आज संबंध भारतात भयाण परिस्थिती आहे. RTPCR टेस्ट केली तर रिपोर्ट यायला ४८ तासाहून अधिक वेळ लागतोय. रिपोर्ट +ve आला आणि ऍडमिट होण्याची वेळ आली तर बेड मिळत नाहीये, बेड मिळाला तर injection मिळत नाहीये, ऑक्सिजन नाही ventilator नाही, स्मशानभूमीत रांगा लागल्या आहेत
(१/n)
मृत व्यक्तीच्या नशिबी शेवटचे संस्कारही नीट नशिबी नाहीत. एवढी सगळी अंदाधुंदी माजली असताना आपले आली बाबा अर्थात पंप्र आणि त्यांची टोळी काय दिवे लावत आहेत? राहुल गांधींनी येणाऱ्या त्सुनामीचा अंदाज घेऊन यांना वैद्यकीय सुविधा वाढवायचा सल्ला दिला तर यांनी त्यांची टिंगळ केली (२/n)
पीएम केयर्सचे खाते चालू करून हजारो कोटींचा गल्ला जमा केला, या रकमेतून ज्या कंपन्यांना व्हेंटिलेटर बनवायचे कंत्राट दिले त्यांच्या कडून आजतागायत एकही व्हेंटिलेटर मिळालेले नाही. केंद्र सरकारने तर सप्टेंबर महिन्या पासून राज्यांना पीपीई किट देण्याचे देखील बंद केले आहे. (३/n)
दैनंदिन रित्या आढळणाऱ्या कोव्हीड रुग्णांच्या यादी मध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. आज भारतात २लाख१७ हजार रुग्ण आढळलेत त्यातील ६२हजार महाराष्ट्रातील आहे. भारताच्या एकूण लोकसंख्ये पैकी १०% लोकसंख्या एकट्या महाराष्ट्राची आहे. आमचं राज्य संवेदनशील आहे. (४/n)
पहिल्या दिवसापासून एकूणची एक आकडेवारी महाराष्ट्राने प्रामाणिक पणे जाहीर केली आहे. आज शेजारील राज्यांत हीच आकडेवारी लपवली जात आहे. गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश इथली अवस्था तर कल्पने पलीकडे आहे. गेल्या १३-१४ महिन्याहून अधिक काळा पासून आरोग्य यंत्रणा प्रचंड तणावाखाली आहे (५/n)
याचे भान आपण सर्वांनी राखले पाहिजे. संध्याकाळी ७ वा रिकाम्या थाळ्या वाजवा, दिवे लावा असे इव्हेंट करून करोना जाणार नव्हताच. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शिवभोजन थाळी पुढील महिनाभरासाठी मोफत केली आहे, याचा लाभ आज रुग्णांनाचे नातेवाईक, हातावर पोट असलेले गरीब लोक घेत आहेत (६/n)
रिक्षा चालक, हातगाडी वाले यांचे ह्या काळात नुकसान होणार आहे हे ओळखून ₹१५०० यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. १५ लाखांच्या जुमल्यापेक्षा हे १५००₹ अधिक मोलाचे आहेत. एवढी विदारक परिस्थिती असताना पंप्र वेगळ्याच दुनियेत आहेत. (७/n)
१८ वय वर्षां पुढील सर्वांचे सरसकट लसीकरण करण्याचे सोडून यांनी पोरखेळ लावला आहे. प्रत्येक गोष्टीत उत्सव आणि इव्हेंट यांना अधिक प्रिय आहे. अनेक घरात आज २-२ सदस्यांचे मृत्यू झालेत पण यांना त्या बद्दल काहीही शोक नाही, यांना मौत का सौदागर म्हणतात ते काय खोटं नाही. (८/८)
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh