10 जानेवारी 1760. मकर संक्रांत. दिल्ली च्या संरक्षणासाठी दत्ताजी शिंदे यमुनेच्या उतार अडवून उभे होते. संक्रांत साजरी होताना अफगाणी सैन्य बुराडि घाट येथे यमुना ओलांडू लागले. त्यांची वाटचाल पाहून दत्ताजी स्वतः सैन्यानिशी त्यांना मागे ढकलू लागले, आणि यात त्यांना यश मिळू लागले 1/n
..जसे दत्ताजी पुढे सरकू लागले, एका बंदुकीच्या गोळीने त्यांना डोळ्यात जखम झाली, जनकोजीना हातावर गोळी लागली. नदी पात्रात जखमी दत्ताजीना कुतुब शाह रोहिलाने हिणवले, 'आता कसे लढाई कराल?'. दत्ताजीनी उत्तर दिले, 'बचेंगे तो और भी लडेंगे'. कुतुब शाह ने दत्ताजी यांचा शिरच्छेद केला.. 2/n
... दिल्लीच्या रक्षणार्थ दत्ताजीनी बुराडी ला आपला प्राण दिला. यातून पानिपत मोहीम उभी राहिली. या खुनाचा प्रतिशोध सदाशिवराव भाऊ यानी ऑक्टोबर 1760 मध्ये कुंजपुरा येथे कुतुब शाहचा शिरच्छेद करून घेतला... 3/3 #Hindvi#Swarajya#JaiBhawani @VasundharaBJP
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh