आज एक पोस्ट करतोय. पण पोस्ट विचार करायला लावणारी आहे. सध्या कोरोनामुळे सगळीकडे जो गदारोळ उठलाय त्यावर हि पोस्ट आहे. सध्या लोकं वैद्यकीय क्षेत्रावर चारही बाजूंनी टीका करत आहेत. इथे ट्विटरवरसुद्धा वैद्यकीय क्षेत्रातील लोक आहेत. त्यांना समर्पित आहे हि पोस्ट वाचा आणि विचार करा.(१/१६)
गेल्या वर्षी डाॅक्टरांवर फुलं उधळणं-टाळ्या वाजवणं वगैरे भंपक प्रकार झाले तेव्हाच आजचा दिवस उगवेल असा अंदाज होता यावर #गोष्टछोटीडोंगराएवढी ही पोस्टही लिहिली होती.. कोरोनायोद्धा-कोविड वाॅरियर-देव भरपूर चावाचावी चालली होती..मलाही अनेकांनी प्रमाणपत्रं पाठवली होती(२/१६)
‘मानवी स्वभाव’ माहित असल्यानं जी मी क्षणात डिलिट केली होती.. आज या दुसऱ्या लाटेमुळं वातावरण भयंकर तणावपूर्ण आहे.. सर्वसामान्य लोकं प्रचंड आणि जेन्युईन अडचणीत आहेत त्यामुळं त्यांचा सगळा राग वैद्यकिय क्षेत्रावर निघतोय.. ‘व्हायरल’ झालेले एकेक व्हिडिओ बघतो...(३/१६)
तेव्हा मला तर नेमकं ‘काय बोलावं?’ असा प्रश्न पडतो..
एका प्रचंड भावनिक व्हिडिओत एक मुलगा संतप्त स्वरात हाॅस्पिटलनं ॲडव्हान्स मागितला म्हणून टाहो फोडतोय..
गळ्यातली ‘सोन्याची चेन’ मोडली तेव्हा कुठं आईवर खरे उपचार सुरू झाल्याची खंत जेव्हा तो व्यक्त करतो तेव्हा अनेक जण हळहळतात..(४/१६)
नैसर्गिक आहे..’अरे पण भावा तुझ्या आईवर उपचार करावेत यासाठी डाॅक्टरनं ऑक्सिजनसाठी लाखो रुपयांची पायपिंग करत स्वत:ला सोन्याची चेन केली नाहीये-डाॅक्टरच्या आईनं आपला मुलगा डाॅक्टर व्हावा म्हणून आपली चेन मोडलीये यांचं काय?(५/१६)
चेनसारख्या चैनीसाठी तुझ्याकडं पैसे आहेत पण ऐनवेळी आजारी पडलं तर त्यासाठी पैश्याचं नियोजन नाही याला डाॅक्टर काय करेल? तुझा खर्च डाॅक्टरनं त्याच्या खिश्यातून कसा आणि का बरं करावा? कुठेतरी हा हि विचार लोकांनी करणं गरजेचं आहे.(६/१६)
दुसऱ्या एका व्हिडिओत ‘बायको पाॅजिटिव आली पण एकाच खोलीचं घर असल्यानं इसमाला ॲम्ब्यूलन्स येईपर्यंत लहान मुलीसोबत घराबाहेर बसावं लागल्याची शोकांतिका’ आहे.. हि गोष्ट खेदाचीच आहे पण यापुढेही जाऊन विचार करायला हवा. तो कधी करणार आहेत लोकं का फक्त वैद्यकिय क्षेत्राला दोष द्यायचा??(७/१६)
त्याची व्यथा बघून सद्गतित व्हायला होतं पण ‘काका फक्त एक खोली असतांना तुम्ही कुटूंब वाढवायचं नियोजन केलंत तर ते अडचणीत आल्यावर त्यांची जबाबदारी थेट सरकारची कशी? तुम्ही एकटेच आहात का? वैयक्तिक नियोजन नावाचा प्रकार काही असतो की नाही?(८/१६)
तिसऱ्या व्हिडिओत अत्यंत दुर्दैवीपणं ओटू कमी झाल्यानं हाॅस्पिटलच्या पायऱ्यांवर एक तरुण माणसाचा झालेला मृत्यू असं अतिशय दुर्दैवी दृश्य दिसतंय..
यावर डाॅक्टरांचं निलंबन करावं-हत्येचा गुन्हा नोंदवावा प्रतिक्रिया आल्यात पण रुग्णाची ही अवस्था एका दिवसात झाली का?(९/१६)
ओटू चाळीस येईपर्यंत घरी बसणं आत्महत्येचा प्रयत्न नाही का? कुठून आणतात माहित नाही पण काही सुशिक्षित मंडळीही थेट फक्त ५%डाॅक्टर चांगलेत अशी आकडेवारी जाहिर करतात..
मित्रांनो कुठलीही यंत्रणा ही काही ‘एक पेशा किंवा काही लोकं’ मिळून बनत नसते तर एकुणच समाजाचा ती एक भाग असते..(१०/१६)
यंत्रणेत भ्रष्टाचार नाही असं नाही पण तो केवळ ‘आरसा’ आहे.. यंत्रणेत भ्रष्टाचार वाढायला अधिकारी जेवढे जबाबदार आहेत पण लोकंही तितकीच जबाबदार आहेत.
१) इंजेक्शन घेऊन ‘पैसे नाही आणलेत’ म्हणून हात वर करून निघून जाणाऱ्यांमुळं जुजबी पैसे भरून केस पेपरची कल्पना उदयास आली..(११/१६)
२) सलाईन लावून ‘फरकच पडला नाही’ म्हणत उलटा कांगावा करत निघून जाणाऱ्यांमुळं ‘बाहेरून औषधं घेऊन या’ ही पद्धती रुजली..
३) ॲडमिट होऊन बरे होत राजकीय दबाव आणून बिलात भाजीपाल्यासारखी ‘बार्गेनिंग’ करणाऱ्यांमुळं ॲडव्हान्स घेणं सुरू झालं..(१२/१६)
पडून जखमी झालेल्या मुलाला शेजाऱ्यांसोबत पाठवून टाके मारून घेत नंतर ‘तुम्हाला हा उद्योग कुणी सांगितला डाॅक्टर?’ अशी उलटतपासणी करत रोजचं ड्रेसिंगही फुकट करून घेतात काही लोकं..
डाॅक्टरला चुना लावण्याच्या एकेक ‘निंजा टेक्निक’ ऐकल्या तर तुम्हाला भोवळ येईल..(१३/१६)
दुकानांचे माॅल्स झालेत,थिएटर्सचे मल्टिप्लेक्स झालेत,तसेच काॅर्पोरेट हाॅस्पिटल्सही उदयास आलेत त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर बघता ‘वरकडमुल्याची निर्मिती ही शोषणातून होत असते’ हे न कळण्याइतका हा समाज दुधखुळा आहे का? you have to pay when you want it(१४/१६)
जे ठोक व्यवसाय करतायेत ते यापैकी कश्यावरही काही एक बोलणार नाहीत आणि स्वत:ला डिफेंडही करणार नाहीत ‘विपदामें अवसर’हा प्रधानसेवकांचा मंत्र पाळण्यात ते व्यस्त आहेत पण सरसकट बदनामी होतेय-समाजमाध्यमांपासून वृत्तवाहिन्यांपर्यंत फार एकतर्फी चर्चा सुरू आहेत म्हणून हा प्रपंच..(१५/१६)
जर तयारीच नव्हती तर एवढे दिवस लसीसंदर्भात गोंधळ घातलाच का?? लस नाही, केंद्र सरकार मदत करत नाही. अशा बातम्या पसरवुन काय मिळालं?? बरं राज्याचे आणि जगातले सर्वात चांगले मुख्यमंत्री जे जागतिक आरोग्य संघटनेला मार्गदर्शन करतात त्यांनीच चार दिवसांपूर्वी श्रेय घेतलं कि...
.... १८ वर्षांवरील नागरीकांचं लसीकरण लवकर व्हावं, या संदर्भात.. म्हणजे तुम्ही फक्त बोलणार आहात. करायचं काहीच नाही तुम्हाला, फक्त वाऱ्यावरच्या वराती सांगणार तुम्ही. अजुन किती भोगायचं महाराष्ट्राने तुमच्या अहंकारापोटी 😣😣😣😥😥😥🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️
अनिल देशमुख- सर्कल पुर्ण!
- १०५ घरी बसवले..
- हिंदु साधुंना ठेचणाऱ्या लोकांना जामीन होऊ दिले..
- पेंग्विन म्हटलं म्हणुन डझनभर गुन्हे दाखल केले..
- अनंतराव करमुसेंना अपहरण करून जित्या ने बंगल्यावर मारहाण केली..
- सुशांत केस दाबली..
- समित ठक्करला उचलला..
- अर्णबला उचलला..(१/३)
-कंगनाचं घर तोडलं..
- सोमैय्यांच्या मुलावर गुन्हा दाखल केला...
- शरजिल उस्मानीला मोकाट सोडलं..
- खंडण्या उकळल्या..
- पोलिस वापरून जिलेटीन कांड्या ठेवल्या (ज्या नको तिथे घुसल्या ते वेगळं 😎)
आणि...
हे सगळं आपला वयोवृद्ध नेता जगात भारी आहे,... (२/३)
तो कुणालाही मॅनेज करू शकतो ही अंधश्रद्धा बाळगुन केलं की जे होतं त्याला "अनिल देशमुख" होणं म्हणतात!
आज देशमुखांचं वर्तुळ पुर्ण झालं! याचा अर्थ सरकार पडेल असं नाही पण यावरून एक म्हण आठवली... "Those who live by the sword, die by the Sword!" #CP (३/३)
#गुलामांपेक्षा_गुरं_जनावरं_श्रेष्ठ ?
स्वातंत्र्य म्हणजे काय??
कर्नाटकातील कोंबरु अभयारण्याशेजारचे जे रेस्टहाऊस आहे तिथली गेल्या आठवड्यातील घटना आहे.
एक बिबट्या त्याचं सहजभक्ष्य असलेल्या कुत्र्याचा पाठलाग करत छलांग लगावत होता.(१/७)
कुत्रा टॉयलेट ला असलेल्या एका झरोक्यातून आत घुसला, बाहेरून टॉयलेटचा दरवाजा बंद होता. कुत्रा आत घुसला तसा बिबट्याही त्याच्या मागे घुसला आणि त्या टॉयलेटमध्ये अडकून पडला. कुत्रा बिबट्याला घाबरून एका कोपर्यात जाऊन बसला. भुंकण्याचीही त्याची हिम्मत झाली नाही.(२/७)
बिबट्या भुकेला असूनही त्याने त्या कुत्र्याला फाडले नाही, एका झेपेतच तो त्या कुत्र्याची चटणी करून आपले डिनर करू शकला असता पण ते दोन प्राणी एकेका कोपऱ्यात तब्बल बारा तास होते तरीही बिबट्याने कुत्र्याला कोणतीही इजा केली नाही. वनविभागाने गुंगीच्या गनने बिबट्याला जेरबंद केला.(३/७)