#स्वातंत्र्य म्हणजे काय ?
कर्नाटकातील कोंबरु अभयारण्याशेजारचे जे रेस्टहाऊस आहे तिथली गेल्या आठवड्यातील घटना आहे.एक बिबट्या त्याचं सहजभक्ष्य असलेल्या कुत्र्याचा पाठलाग करत छलांग लगावत होता.कुत्रा टॉयलेटला असलेल्या एका झरोक्यातून आत घुसला,बाहेरून टॉयलेट चा दरवाजा बंद होता.(१/४)👇
कुत्रा आत घुसला तसा बिबट्याही त्याच्या मागे घुसला आणि त्या टॉयलेटमध्ये अडकून पडला.कुत्रा बिबट्याला घाबरून एका कोपर्यात जाऊन बसला.भुंकण्याचीही त्याची हिम्मत झाली नाही. बिबट्या भुकेला असूनही त्याने त्या कुत्र्याला फाडले नाही, एका झेपेतच तो त्या कुत्र्याची चटणी करून आपले डिनर (२/४)
करू शकला असता पण ते दोन प्राणी एकेका कोपऱ्यात तब्बल बारा तास होते तरीही बिबट्याने कुत्र्याला कोणतीही इजा केली नाही.वनविभागाने गुंगीच्या गनने बिबट्याला जेरबंद केला.आता प्रश्न असा आहे की भुकेल्या बिबट्याने सहजशक्य असताना त्या कुत्र्याला का फाडले नाही? तर वन्यजीव अभ्यासकांनी (३/४)
असं उत्तर दिलं की वन्यजीव आपल्या स्वातंत्र्याविषयी अत्यंत संवेदनशील असतात.आपलं स्वातंत्र्य हिरावून घेतल्याची जाणीव होताच ते अत्यंत खोल दुःखात जाऊ शकतात,ते इतकं की त्यांची भूकेलाही विसरू शकतात.तिथे पोट भागवण्याची नैसर्गिक प्रेरणा मावळू लागते,इतकं मोठं पारतंत्र्यातचं दुःख आहे.४/४
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
मासे हे जीभेच चोचले पुरवण्यासोबतच
शरीराला आवश्यक असलेल्या अनेक पोषक घटकांचा स्त्रोत आहेत. माशांपासून विविध खाद्यपदार्थ बनवताना तेल आणि
मसाल्यांचा कमी प्रमाणात वापर केला तर प्रथिने, लोह, कॅल्शियम या पोषक घटकांचा मुबलक पुरवठा होऊ शकतो.(१/१६)
👇
#बोंबील:
बोंबील हा मासे प्रेमींचा आणि पोषक घटकांनी भरपूर असा मासा आहे. बोंबलामध्ये ओमेगा ३ फॅटी ऍसिड, प्रथिने,कॅल्शियम,लोह,जीवनसत्त्वे हे घटक असतात. शिवाय चरबीचे प्रमाण चांगले असते.इतर माशांच्या तुलनेत या माशात लोहाचे प्रमाण अधिक असल्याने ऍनेमिया असणाऱ्या (२/१६)
👇
व्यक्तींना खूप उपयोगी आहे.रक्तदाब नियंत्रणात ठेवणे,नखे, केस आणि त्वचा यांच्या आवश्यक असलेले घटक बोंबलांमध्ये भरपूर प्रमाणात असतात.
#कोळंबी: कोळंबीत तंतूमय घटक,
प्रथिने,ओमेगा ३ फॅटी अॅसिड,जीवनसत्व B,Bफाॅस्परस व काॅपर
(३/१६)
👇