारे कलाकारही आले.
खरंतर खरं शिक्षण ते असतं जे शिकवणाऱ्याला शिव्या दिल्या तरी तुमच्याजवळ कायम राहतं! कृतज्ञ असणे हा शिकलेलं लक्षात राहण्याशी असंबंधित विषय आहे. गुरू गुरू करून आपल्याकडे शिक्षणाचे पुरोहित डोक्यावर घेतले गेले. याच कारणासाठी गुरुचे नांव घेताना कानाला हात वगैरे लावणाऱ्या लोकांबद्दल मला
विलक्षण घृणा आहे. आपण गुरू गुरू करून पायावर डोकी घासत राहताना समाजाला अनिष्ट अशा एका शैक्षणिक पुरोहितशाहीला ग्लॅमर देत आहोत हे गुरुभक्तीने अंध मंडळींना कळत नाही. पण गुरुभक्ती प्रचलित असल्याने तसं न वागणाऱ्यांना उद्धट, कृतघ्न वगैरे समजले जाते. मात्र तसे असले तरी अयोग्य आहे म्हणून
अशा पुरोहितशाहीला लाथ मारणे हे बुद्धिवाद्यांचे नैतिक कर्तव्य आहे. म्हणूनच...
फुलेंना अजून एक गुरू करून टाकू नका. फुलेंनी शिक्षण नाकारणाऱ्या व्यवस्थेला आव्हान देण्याचं क्रांतिकारक काम केलं. त्यांचा वारसा चालवायचा असेल तर
त्यांच्या फोटोला हारतुरे घालत न राहता आजच्या काळातील गुरूशाहीला लाथा मारायचा सक्रीय वसा घ्यायला हवा !
ही काही लोकांची आजच्या शिक्षणाला नांवं ठेवायची नेहमीची पद्धत आहे. "आमच्या काळी फार कमी लोकच शिकायचे, त्यामुळे कसा दर्जा टिकून होता" हा अक्षरशः जातीय प्रिविलेजचा छुपा गौरव आहे! बाजारीकरण म्हणजे ?
गुरूच्या घरी पाणी भर, पाय चेप मग गुरू मनाला येईल तेव्हा शिकवेल अशी बकवास गुरुकुल पद्धत हवी आहे का ?
बाजारीकरण व्हायलाच हवं! कारण वाहतूक व्यवस्थेचं बाजारीकरण झालं की- माझ्या सोवळ्याला या "इतर" माणसाचा स्पर्श होईल, म्हणून याला
माझ्या बाजूला बसू देऊ नका असं म्हणणाऱ्यांना गाडीतून हाकललं जातं! बाजारीकरण झालं नाही की पुरोहित पोसले जातात. शिक्षण ही एक सेवा आहे. हेल्थकेअर, वाहतूक, स्वच्छता या सेवांसारखी. तिला "पवित्र" मानून गुरू नांवाचे पुरोहित तयार करायचे आणि
इथे यांनी सगळ्या अर्थव्यवस्थेची लावून ठेवली आहे, स्वायत्त संस्थांना नख लावायचे प्रयत्न जोमात आहेत, गरिबांच्या घरावर बुलडोझर चालवायचा माज सुरू आहे, खुनशीपणाने विरोधकांना जेलमध्ये सडवलं जातं, घटनेतल्या महत्त्वाच्या तरतुदींना शास्त्रशुद्ध बांबू लावण्यात येत आहे, बेशरमपण घोडेबाजार हा
चाणक्यनीती म्हणून खपवला जातोय, इलेक्टोरल बॉण्ड नांवाचं गौडबंगाल कोणत्याही पारदर्शकतेच्या आडकाठीशिवाय सुरू आहे, पीएमकेअर्स नांवाचा सरकारी अलिबाबाच्या गुहेचा प्रकार माहिती अधिकाराला दाद देईना झालाय, निरपराध महिलांना आणि मुलींना सरेआम बलात्काराच्या धमक्या देणाऱ्या बंडलबाज बुवाला
सरकारी वकील ऑन रेकॉर्ड आदरणीय धार्मिक गुरू म्हणतात, फॅक्ट चेक करणारे ऑरवेलला घाम फुटेल अशा केस तयार करून कोठडीत फेकले जाताहेत, न्यायव्यवस्था हे सगळं थांबवायचं सोडून आलिशान सभागृहांत होणाऱ्या कॉन्फरन्समध्ये लेक्चरे झोडण्यात गर्क आहे, मीडिया निर्लज्जपणे हे सगळं डोक्यावर घेऊन
श्रीलंकेच्या सध्याच्या दुरावस्थेची महत्त्वाची पार्श्वभूमी लक्षात घेणं गरजेचं आहे!
२०१९मध्ये सध्या पळून गेलेला राष्ट्राध्यक्ष, गोटाभया राजपक्षे हा सेंद्रिय शेतीची क्रांती करू अशा घोषणा देऊन निवडून आला. २०२१च्या एप्रिलमध्ये त्याने रासायनिक खते आणि कीटकनाशके यांच्यावर
देशव्यापी बंदी आणली, आयातही बंद केली. त्या देशातल्या २० लाख शेतऱ्यांना आता तुम्ही सेंद्रिय शेतीच करायची असं फर्मान काढलं!
याचा परिणाम म्हणून श्रीलंकेतलं भाताचं उत्पादन पहिल्या सहा महिन्यांतच २०% कमी झालं. भातशेतीबाबत स्वयंपूर्ण असलेला देश भात बाहेरून आयात करायला अगतिक झाला.
देशातल्या भाताच्या किंमती अचानक ५०% वगैरे वाढल्या. या बंदीने देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी महत्त्वाचं पीक असलेल्या चहाचीही वाताहत करून टाकली. त्यामुळे श्रीलंकन चलन कोसळू लागले. यानंतर सरकारने माघार घेऊन
तर झालं असं की वायनाडमध्ये राहुल गांधीच्या कार्यालयावर SFI या डाव्या संघटनेच्या युवकांनी हल्ला केला. तिथे तोडफोड वगैरे झाली. त्यांनंतर राहुल गांधी तिथे गेले, नंतर पत्रकारांना म्हणाले झालेली घटना दुर्दैवी आहे, अशा हिंसेने समस्या सुटत नाहीत,
तरी ज्यांनी हे केलं ती वयाने लहान मुलं आहेत, त्यामुळे ते जरी बेजबाबदार वागले असले तरी मला त्यांच्याविषयी काही राग नाही. आता इथे एक गोष्ट आठवण करून द्यावीशी वाटते, जावडेकरांनी दिशा रवी या मुलीवर तिने त्यांना पर्यावरणसंबंधित बाबतीत ईमेल केले म्हणून म्हणून केसेस भरल्या होत्या
आणि तिला दिल्ली पोलिसांकरवी जेलमध्ये डांबलं होतं. राहुल गांधी इथे त्यांचं ऑफिस फोडणाऱ्या मुलांना लहान मुलं आहेत, जाऊ द्या म्हणत आहेत.
पण राहुल गांधींना कसंही करून व्हीलन म्हणून दाखवायला टपलेल्या पाळीव मीडिया चॅनेल झी न्यूजने त्यांचं विधान हे उदयपूर घट घटनेतील
पियुष गोयलसाहेब म्हणताहेत की भारत लवकरच ३ वरून ३० ट्रीलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था होईल! हे त्यांनी एका
आता ३चे ३० व्हायला वार्षिक वाढीचा दर अगदी १०% धरला तरी साधारण २४ वर्ष हवीत. आता २४ वर्षे म्हणजे जवळपास आमची हयात झाली, हा कालखंड गोयलसाहेबांना "लवकरच" या मुदतीत बसवावासा वाटतो
हे फारच अचंबित करणारं प्रकरण आहे!
पण गोयलसाहेबांना ही असली मानवी गणिताची बंधने फारच तुच्छ वाटत असावीत कारण ते स्वतःच म्हणून गेले आहेत की आईनस्टाईनला गुरुत्वाकर्षण शोधायला हे असलं गणित कामी आलंच नाही!!!
महाराष्ट्रात नुकताच हिंदुत्वाचा अजून एक व्हेरिअंट आढळून आला आहे. काळ्या दाढीचा! याआधी महाराष्ट्रात पांढऱ्या दाढीचा वरदहस्त असलेले, पुरणपोळीतूप वाले हिंदुत्व जोमात होतेच. त्या गब्रू, हसतमुख हिंदूत्वाने संघर्षताईंच्या हिंदुत्वाचा काटा काढून स्वतःचं मार्केट मजबूत केलं.
तर या गोड्या हिंदुत्वाला डच्चू देऊन पुरणपोळीऐवजी वडापाव खाणारं तिखट हिंदुत्व सत्तेत गेलं. पण नंतर यथावकाश त्या हिंदुत्वाला "रिक्षाची चाकं तीन" या न्यायाने आपल्यामध्ये शाफुआंवादाचं म्युटेशन करून घ्यावं लागलं! तर हे सहन न झाल्यामुळे काळ्या दाढीने यल्गार करून पुरणपोळीवाल्या
गोड्या हिंदुत्वाबरोबरच वडापाव बरा दिसतो असं सांगत आपलं गोडतिखट चवीचं नवीन हिंदुत्व लाँच केल्याचं दिसत आहे.
हे हिंदुत्व म्हणजे एखाद्या शाकाहारी सज्जनास तुम्ही शाकाहारी म्हणजे नक्की काय असं विचारल्यावर जशी विविधतेने भरपूर उत्तरे मिळायची शक्यता असते, त्यातला प्रकार बनला आहे...