म्युकरमायकॉसिस.. अर्थात ब्लॅक फंगस. अत्यंत जीवघेणा आजार.
महाराष्ट्रात 1500 हून अधिक रुग्ण. यावरचा उपचार अत्यंत महागडा. एका रुग्णाला 100-150 किंवा त्याहूनही जास्त इंजेक्शन्स लागतात. एकाची किंमत 7800 इतकी आहे. सरकारी नव्हे खुल्या बाजारातली. म्हणजे आपल्या आवाक्याबाहेर. #BlackFungus
एखाद्या रुग्णाला 100 इंजेक्शन लागली तर किमान 7 लाख 80
हजार खर्च. डॉक्टरांची फी, शस्त्रक्रिया असं सगळं मिळून 15 ते 20 लाखाचा खर्च. अख्खं कुटुंब रस्त्यावर आणणारा आजार आहे. त्यातही डोळा, दात आणि इतर अवयव गमावण्याची किंवा त्यांना इजा होण्याची भीती वेगळीच. #BlackFungus
सरकारनं म्युकरमायकॉसिस म.फुले जनआरोग्य योजनेत घेतलंय. त्यात किमान 10 हजार आणि कमाल 70 हजार रु. मिळतात. सरकारी रुग्णालयात म.फुले योजना लागू आहे. पण खासगी रुग्णालयं आर्थिक फायद्यासाठी रुग्णांना उभं करतात? त्यामुळे सगळं गहाण ठेऊन रुग्णालयाच्या दारात उभं राहावं लागतं. #BlackFungus
पण म्युकरमायकॉसिस म.फुले योजनेच्या तुटपुंज्या मदतीनं भागणारा आजार नाहीए. औषधं महाग, ती तयार करणाऱ्या कंपन्या केवळ 3 ते 4, त्यांचं उत्पादन मर्यादीत. औषध वितरण सरकारनं ताब्यात घेतलंय. त्यामुळे काळ्या बाजाराला ऊत. एका एका इंजेक्शनसाठी लोकं ऊर फाटेपर्यंत धावपळ करतायत. #BlackFungus
महामारी येते तेव्हा वैयक्तिक जबाबदारी असतेच. पण म्युकरमायकॉसिससारखा आजार अख्खं घर उध्वस्त करतो. त्यावेळी कुटुंबांनी कुठं कुठं ठिगळं लावायची? कुणी जबाबदारी घेणारं आहे का? की सगळंच भगवान भरोसे? एवढी हतबलता कधीही बघितली नाही.. फार कठीण काळ आहे. #BlackFungus
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh