Jackfruit Special Variety 🪴
Vietnam Super Early ✌🏻
पूर्ण महत्व समजून घ्या -
Vietnam Super Early ह्या व्हरायटी ची लागवड केल्या नंतर १८ व्या महिन्यात ते २ वर्ष ह्या कालावधी मध्ये फळ धारणा सुरु होते.
ह्या व्हरायटी च महत्व असं आहे की सर्वसाधारण फणस लागवड करायची असेल तर एकरी १०० (१)
झाडांची लागवड होते पण ह्या व्हरायटी ची एकरी ४०० झाडांची लागवड करू शकतो.
२ वर्षानंतर प्रत्येक झाडाला किमान १० फळ धरतात आणि प्रत्येकाचं वजन किमान ५ किलो रहता म्हणजे दुसऱ्या वर्षापासूनच प्रत्येक झाडाला ५० किलो उत्पन्न भेटू शकेल.
जस झाड मोठं होत जाईल तस त्याची फळ धारणा वाढत जाते (२)
आणि उत्पन्न त्या पटीने वाढत जाते.
फणसाच्या बाकीच्या व्हरायटीचं किमान १०० वर्ष किमान आयुष्य असत पण ह्या व्हरायटीचं १५ ते २० वर्ष राहत, ह्याची वयो मर्यादा संपली कि पुन्हा फेर लागवड करायची आणि पुन्हा १८ महिन्या पासून उत्पन्न घ्यायला सुरवात करायची.
विदर्भात मुळात फणस पिक्का खायची (३)
सवय नाही, सर्व लोक भाजी म्हणूनच फणस खातात आणि हि व्हरायटी विदर्भासाठी आणि कोकणासाठी उत्कृष्ट आहे आणि इतर भागासाठी भाजी म्हणून किंवा पिक्का फणस म्हणून वापर करू शकतो.
येत्या काळात ह्या व्हरायटी ची लागवड फार मोठ्या प्रमाणावर होणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लागवड (४)