तुका मारुनी टाकला...
नाही वैकुंठासी गेला.....
अगं पोळ्या काय करत बसली. तुकोबा निघाले वैकुंठाला. चल चल लवकर." शेजारची बाई आवलीला सांगायला येते. चुलीवरची पोळी आणि हातातलं लाटणं टाकून आवली तशीच धावत निघते. तोवर तुकोबा गरुडाच्या पाठीवरल्या अंबारीत बसले असतात. "आम्ही जातो आमुच्या गावा
.. आमचा रामराम घ्यावा" असं तुकोबा गाऊ लागताच समोर जमलेले शेकडो भक्तजन 'पांडुरंग हरी'च्या तालावर नाचू लागतात.

आवली धावत पळत तिथवर पोहोचते, पण तोवर तुकोबांना घेऊन तो महाकाय गरुड आसमंतात झेपावतो.1936 साली रिलीज झालेल्या 'संत तुकाराम' या ब्लॅक अँड व्हाईट सिनेमातील हे शेवटचं दृश्य
अनेकांच्या मनावर कोरलं गेलं असेल. तुकाराम महाराज पुष्पक विमानात बसून सदेह वैकुंठी गेले, असंच आपण आजवर ऐकत आलो आहोत.

पण संत तुकाराम खरंच सदेह वैकुंठाला गेले का? हा प्रश्न गेली चार शतकं महाराष्ट्रात दबक्या आवाजात विचारला जातोय. त्यावर जाहीरपणे सहसा बोललं जात नाही
जुन्या सिनेमात रंगवलेले साधे, भोळे तुकाराम वास्तवात तसेच होते का? लेखक आणि विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे लिहितात, 'तुकारामांच्या बहुतेक चरित्रकारांनी आपल्यापुढे उभी केलेली त्यांची प्रतिमा त्यांच्या मूळ व्यक्तित्वाशी सुसंगत नाही
डॉ. साळुंखेंनी 'विद्रोही तुकाराम' हे चरित्र लिहिलं आहे.
'तुकाराम म्हणजे दिवाळे निघाल्यामुळे असहाय होऊन ईश्वराच्या भक्तीकडे वळलेला, नीटपणे संसार करू न शकलेला, सदैव टाळ कुटत बसलेला, व्यवहारशून्य, भोळाभाबडा किंबहुना भोळसट संत, असे काहीसे त्यांचे चित्र अनेकदा आपल्यासमोर उभे करण्यात आले आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, येथील समाजमनावर
प्रभाव गाजवत असलेल्या एका उद्दाम, अहंकारी आणि धर्माच्या नावावर अनीतीचा बाजार मांडणाऱ्या धर्मसत्तेला कडे आव्हान देणारा हा संत म्हणजे एक महान लढवय्या होता.'

अनेक चरित्रकारांनी सिंहाचे चित्रण शेळीच्या स्वरूपात केल्याचं साळुंखे सांगतात.
तुकारामांच्या व्यक्तिमत्त्वाची जहाल बाजू सांगताना साळुंखे लिहितात, 'तुकारामांनी आपल्या धारदार वाणीने अत्यंत तिखट आघात ज्यांच्यावर केले, ते कोणी सामान्य लोक नव्हते. या तथाकथित पूज्य लोकांचे वर्तन ढोंगीपणाने भ्रष्ट झालेले असल्यामुळे तुकाराम त्यांच्या व्यक्तित्वावरील धार्मिकतेचा
बुरखा टरकावून टाकत असत.
अर्थ न समजता नुसते पाठांतर करणारे वैदिक पंडित ओझे वाहणाऱ्या घोड्या-गाढवापेक्षा हीन असल्याचे ते सांगत.'या सर्व कारणांमुळे समाजातल्या प्रतिष्ठित, प्रस्थापित आणि धार्मिक अधिष्ठान घेऊन वावरणाऱ्या लोकांच्या मनात तुकारामांविषयी विषारी रसायन तयार झालं होतं,
असं साळुंखे यांनी लिहिलं आहे.

वेदाचा तो अर्थ आम्हांसीच ठावा। येरांनी वाहावा भार माथां।
वेद आणि पंडितांबद्दल तुकोबांनी हा अभंग रचला आणि वेदांवरील पारंपरिक मक्तेदारीला आव्हान दिलं. पुढे जाऊन वेदाचा अर्थ कळण्याचा अधिकार इतर जातीतील लोकांना, तसंच सर्व स्तरांतील स्त्रियांनाही आहे असं
बजावलं.

सकळ शास्त्रांचे सार। हें वेदांचे गव्हर।

पाहतां विचार। हाचि करिती पुराणें।।

ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र। चांडाळांही अधिकार।

बाळें नारीनर। आदिकरोनि वेश्याही।।
पुढे साळुंखे लिहितात की हे विचार तत्कालीन समाजात रुचणारे नव्हते म्हणूनच त्यांचा छळ होत होता. 'हे लोक कोलीत लावून माझा घात करतील असे तुकाराम म्हणतात, याचा अर्थ त्यांना भावी घटनांची चाहूल लागली होती असाच होतो. शस्त्रधारी माणसाने माझ्या देहाचे शेकडो तुकडे केले तरी मी भिणार नाही,
माझी मान कापली तरी मी वेगळे काही करणार नाही, अशा आशयाची विधाने तुकाराम वारंवार करतात.'

आ. ह. साळुंखेंनी तुकारामांच्या हत्येची शक्यता वर्तवताना मनुस्मृतीचा दाखला दिला आहे. 'तुकारामांच्या हत्येचा स्पष्टपणे आदेश देऊ शकणारे मनुस्मृतीचे काही नियम आपण नजरेखालून घालूया:
'ब्राम्हणाला नावे ठेवली असता शूद्राचा वध करावा, शूद्राने आपल्या दारुण वाणीने द्विजांची निंदा केली असता त्याची जीभ छाटावी. कारण तो जन्माने हीन असतो....' ज्यांच्या हातात धर्मशास्त्रे होती, त्यांनी भारताच्या इतिहासात या नियमांची अंमलबजावणी अनेकदा केली आहे.'
'विद्रोही तुकाराम' या पुस्तकात तुकारामांच्या मृत्यूबद्दलच्या प्रकरणाचा मथळाच 'धुळवडीच्या रात्री तुकारामांची धुळवड केली' असा आहे.
संत तुकारामांच्या शिष्या संत बहिणाबाई यांनी तुकोबांबद्दल लिखाण केलं आहे. देहूमध्ये मंबाजी गोसावी, तुकाराम आणि त्यांच्या अनुयायांचा कसा द्वेष करत होते,
याविषयी संत बहिणाबाईंनी लिहिलं आहे.

तुम्हांसी वाळीस ब्राह्मणाचे पंक्तिं । तुम्ही गुरुभक्ती नका सांगूं ॥

बहिणी म्हणें ऐसें मंबाजी बोलिला । द्वेषही मांडिला तेच क्षणीं ॥

लेखक आणि विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी धर्म आणि भक्तिसंप्रदायावर तीन ग्रंथ लिहिले आहेत.
जगभरातल्या अनेक संतांमध्ये तुकाराम हे सर्वश्रेष्ठ संत असल्याचं कसबे म्हणतात.

"तुकारामांचा मृत्यू नेमका कसा झाला हे कोणालाच सांगता आलेलं नाही. उपलब्ध साधनसामुग्रीवरून मंबाजी गोसावी त्यांना छळत होता, हे उघड आहे. तसंच तुकारामांचं लेखन संपवण्याचं काम काही शक्ती काम करत होत्या.
जोपर्यंत त्यांच्या मृत्यूचं गूढ उलगडत नाही तोपर्यंत तुकारामांची हत्याच झाली असं माझं मत आहे."

डॉ. कसबे यांनी सुदाम सावरकर यांच्या पुस्तकाचा संदर्भही दिला आहे. सुदाम सावरकर हे संत तुकडोजी महाराजांचे शिष्य. या पुस्तकात तुकारामांची हत्याच झाली असा दावा आहे.
"ते हळूहळू अदृश्य झाले म्हणजे नेमकं काय झालं, कसं झालं... असे प्रश्न वाचकांच्या मनात आहेतच. लोकांनी विचार करायला हवा. सुदाम सावरकराचं म्हणणं लोकांच्या पचनी पडत नाही म्हणून चमत्कारिक कथा रचल्या जातात."

संत चळवळ शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रियांची चळवळ होती.
व्यवस्थेविरुद्ध केलेला विद्रोह होता. नामदेवांच्या परंपरेपासून ही सगळ्या जातींचा समावेश असणारी चळवळ सुरू झाली होती. तुकारामांनी यावर कळस चळवला होता. ईश्वराची निर्मिती माणसाने केली आहे, असं म्हणणारे तुकाराम पुढे असंही म्हणतात की माझ्यासाठी देव मेला आहे.
हे सगळं त्यावेळच्या ब्राम्हणी धर्माच्या विरुद्ध होतं," असं मत डॉ. कसबे व्यक्त करतात.

सत्य आम्हा मनी, नव्हे गबाळाचे धनी ।

देतो तीक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावयासी बरे ।।

तुका मारुनी टाकला...
नाही वैकुंठासी गेला...
आज जगदगुरु तुकाराम महाराज यांचा
स्मृतीदीन अर्थात तुकाराम बीज, तुकाराम
महाराजांच्या पवित्र स्मृतींना आणि
विचारांना विनम्र अभिवादन...🙏

संकलक : रितेश मंगला रमेश देशमुख

संदर्भ : विविध बातमी पत्रात आलेले लेख आणि संत तुकाराम महाराज यांच्या वरील पुस्तके जसे विद्रोही तुकाराम..

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with मी शेतकरी Vishal Chichmalkar

मी शेतकरी Vishal Chichmalkar Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!