होळी रे होळी पुरणाची पोळी..!! #आठवणीतली_होळी
शिमग्याचा महिना म्हणून गावाकडे फाल्गुनाला ओळखले जाते, शेतीतली संपलेली कामे त्यामुळे कोकणात आणि मावळे भागात हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो !! #आओ_होली_ऐसेमनाएं#HappyHoli
होळीच्या अगोदर आठ ते दहा दिवसांपासून अगोदर गाव शिवारात उन्मळून पडलेली झाडं बैलं जुपून माणसं ठरलेल्या होळीच्या माळावर जमा करायची, त्यातही चढाओढ, ताकदीने आणि युक्तीने जो सर्वात मोठे लाकूड आणेल त्याची वाहवा व्हायची !!
होळीच्या दिवशी दुपारी सर्व जण जमून होम रचायला सुरुवात, त्याची रचना अशी कि होळी पेटवल्या नंतर ती साधारण नदीच्या बाजूला कलली पाहिजे आणि आतापर्यंत तसेच होत आलंय !!
होमाला नारळाची तोरणं, सोयरीच्या फुलांची माळ, हार आणि एरंडाची फांदी लावल्यावर मुकादम,पाटील किंवा गावप्रमुख होम पेटवतात, सगळी सभोवती होऊन "होळी रे होळी पुरणाची पोळी", फोदे हबब, तोडावर हात मारून शिमगा करायचा, शहरात जसे गणपतीत तसे गावाकडे शिमग्यात हेवेदावे काढण्याची पध्दत!!
होळीला पूरणपोळीचा नैवेद्य दाखवून आग बाहेर जाऊन नये म्हणून कडेने गोल तीन वेढे मारून पाणी शिंपडायचे, पेटत्या होळीतून नारळ काढणे ही एक वेगळीच कला !!
पुरणपोळी,गुळवणी, कटाची आमटी, कुरडया, पापड्या, खारावडेवर यथेच्छ ताव मारला कि पुन्हा रात्री होळीच्या भोवती ढोल लेझमीचा खेळ रात्री पर्यंत चालायचा, नंतर होळीची गाणी, मर्दानी खेळ, ताईत उचलणे, गजा खो-खो, कबड्डी, कसदार आणि पिळदार देहयष्टीचा पुरेपूर वापर
दुसऱ्या दिवशी धुलीवंदन, परत ढोल लेझीम, कुस्त्त्या आणि छबिना, माती आणि पाण्याने एकमेकांना लाऊन धुळवड साजरी करायची
होळी आणि धुळवड या दिवशी कोणी हि पायात चप्पल घालायची नाही आणि पुरूषांच्या डोक्यावर टोपी नसेल तर नारळाचा दंड..!!
धुळवडीला मंदिरात एकत्र जमून अड अडचणी, हेवेदावे यावर चर्चा , मार्ग काढले जायचे,अनेक वर्षांपासून फंडांची परंपरा चालू आहेत. गावकीचा ताळेबंद, ज्यांच्या घरात लग्नकार्य वगैरे आहेत त्यांना पैसे द्यायचे, त्यांच्या कार्यात गावाचाही हातभार, गावकर्यांच्या अर्थिक गरजा पुर्ण करण्याचा प्रयत्न.
नंतर होळीत भाजलेले नारळ आणि गुळ एकत्र करून चुरण बनवायचे तो प्रसाद खाऊन समारोप...
कालाच्या ओघात उत्सवातला उत्साह कमी झालाय, पण प्रथा परंपरा तशाच चालू आहेत, बघुयात दुनिया गोल आहे, तेच दिवस होळीला पुन्हा येवोत या अपेक्षा 🙏
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh